गोवर्धन शिंदे यांना MSP चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार प्रदान

गोवर्धन शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने सन्मानित



नांदेड जिल्हा परिषदेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक गोवर्धन शिंदे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी.) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकांचा नाशिक येथे  २४ मे रोजी आयोजित सोहळ्यात  सन्मान करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल नांदेड जिल्हा समन्वयक  प्रमिला सेनकुडे, महेश मुत्तेपवार सर, पंडित तोटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गोवर्धन शिंदे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधीतांडा तालुका उमरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागच्या 21 वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून राज्यभर परिचित आहेत.

   त्यांच्या माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झालेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये राज्यभरातील विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=NFkN3umQW6NeahrC

या यूट्यूब चैनल वरून 1000 पेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय, शिष्यवृत्ती, एन एम एम एस, सैनिक स्कूल इत्यादी स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

तसेच     https://www.gsguruji.in/?m=1    या ब्लॉग वरून घटक निहाय सराव चाचण्या सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप इ. सामाजिक कार्याबद्दल त्यांचा यापूर्वीही प्रशासनाच्या तसेच विविध संस्था, संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

  MSP च्यावतीने सन्मान झाल्याबद्दल राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कौतुक होत आहे. 




विरुद्धार्थी शब्द ( Antonyms) - पाचवी शिष्यवृत्ती मराठी, Opposite words

विरुद्धार्थी शब्द (Antonyms) 

पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ,

घटक - शब्दसंपत्ती,

उपघटक - विरुद्धार्थी शब्द, Opposite words,

विरुद्धार्थी शब्द


विद्यार्थी मित्रांनो,
 पूर्व उच्च प्राथमिक तसेच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विरुद्धार्थी हा शब्द या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. हा घटक सोपा व्हावा या उद्देशाने यावर आधारित सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेल्या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.



यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


 

BTS Result 2024, बी. टी. एस. निकाल 2024, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

BTS Result 2024, 

बी. टी. एस. निकाल 2024

BTS result



BTS EXAM Result 2024

Bharat Talent search exam 2024,

दिनांक 29 मार्च 2024 रोजी झालेल्या BTS परीक्षेच्या निकाला संदर्भात अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून विचारणा होत आहे.

BTS परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार ?

विद्यार्थी मित्रांनो, Edumeet academy ला संपर्क केला असता दि 04 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.

काही तांत्रिक कारणामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024 चा निकाल पाहण्याची लिंक आपणास खाली देत आहोत.

आपला Roll number टाकून निकाल पहावा.

आपला seat number टाकताना सुरुवातीची इंग्रजी अक्षरे 
Code CAPITAL टाकावा




https://www.btsedumeet.com

वरील लिंक वर Click करून आपला निकाल पहा.


BTS EXAM 2025 बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करा.

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025




चाचणी क्रमांक 28, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS

सराव चाचणी क्रमांक 28,

मराठी उतारे,

मराठी उतारे


Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, सैनिक स्कूल, श्रेया, BTS, MTS, BDS, इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून सोडवा.




चाचणी सोडवल्यानंतर खाली दिलेला चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा

जागतिक रेड क्रॉस दिन विशेष प्रश्नमंजुषा, world Red cross Day Quiz

जागतिक रेड क्रॉस दिन विशेष प्रश्नमंजुषा,

World Red cross Day special Quiz

World Red cross Day


इंग्रजी व मराठी भाषेत असलेली एकमेव प्रश्नमंजुषा.


शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन, I am winner, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, शिक्षक भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, MPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जनरल नॉलेज टेस्ट सोडवा.

3000 पेक्षा जास्त जनरल नॉलेज प्रश्न सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या