काळ व त्यांचे प्रकार,
चाचणी क्रमांक -01
शिष्यवृत्ती - पाचवी, आठवी
घटक - कार्यात्मक व्याकरण - काळ व त्यांचे प्रकार
विद्यार्थी मित्रांनो,
पाचवी आठवीच्या शिष्यवृत्ती मध्ये 100% गुण मिळवण्यासाठी आपण घटक निहाय सराव चाचण्या आपण घेत आहोत.
आजच्या चाचणीमध्ये काळ व त्यांचे प्रकार यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो त्याला 'काळ' असे म्हणतात.
काळाचे मुख्य तीन प्रकार आहेत.
1) वर्तमान काळ - क्रियापदावरून क्रिया आता घडत आहे असा बोध होतो.
2) भूतकाळ - क्रियापदावरून क्रिया घडवून गेली आहे असा बोध होतो.
3) भविष्यकाळ - क्रियापदावरून क्रिया पुढे घडणार आहे असा बोध होतो.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल