Pages

Pages

गोवर्धन शिंदे यांना MSP चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार प्रदान

गोवर्धन शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने सन्मानित



नांदेड जिल्हा परिषदेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक गोवर्धन शिंदे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी.) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकांचा नाशिक येथे  २४ मे रोजी आयोजित सोहळ्यात  सन्मान करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल नांदेड जिल्हा समन्वयक  प्रमिला सेनकुडे, महेश मुत्तेपवार सर, पंडित तोटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गोवर्धन शिंदे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधीतांडा तालुका उमरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागच्या 21 वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून राज्यभर परिचित आहेत.

   त्यांच्या माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झालेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये राज्यभरातील विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=NFkN3umQW6NeahrC

या यूट्यूब चैनल वरून 1000 पेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय, शिष्यवृत्ती, एन एम एम एस, सैनिक स्कूल इत्यादी स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

तसेच     https://www.gsguruji.in/?m=1    या ब्लॉग वरून घटक निहाय सराव चाचण्या सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप इ. सामाजिक कार्याबद्दल त्यांचा यापूर्वीही प्रशासनाच्या तसेच विविध संस्था, संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

  MSP च्यावतीने सन्मान झाल्याबद्दल राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कौतुक होत आहे. 




No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल