क्रियापद - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण
माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer,
क्रियापद - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण
क्रियापद सराव चाचणी क्रमांक 01,
कार्यात्मक व्याकरण - क्रियापद,
शब्दांच्या जाती - क्रियापद
Parts of speech - Verb,
मराठी व्याकरण,
घटकनिहाय सराव चाचणी सोडवा.
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
विरामचिन्हे, punctuation marks, माय व्हिजन शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण, विरामचिन्हे मराठी व्याकरण
विरामचिन्हे - मराठी कार्यात्मक व्याकरण,
विद्यार्थी मित्रांनो,
चौथी / सातवी शिष्यवृत्ती इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्यात्मक व्याकरणावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
punctuation marks,
सर्वनाम - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, चाचणी भाग 1, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती
सर्वनाम - सराव चाचणी क्रमांक 01,
Pronoun test 01,
चाचणी - मराठी भाषा, लिपी स्वरूप, व्याकरण यावर आधारित चाचणी, Origin and Grammar of Marathi Language
संपूर्ण मराठी व्याकरण,
मराठी भाषा, लिपी, स्वरूप, व्याकरणाचे महत्त्व
नाम व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 02,शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, parts of speech noun,Grammar of Marathi Language
संपूर्ण मराठी व्याकरण - कार्यात्मक व्याकरण
माय व्हिजन चौथी, सातवी शिष्यवृत्ती/नवोदय/सैनिक स्कूल/मंथन/BTS, MTS, Jnvst इ. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्याकरण
खाली दिलेली चाचणी सोडविण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा आणि नंतर चाचणी सोडवा.
नाम व त्यांचे प्रकार-सराव चाचणी 02
शब्दांच्या जाती,
चाचणी क्र 09 - वचन व त्यांचे प्रकार यावर आधारित चाचणी, शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, भाग - 2 Grammar of Marathi Language
वचन व त्यांचे प्रकार सराव चाचणी भाग 02,
जम्बो टेस्ट - शब्दांच्या जाती, मराठी कार्यात्मक व्याकरण,Jambo Test 01 - parts of speech
नाम व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 01,शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, भाग - 1 Grammar of Marathi Language,parts of speech,noun
संपूर्ण मराठी व्याकरण,
नाम व त्यांचे प्रकार,
शब्दांच्या जाती,
नाम घटक समजून घेण्यासाठी चाचणीच्या शेवटी दिलेला व्हिडिओ पहा आणि मग नंतर खाली दिलेली सराव चाचणी सोडवा.
विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शब्दांच्या जाती - नाम यावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेली खाली दिलेली सराव चाचणी सोडवा.
चाचणी क्र 02 - वर्णमाला, मुळाक्षरे, भाषेचे मूलभूत घटक यावर आधारित चाचणी, Alphabet, Grammar of Marathi Language
संपूर्ण मराठी व्याकरण,
वर्णमाला, मुळाक्षरे, भाषेचे मूलभूत घटक,
यावर आधारित सराव चाचणी सोडवा.
विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिकेत शिकविलेल्या भागावर आधारित सराव चाचणी सोडवा.
Live तासिका attend केली नसेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहा.
https://www.youtube.com/live/p0_5G6RhZkg?si=SSBnUxichQ70G6tM
वरील video पाहून खाली दिलेली चाचणी सोडवा.
चाचणी क्र 03 - वचन व त्यांचे प्रकार यावर आधारित चाचणी, शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, Grammar of Marathi Language
वचन व त्यांचे प्रकार,
शब्दांच्या जाती संपूर्ण मराठी व्याकरण,
खाली दिलेली चाचणी सोडविण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा.
लिंग व त्यांचे प्रकार - शब्दांच्या जाती, Gender of Noun, kinds of gender, नामाचे लिंग
यापूर्वीच्या भागात आपण शब्दांच्या जाती - 1) नाम - नामाचे प्रकार, वचन - वचनाचे प्रकार - त्यांचे नियम पाहिलेले आहेत.
आजच्या भागात......
नामाचे लिंग व त्यांचे प्रकार
नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही हे यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात.
लिंग याचा अर्थ 'खूण' किंवा 'चिन्ह' असा आहे.
लिंग, वचन व विभक्ती मुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे 'विकरण' असे म्हणतात.
लिंगाचे तीन प्रकार पडतात.
1) पुल्लिंग -
पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला 'पुल्लिंग' असे म्हणतात.
'तो' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे. उदाहरणार्थ, कोंबडा, बैल, घोडा, मुलगा, चिमणा, मृत्यू इ.
2) स्त्रीलिंग -
स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना 'स्त्रीलिंग' असे म्हणतात.
काही वस्तू व भाववाचक नामे सुद्धा स्त्रीलिंगी मानली जातात.
सर्वसामान्यपणे 'ती' या सर्वनामाचा वापर ज्या नामासाठी केला जातो त्यांना 'स्त्रीलिंगी' नामे म्हणतात.
उदा. मुलगी, घोडी, कोंबडी, चिमणी.
3) नपुंसकलिंगी -
एखाद्या नामावरून नर व मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते 'नपुसकलिंगी' मानतात.
'ते' सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुसकलिंगी मांनतात.
उदा. पुस्तक, फुल, मुल, वासरू, गवत इत्यादी.
लिंग बदला विषयी काही महत्त्वाचे नियम : -
नियम क्रं 01) 'आ' कारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत व नपुसकलिंगी रूप 'ए' कारांत होते.
पुल्लिंगी. स्त्रीलिंगी. नपुसकलिंगी
मुलगा मुलगी मुलगे
कुत्रा कुत्री कुत्रे
घोडा घोडी घोडे
नियम क्रं 02) काही प्राणीवाचक 'अ' कारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे 'ई' कारांत होतात.
उदा. दास - दासी तरुण - तरूणी
गोप - गोपी, बेडूक - बेडकी,
वानर - वानरी हंस - हंसी
नियम क्रं 03) काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ' ई' / ईण प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात.
उदा.
वाघ - वाघीण, सुतार - सुतारीण, कुंभार - कुंभारीन,
माळी - माळीन, पाटील - पाटलीन, तेली - तेलीन,
धोबी - धोबीन, कोळी - कोळीन,. मालक - मालकिन,
देव - देवी,. दास - दासी, हरीण - हरिणी,
नट - नटी, साजन - साजणी,. मित्र - मैत्रिण,
अभिनेता - अभिनेत्री,. शिंपी - शिंपीन,
नर्तक - नर्तिका
नियम क्रं 04) नाते दर्शक 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत होते.
उदा. काका - काकी, मामा - मामी,
आजा - आजी, चुलता - चुलती
नियम क्रं 05) संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे 'ई' प्रत्यय लागून होतात.
उदा. राजा - राज्ञी, श्रीमान - श्रीमती,
भगवान - भगवती,. युवा - युवती,
विद्वान - विदुषी
नियम क्रं 06). काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालील प्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात.
पुरुष - स्त्री, भाऊ - बहीण, मोर - लांडोर,
कवी - कवयित्री, बंधू - भगिनी, उंट - सांडणी,
राजा - राणी, बाप - आई, नातू - नात,
पती - पत्नी, वर - वधू, जनक - जननी,
नर - नारी / मादी, गृहस्थ - गृहिणी,
पोपट - मैना, वाघ्या - मुरळी,
बोका - भाटी / मांजर, रेडा / हेला - म्हैस,
पुत्र - कन्या, दीर - जाऊ, खोंड - कालवड,
बैल - गाय, व्याही - विहीन, साधू - साध्वी,
मुलगा / मुलगी,सून विधूर - विधवा,
सासरा - सासू, सुत - सुता, एडका - मेंढी.
Notes - नाम - वचन आणि त्यांचे प्रकार,
मागील भागात आपण नाम आणि नामाचे प्रकार उदाहरणासह पाहिलेले आहेत.
या भागात आपण .......
नामाचे वचन व त्यांचे प्रकार
वस्तू एक आहे की अनेक आहेत ते सुचित करणाऱ्या शब्दाच्या गुणधर्मास व्याकरणात 'वचन' असे म्हणतात.
नामाच्या ठिकाणी संख्या सुचविण्याचा जो धर्म असतो त्याला 'वचन' असे म्हणतात.
वचनाचे प्रकार
1) एकवचन (singular noun)
2) अनेकवचन (बहुवचन) plural noun
वचना संबंधी काही महत्त्वाचे नियम
1) नामांच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते
2) पदार्थवाचक भाववाचक तसेच विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही.
3) ज्यावेळी विशेष नामाचे अनेक वचन केले जाते त्यावेळी ते विशेष नाम सामान्य नामाची भूमिका करते.
4) नामाच्या वचनाचा क्रियापदावरही परिणाम होतो.
5) आकारांत विशेषणावर नामाच्या वचनाचा परिणाम होतो.
वचनामुळे नामाच्या रूपात खालील प्रमाणे बदल होतो.
नियम क्रं 1) 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन 'ए' कारांत होते.
आंबा - आंबे, रस्ता - रस्ते,. राजा - राजे,
कुत्रा - कुत्रे, वडा - वडे, मासा - मासे,
झरा - झरे, पंखा - पंखे, ससा - ससे,
घोडा - घोडे, वाडा - वाडे, आरसा - आरसे,
डबा - डबे, बोका - बोके.
नियम क्रं 2) 'आ' कारांता शिवाय इतर पुल्लिंगी नामांची रुपे दोन्ही वाचनात सारखेच असतात.
साप - साप,. वाघ - वाघ, गहू - गहू,
शत्रू - शत्रु, देव - देव, खडू - खडू,
लाडू - लाडू, फोटो - फोटो,. राक्षस - राक्षस,
गरुड - गरुड, माळी - माळी, कवी - कवी,
मनुष्य - मनुष्य, दगड - दगड, पक्षी - पक्षी,
उंदीर - उंदीर,. बैल - बैल, पर्वत - पर्वत,
हत्ती - हत्ती,. पुरुष - पुरुष.
नियम क्रं 3) काही 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामांचे अनेकवचन 'आ' कारांत होते तर काहींचे अनेकवचन हे 'ई' कारांत होते.
चूक - चुका, वेळ - वेळा, वीट - विटा,
तारीख - तारखा, खारीक - खारका, विहीर - विहिरी,
म्हैस - म्हशी, भिंत - भिंती, सून - सुना.
नियम क्रं 4) 'य' नंतर 'ई' आल्यास उच्चारात 'य' चा लोप होतो.
गाय - गायी - गाई
सोय - सोयी - सोई
नियम क्रं 5) पुढील आ,ई, ऊ, कारांत स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात.
भाषा - भाषा, पूजा - पूजा, दिशा - दिशा,
सभा - सभा, आज्ञा - आज्ञा, विद्या - विद्या,
माता - माता, गती - गती,. तराजू - तराजू,
जादू. - जादू.
नियम क्रं 6). 'ओ' कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'आ' कारांत होते.
बायको - बायका
नियम क्रं 7). पुढील 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'या' कारांत होते.
नदी - नद्या, पणती - पणत्या, काठी - काठी,
टाचणी - टाचण्या, नळी - नळ्या, चांदणी - चांदण्या,
भाकरी - भाकऱ्या, लेखणी - लेखण्या, स्त्री - स्त्रिया,
बाई - बाया , गाडी - गाड्या.
नियम क्रं 8). 'ऊ' कारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन 'वा' कारांत होते.
सासू - सासवा,. जाऊ - जावा, पिसू - पिसवा,
जळू - जळवा, ऊ - उवा.
नियम क्रं 9) 'अ' कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारान्त होते.
घर - घरे, पुस्तक - पुस्तके, फुल - फुले,
दार - दारे,. शेत - शेते, घड्याळ - घड्याळे.
नियम क्रं 10) 'ऊ' कारांत नपुसकलिंगी नामाचे अनेक वचन 'ए' कारांत होते.
लिंबू - लिंबे, वासरू - वासरे,
पाखरू - पाखरे, पिलू - पिले.
नियम क्रं 11) 'ए' कारांत नपुंसकलिंगी नामाचे अनेकवचन. 'ई' कारांत होते.
केळे - केळी, रताळे - रताळी, तळे - तळी,
लाटणे - लाटणी, मडके - मडकी,
गाणे - गाणी,. खेडे - खेडी.
नियम क्रं 12) पदार्थवाचक नामाचे सामान्यतः अनेक वचन होत नाही.
सोने - सोने, रुपे - रूपे, पाणी - पाणी,
लोणी. - लोणी,. दही - दही
नियम क्रं 13) खालील नामांचे अनेक वचनात रूप बदलत नाही.
दासी - दासी, दृष्टी - दृष्टी, वळू. - वळू,
वस्तू - वस्तू, बाजू -. बाजू, लाली - लाली,
युवती - युवती. तरुणी - तरुणी.
चाचणी क्र 05 - वर्णांचे वर्गीकरण - स्वरादी, व्यंजने यावर आधारित चाचणी, संपूर्ण मराठी व्याकरण, भाग - 2 Grammar of Marathi Language
वर्णांचे वर्गीकरण,
स्वरादी, व्यंजने - भाग 02
चाचणी क्र 04 - वर्णांचे वर्गीकरण - स्वरादी, व्यंजने यावर आधारित चाचणी, भाग 1, संपूर्ण मराठी व्याकरण, Grammar of Marathi Language
वर्णांचे वर्गीकरण - स्वरादी, व्यंजने
Notes - शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण,
संपूर्ण मराठी व्याकरण,
यापूर्वीच्या भागामध्ये आपण मराठी भाषा, लिपी व स्वरूप आणि मराठी व्याकरण, भाषेचे मूलभूत घटक, वर्णमाला/ मुळाक्षरे, वर्णांचे वर्गीकरण, 1) स्वर - स्वरांचे प्रकार, 2) स्वरादी 3) व्यंजने इत्यादी बद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे.
हे सर्व घटक तुम्ही पाहिले नसतील तर खाली दिलेल्या युट्युब चॅनलवर पाहू शकता.
https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173
शब्दांच्या जाती
वाक्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्द होय.
ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्या शब्द असे म्हणतात.
परंतु सर्वच अक्षर समूहाला अर्थ असतोच असे नाही. काही अक्षर समूह अर्थहीन असतात. जसे , ईय, ईक, यांना प्रत्यय असे म्हणतात.
मराठीत पुढील प्रमाणे शब्दांच्या आठ जाती मानल्या जातात.
1) नाम - मुलगा
2) सर्वनाम - तो
3) विशेषण - चांगला
4) क्रियापद - दिसतो
5) क्रियाविशेषण - चांगला खेळतो
6) शब्दयोगी अव्यय - मागे, पुढे, इकडे, तिकडे
7) उभयान्वयी अव्यय - आणि, पण, किंवा, कारण
8) केवलप्रयोगी अव्यय - अरेरे, वा, छान
Notes - वर्णांचे वर्गीकरण - 2) स्वरादी, 3) व्यंजने आणि त्यांचे प्रकार , संपूर्ण मराठी व्याकरण भाग 4
वर्णांचे वर्गीकरण - 2) स्वरादी, 3) व्यंजने आणि त्यांचे प्रकार,
संपूर्ण मराठी व्याकरण भाग 4
चाचणी क्र 03 - वर्णांचे वर्गीकरण - स्वर यावर आधारित चाचणी, संपूर्ण मराठी व्याकरण, भाग - 3 Grammar of Marathi Language
संपूर्ण मराठी व्याकरण,
वर्णांचे वर्गीकरण - स्वर ,
Notes - वर्णांचे वर्गीकरण - स्वर, Classification of Varnas – Vowels, संपूर्ण मराठी व्याकरण - भाग 3, Marathi Grammar
संपूर्ण मराठी व्याकरण - भाग 3
वर्णांचे वर्गीकरण - स्वर,
Classification of Varnas – Vowels, Marathi Grammar
सातारा सैनिक स्कूल, मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, एन एम एम एस तसेच विविध शालेय स्पर्धा परीक्षा, शिक्षक भरती, पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त मराठी व्याकरण आपण या ठिकाणी पाहत आहोत.
आजच्या भागात वर्णांचे वर्गीकरण पाहणार आहोत.
1) स्वर -
ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात, त्यांना स्वर असे म्हणतात.
स्वर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात.
स्वर हा मुळातच अक्षर असतो व तो व्यंजनाच्या शेवटी मिसळून व्यंजनांना अक्षरात व प्राप्त करून देण्याचे कार्य करतो.
स्वरांचे प्रकार -
1) -हस्व स्वर -
अ, इ, उ, ऋ,लृ, या स्वरांचा उच्चार करावयास कमी कालावधी लागतो म्हणून त्यांना -हस्व स्वर म्हणतात.
2) दीर्घ स्वर -
'आ, ई, ऊ ' या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो म्हणजेच लांबट उच्चार होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर म्हणतात.
3) संयुक्त स्वर -
' ए, ऐ, ओ , औ' हे स्वर इतर दोन स्वरांचे मिळून बनल्याने त्यांना संयुक्त स्वर म्हणतात.
संयुक्त स्वर हे दीर्घ उच्चाराचे असतात.
उदा. ए = अ + इ/ई
ऐ = आ + इ/ई
ओ = अ + उ/ऊ
औ = आ + उ/ऊ
4) इंग्रजी स्वर -
ॲ, ऑ हे इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर आहेत.
स्वरांच्या -हस्व व दीर्घ उच्चारानुसार शब्दांचे अर्थ बदलतात
खाली काही उदाहरणे दिली आहेत.
पाणि - हात. पाणी - जल
सुत - मुलगा. सूत - धागा
दिन - दिवस. दीन - गरीब
सुर - देव. सूर - आवाज
शिर - डोके. शीर - रक्तवाहिनी
सलिल - पाणी. सलील - लीलेने
चंचु - चोच. चंचू - निष्णात
पिक - कोकीळ. पीक - धान्य
मिलन - भेट. मीलन - मिटणे
उच्चार स्थानांवरून स्वरांचे प्रकार
1) सजातीय स्वर -
एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात.
तोच स्वर (-हस्व किंवा दीर्घ) पुन्हा आल्यास सजातीय स्वरांची जोडी तयार होते.
उदा. अ - आ
इ - ई
उ - ऊ
ऋ - लृ
2) विजातीय स्वर -
भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात.
तोच स्वर (-हस्व किंवा दीर्घ) पुन्हा न येता दुसराच स्वर आल्यास विजातीय स्वरांची जोडी तयार होते.
उदा. अ - इ
अ - उ
उ - ई
इ - ऊ
दोन सजातीय स्वरांपासून एकच दीर्घ स्वर तयार होतो.
उदा. अ + आ = आ, इ + ई = ई
दोन विजातीय स्वर एकत्र आल्यास संयुक्त स्वर तयार होतो.
उदा. अ + इ / ई = ए
आ + इ/ई = ऐ
अ + उ / ऊ = ओ
आ + उ / ऊ = औ.
दोन संयुक्त स्वर एकमेकात मिसळत नाहीत.
ए + ऐ = ×


















