Pages

Pages

उन्हाळी सुट्टी वेळापत्रक 2024-25, शासन निर्णय दिनांक 18 एप्रिल 2024, Summer holiday

 

उन्हाळी सुट्टी आणि नवीन वर्षात या तारखेला शाळा सुरु होणार - शासनाचे परिपत्रक


दिनांक 18 एप्रिल 2024



विषय : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शैक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत.


संदर्भ: शासन परिपत्रक क्रःसंकिर्ण-2023/प्र.क्र. 105/एस.डी. 4, दि. 20/04/2023,

उपरोक्त संदर्भीय परिपत्रकान्वये शासनाने संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन 2024 ची उन्हाळी सुटटी व शेक्षणिक वर्ष 2024-25 सुरु करणेबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.


1. राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्याथ्यांना गुरुवार, दि.02 में, 2024 पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

2. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शेर्माणक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सूटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा,


3. पुढील शैक्षणिक वर्ष सन 2024-25 मध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा शनिवार दि. 15 जून, 2024 रोजी सुरु करण्यात याव्यात.

4. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सूट्टी नंतर तेथील राज्य मंडळाच्या शाळा 30 जून रोजी रविवार येत असल्याने सोमवार दि.01 जुलै, 2024 पासून सुरु करण्यात याव्यात.

वरील सूचना आपल्या अधिनस्थ सर्व मान्यता प्राप्त राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.


संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


https://drive.google.com/file/d/1VryMZnLgdiJR77ZRyfPwNVpzmjBLpoLL/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल