Pages

Pages

गणित जम्बो टेस्ट क्र. 08 - मसावी लसावी,Mathematics Jumbo Test - Masavi Lasavi,LCM,HCF

गणित जम्बो टेस्ट क्र. 08 -  मसावी लसावी,

लसावी आणि मसावी

Mathematics Jumbo Test - Masavi Lasavi, 

LCM,HCF  - least common multiple highest common factor.

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, गणित आठवी, शिष्यवृत्ती गणित, सैनिक स्कूल,NMMS भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन, श्रेया, आय एम विनर इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मसावी व लसावी या घटकावर आधारित सराव चाचणी सोडवा.


हे लक्षात ठेवा 👇

• लघुतम सामाईक विभाज्य (लसावि): ज्या दोन किंवा अधिक संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि होय.

उदा. 16 व 24 चा लसावि काढताना 

          16 चे विभाज्य = 16, 32, 48, 64, 80, 96, 112, 128, 144 

          24 चे विभाज्य = 24, 48, 72, 96, 120, 144, 216 

          सामाईक विभाज्य = 48, 96, 144 

     लहानात लहान विभाज्य संख्या म्हणजेच लसावि = 48


• महत्तम सामाईक विभाजक (मसावि) दोन किंवा अधिक संख्यांना ज्या मोठ्यात मोठ्या विभाजकाने भाग जातो त्या विभाजकाला मसावि म्हणतात.

उदा. 72 व 48 चा मसावि काढताना - 

        72 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 9, 12, 18, 24, 36, 72 

        48 चे सर्व विभाजक 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 16, 24, 48 

        सामाईक विभाजक = 1, 2, 3, 4, 6, 8, 12, 24

       मोठ्यात मोठा विभाजक (मसावि) = 24


 # क्रमवार दोन किंवा अधिक संख्यांचा मसावि 1 येतो त्या संख्यांना तसेच 1 मसावि येणाऱ्या सर्व संख्यांना परस्पर मूळ संख्या म्हणतात.

# क्रमागत दोन संख्यांचा लसावि हा त्या दोन संख्यांचा गुणाकार असतो.

# कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावि व मसावि यांच्या गुणाकाराएवढा असतो.



15 comments:

  1. Sir कृपया 6व 24 लसावि 24 येईल तुम्ही तो 36 दाखवला तो दुरुस्त करा

    ReplyDelete
  2. सर तुम्ही घेत असलेल्या मेहनतीला सलाम..
    तुमच्यामुळे खूप विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.
    पण सर टेस्ट ओपन करायच्या अगोदर आपल्या पेजवर जाहिरात येत आहेत त्या अत्यंत न बघण्यासारखे आहेत.
    विद्यार्थी मनाचा विचार करता त्या जाहिराती बघण्यासारखे नाहीयेत.
    कृपया त्या जागी इतर जाहिराती येण्यासाठी प्रयत्न करावेत..
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. माझ नाव आर्यन

      Delete
    2. कार्तिक आरू

      Delete
    3. माझी नाव कृष्ण

      Delete
    4. माझी नाव कृष्ण

      Delete
    5. Vikki sanjay jadhav

      Delete
  3. sir tumhi khup changle shikavatta

    ReplyDelete

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल