जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, Jawahar Navodaya vidyalaya entrance exam

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संपूर्ण माहिती, अभ्यासक्रम, 



Jawahar Navodaya vidyalaya entrance exam,

Subject,Syllabus, Marks, Question 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025

     नवोदय प्रवेश परीक्षा CBSE बोर्ड आयोजित करते
 पाचवीतून सहावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते.

प्रवेश परीक्षा केव्हा असते ?

साधारणपणे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.


प्रवेश परीक्षेसाठी फॉर्म केव्हा आणि कसे भरावे ?

साधारणपणे जून महिन्यामध्ये प्रवेश फॉर्म भरण्यासाठी तारीख जाहीर केली जाते आणि नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाईटवर फॉर्म भरून घेतले जातात.



जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम काय असतो ?
विषय कोणकोणते असतात ?

1) मानसिक क्षमता चाचणी

2) अंकगणित

3) भाषा


एकूण प्रश्न किती असतात ?

80 प्रश्न

एकूण गुण किती असतात ?

100 गुण


प्रत्येक प्रश्नाला किती गुण असतात ?

1.25 गुण

परीक्षेची वेळ ?

11:30 ते 1:30  ( 2 तास म्हणजेच 120 मिनिटे)

परीक्षा पद्धती ?

बहुपर्यायी (MCQ)

 OMR SHEET 


 अभ्यासक्रम

विभाग 1 - मानसिक क्षमता चाचणी

1) वेगळी आकृती ओळखा 

2) समान आकृती ओओळखा

3) आकृती पूर्ण करा 

4) आकृती मालिका पूर्ण करा 

5) आकृती सहसंबंध 

6) भौमितिक आकृत्या पूर्ण करणे 

7) आरशातील प्रतिबिंब 

8) आकृतीची घडी व काप 

9) तुकडे जोडून योग्य कृती बनवणे 

10) आकृतीतील लपलेला भाग शोधा


 विभाग 2: अंकगणित चाचणी

या परीक्षेचा मुख्य उद्देश उमेदवाराची अंकगणितातील मूलभूत क्षमता मोजणे हा आहे.  या परीक्षेचे सर्व वीस प्रश्न पुढील १२ वर आधारित असतील

घटक 

 1. संख्या आणि संख्यात्मक प्रणाली

 2. पूर्ण संख्येवर चार मूलभूत क्रिया

 3. त्यांच्या गुणधर्मांसह घटक आणि गुणाकार

 4. दशांश आणि त्यांच्यावर मूलभूत ऑपरेशन्स

 5. अपूर्णांकांचे दशांश आणि त्याउलट रूपांतर

 6. लांबी, वस्तुमान, क्षमता, वेळ, पैसा इ.चे मोजमाप

 7. संख्यात्मक अभिव्यक्तींचे सरलीकरण

 8. अपूर्णांक संख्यांची बेरीज आणि वजाबाकी सारख्या अपूर्णांक आणि गुणाकार (अपूर्णांक आणि भागाकार अपूर्णांकाच्या विपरीत समाविष्ट नाही)

 9. टक्केवारीची गणना न करता नफा आणि तोटा (नफा आणि तोट्याच्या टक्केवारीची गणना विषयातून सूट दिली आहे)

 10. परिमिती आणि क्षेत्रफळ - बहुभुजाची परिमिती, चौरस आयताचे क्षेत्रफळ आणि त्रिकोण (आयताचा भाग म्हणून)

 11. कोनांचे प्रकार आणि त्याचे साधे अनुप्रयोग

 12. बार आकृती, आलेख आणि रेखा चार्ट वापरून डेटा विश्लेषण.


विभाग 03 - भाषा 


उतारे व त्यावर आधारित प्रश्न


एकूण 4 उतारे आणि प्रत्येक उताऱ्याखाली प्रत्येकी 5 प्रश्न

उतारे कोणत्या घटकावर आधारित असू शकतात ?

निसर्ग, पर्यावरण, खेळ, शास्त्रज्ञ, थोर पुरुष, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती, संकट, चालू घडामोडी इत्यादी भागावर आधारित उतारा असू शकतो.


प्रश्न आणि गुणांचे नियोजन कसे असते ?


मानसिक क्षमता चाचणी - 40 प्रश्न  -    50 गुण 

अंकगणित चाचणी         - 20 प्रश्न   -   25 गुण 

भाषा                            - 20 प्रश्न    -  25 गुण

________________________________________

           एकूण.                 80 प्रश्न.       100 गुण


मुख्य परीक्षेमध्ये वेळेचे नियोजन कसे करावे ?

परीक्षेसाठी 2 तास म्हणजेच (120 मिनिटे) वेळ आपल्याकडे असतो.

मानसिक क्षमता चाचणी - 40 प्रश्न  -50 गुण - 30 मिनिटे वेळ 

अंकगणित चाचणी         - 20 प्रश्न -25 गुण  -50 मिनिटे वेळ 

भाषा                          - 20 प्रश्न -25 गुण - 30 मिनिटे वेळ

OMR SHEET रंगवण्यासाठी -                - 10 मिनिटे वेळ 

________________________________________

           एकूण.          80 प्रश्न.  100 गुण. - 120 मिनिटे वेळ



संपूर्ण Prospect download करून वाचा

https://drive.google.com/file/d/1B8YawC23sEINtbHQAtfiiuk6vrukPhz2/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल