संपूर्ण मराठी व्याकरण - भाग 3
वर्णांचे वर्गीकरण - स्वर,
Classification of Varnas – Vowels, Marathi Grammar
सातारा सैनिक स्कूल, मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, एन एम एम एस तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षा, शिक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मराठी व्याकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत.
आजच्या भागात वर्णांचे वर्गीकरण पाहणार आहोत.
1) स्वर -
ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना स्वर असे म्हणतात.
स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात.
स्वर हा मुळातच अक्षर असतो व तो व्यंजनाच्या शेवटी मिसळून व्यंजनांना अक्षरात व प्राप्त करून देण्याचे कार्य करतो.
स्वरांचे प्रकार -
1) -हस्व स्वर -
अ, इ, उ, ऋ,लृ, या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना -हस्व स्वर म्हणतात.
2) दीर्घ स्वर -
'आ, ई, ऊ ' या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजेच लांबट उच्चार होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
3) संयुक्त स्वर -
' ए, ऐ, ओ , औ' हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात.
संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात.
उदा. ए = अ + इ/ई
ऐ = आ + इ/ई
ओ = अ + उ/ऊ
औ = आ + उ/ऊ
4) इंग्रजी स्वर -
ॲ, ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत.
स्वरांच्या -हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलतात
खाली काही उदाहरणे दिली आहेत.
पाणि - हात. पाणी - जल
सुत - मुलगा. सूत - धागा
दिन - दिवस. दीन - गरीब
सुर - देव. सूर - आवाज
शिर - डोके. शीर - रक्तवाहिनी
सलिल - पाणी. सलील - लीलेने
चंचु - चोच. चंचू - निष्णात
पिक - कोकीळ. पीक - धान्य
मिलन - भेट. मीलन - मिटणे
उच्चार स्थानांवरून स्वरांचे प्रकार
1) सजातीय स्वर -
एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
तोच स्वर (-हस्व किंवा दीर्घ) पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी तयार होते.
उदा. अ - आ
इ - ई
उ - ऊ
ऋ - लृ
2) विजातीय स्वर -
भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
तोच स्वर (-हस्व किंवा दीर्घ) पुन्हा न येता दुसराच स्वर आल्यास विजातीय स्वरांची जोडी तयार होते.
उदा. अ - इ
अ - उ
उ - ई
इ - ऊ
दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो.
उदा. अ + आ = आ, इ + ई = ई
दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो.
उदा. अ + इ / ई = ए
आ + इ/ई = ऐ
अ + उ / ऊ = ओ
आ + उ / ऊ = औ.
दोन संयुक्त स्वर एकमेकात मिसळत नाहीत.
ए + ऐ = ×
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल