Daily GK Quiz
चाचणी क्र 07 , Navodaya practice test 07,नवोदय सराव चाचणी सोडवा । भाषा । मराठी
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 07,
Jawahar Navodaya vidyalaya entrance exam
Navodaya practice test 07,
चाचणी क्र 06 । माय व्हिजन नवोदय । Navodaya practice test, Marathi Utare, Jnvst
माय व्हिजन नवोदय अडमिशन,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 06,
Navodaya practice test 06,
चाचणी क्र 5 । माय व्हिजन नवोदय । 5th Navodaya
माय व्हिजन नवोदय ऍडमिशन,
नवोदय सराव चाचणी क्रमांक 05,
Navodaya practice test 05,
सराव चाचणी क्र 03 । माय व्हिजन नवोदय ।Test no. 03
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षा तयारी,
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा,Quiz Annabhau Sathe,Online GK Test 108
अण्णाभाऊ साठे जयंती विशेष प्रश्नमंजुषा,
1 ते 99999 संख्या ओळख - BTS, नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,1 to 99999 number recognition
1 ते 99999 संख्या ओळख - BTS, नवोदय, शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा,
1 to 99999 number recognition,
विद्यार्थी मित्रांनो,
संख्या ओळख या घटकावर आधारित विविध स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात.
या घटकाचा अधिक अधिक सरावा व्हावा या उद्देशाने ही सराव चाचणी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
यासारख्या अधिकाधिक सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया, सराव चाचणी सोडवा भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर, BTS , MTS, BDS,manthan
दुसरी गणित - १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया,
भारत टॅलेंट सर्च परीक्षा, मंथन , श्रेया, आय एम विनर,
BTS , MTS, BDS,manthan
विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता दुसरीचा गणित विषयाचा अत्यंत महत्त्वाचा घटक १ ते १०० अंक व त्यावरील क्रिया यावर आधारित सराव चाचणी आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.
चाचणी सोडविण्यापूर्वी महत्त्वाची सूचना खाली दिली आहे.
चाचणी सोडविण्यापूर्वी आपले पूर्ण नाव, तालुका, जिल्हा आणि मोबाईल क्रमांक टाकून Next बटना वर क्लिक करावे आणि चाचणी सोडविल्यानंतर. Submit बटना वर क्लिक करावे.
आपण सोडवलेल्या चाचणीमध्ये किती गुण मिळाले आणि आपले कोणते प्रश्न बरोबर आले, कोणते चुकले हे पाहण्यासाठी
VIEW SCORE बटनावर क्लिक करावे.
भाषाविषयक सामान्यज्ञान, चाचणी क्रमांक 01,General Knowledge of Languages test, BTS, navodaya, scholarship, marathi, grammar
भाषाविषयक सामान्यज्ञान,
चाचणी क्रमांक 01,
General Knowledge of Languages test, BTS, navodaya, scholarship, marathi, grammar
नवोदय, शिष्यवृत्ती, mts, manthan, sainik school भारत टॅलेंट सर्च परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयक सामान्य ज्ञानावर आधारित सराव चाचणी सोडवा.
इतर अत्यंत महत्त्वाच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करा.
भाषा - सराव चाचणी क्र 1, 5वी/8वी Navodaya practice test 1
माय व्हिजन - नवोदय ऍडमिशन,
Navodaya practice test 01,
350 पेक्षा जास्त मराठी उतारे आकलनासह
जवाहर नवोदय विद्यालय, सैनिक स्कूल, शिष्यवृत्ती मंथन, BTS, MTS इ. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त उतारे.
चौथी/सातवी शिष्यवृत्ती अंतरिम निकाल,4th/7th scholarship Result
अंतरिम निकाल जाहीर !!
चौथी/सातवी शिष्यवृत्ती,
4th/7th scholarship Result April 2026,
एप्रिल 2026 रोजी झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झालेला आहे.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून
उजव्या बाजूस विद्यार्थ्यांसाठी अंतरिम निकाल यावर click करून
SEAT Number आणि MOTHER Name टाकून आपला निकाल पाहू शकता.
https://2026-2.puppssmsce.in/#
क्रियापद - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण
क्रियापद चाचणी क्रमांक 02,
कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती,
verb test,
माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer,
मराठी व्याकरण
क्रियापदावरील व्हिडिओ पहा आणि त्यानंतर चाचणी सोडवा.
क्रियापद - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, verb test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer, मराठी व्याकरण
क्रियापद सराव चाचणी क्रमांक 01,
कार्यात्मक व्याकरण - क्रियापद,
शब्दांच्या जाती - क्रियापद
Parts of speech - Verb,
मराठी व्याकरण,
घटकनिहाय सराव चाचणी सोडवा.
यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला भेट द्या.
मराठी विरामचिन्हे - चाचणी 02, punctuation marks, शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण
मराठी विरामचिन्हे - चाचणी 02,
punctuation marks,
शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण
विद्यार्थी मित्रांनो,
शिष्यवृत्ती परीक्षा, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा भाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
'विराम' म्हणजे विश्रांती अथवा थांबणे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो. वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबावे हे कळले पाहिजे. ते समजण्यासाठी जे चिन्हे वापरले जातात, त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात.
विरामचिन्हांचे पुढील प्रकार आहेत.
पूर्णविराम, अर्धविराम, अपूर्णविराम स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गार चिन्ह, अवतरण चिन्ह, संयोग चिन्ह, अपसारण, अवग्रह काकपद.
विरामचिन्हे, punctuation marks, माय व्हिजन शिष्यवृत्ती, कार्यात्मक व्याकरण, विरामचिन्हे मराठी व्याकरण
विरामचिन्हे - मराठी कार्यात्मक व्याकरण,
विद्यार्थी मित्रांनो,
चौथी / सातवी शिष्यवृत्ती इतर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे कार्यात्मक व्याकरणावर आधारित सराव चाचणी या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
punctuation marks,
सर्वनाम - चाचणी क्रमांक 02, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती ,grammer
कार्यात्मक व्याकरण - सर्वनाम सराव चाचणी क्रमांक 2,
माय व्हिजन चौथी, सातवी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षा तयारी,
घटक निहाय सराव चाचणी सोडवा.
सराव चाचणी क्रमांक 01 अद्याप सोडवली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
विद्यार्थी मित्रांनो चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेला व्हिडिओ पहा.
सर्वनाम - चाचणी क्रमांक 01, कार्यात्मक व्याकरण - शब्दांच्या जाती, चाचणी भाग 1, pronoun test, माय व्हिजन शिष्यवृत्ती
सर्वनाम - सराव चाचणी क्रमांक 01,
Pronoun test 01,
चाचणी - मराठी भाषा, लिपी स्वरूप, व्याकरण यावर आधारित चाचणी, Origin and Grammar of Marathi Language
संपूर्ण मराठी व्याकरण,
मराठी भाषा, लिपी, स्वरूप, व्याकरणाचे महत्त्व
रोमन संख्या विशेष, Roman Numerals special, jnvst, scholarship
रोमन संख्या विशेष
Roman Number
विषय - गणित
संख्याज्ञान
रोमन संख्यांची माहिती व्हावी या उद्देशाने ही चाचणी देण्यात आली आहे.
स्कॉलरशिप, नवोदय तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी रोमन संख्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात.
सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म, गणितविषयक सामान्यज्ञान,Properties of even and odd numbers,Online Gk test 29
सम आणि विषम संख्यांचे गुणधर्म
Properties of even and odd numbers
BTS, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन स्पर्धा परीक्षा
गणितविषयक सामान्यज्ञान,
संख्या ज्ञान या घटकांमध्ये सम आणि विषम संख्यांच्या गुणधर्मावर आधारित विविध प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्याच्या उद्देशाने या घटकावर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.
त्रिकोणी संख्या - गणित, चाचणी क्रमांक 01,नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, श्रेया, आय एम विनर, भारत टॅलेंट सर्च, navodaya, scholarship math,
त्रिकोणी संख्या - गणित,
घटक - संख्याज्ञान
उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)
त्रिकोणी संख्या म्हणजे काय ?
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.
त्रिकोणी संख्या = nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी
नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो.
उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9
कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9
45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.
चाचणी सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
1 ते 100 पर्यंतच्या संख्यांवर आधारित प्रश्न, numbers from one to hundred,Online Gk test 27
01 ते 100 पर्यंतच्या संख्यावर आधारित प्रश्न,
गणितविषयक सामान्यज्ञान,
विद्यार्थी मित्रांनो,
चौथी / सातवी नवोदय, शिष्यवृत्ती,BTS,MTS तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये एक ते शंभर संख्यांवर आधारित संख्या ज्ञानावर विविध प्रश्न विचारले जातात.
या प्रश्नांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने या ठिकाणी मोफत सराव चाचणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
Navodaya Result 2025 - jnvst result 2025 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा निकाल जाहीर
Navodaya Result 2025
राजमाता जिजाऊ विशेष, Jijau special State Level Quiz, Online GK test 36
राजमाता जिजाऊ विशेष
राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा
Online Gk test 36
छत्रपती शिवाजी महाराजांना ज्ञान, चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम इत्यादींचे बाळकडू देणाऱ्या मा जिजाऊ साहेबांचा जन्म सिंदखेड जवळील देऊळगाव येथील भुईकोट राजवाडा मध्ये 12 जानेवारी १५९८ मध्ये झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा च्या माध्यमातून आदरणीय मासाहेब जिजाऊंना विनम्र अभिवादन.
जिजाऊ जयंती सोपे व सुंदर मराठी भाषण,Jijau Jayanti simple and beautiful Marathi speech,
राजमाता जिजाऊ सोपे व सुंदर मराठी भाषण,
Rajmata Jijau simple and beautiful Marathi speech,
भाषण क्रमांक 01
मुजरा माझा त्या माता जिजाऊला,
घडविले त्यांनी शूर शिवबांना.
साक्षात होत्या त्या आई भवानी
जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवबांनी.
1) सर्वांना माझा नमस्कार,
2) माझे नाव .......... आहे.
3) आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत.
4) राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला.
5) त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते.
6) राजमाता जिजाऊ यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
7) पुणे येथील शिवनेरी गडावर त्यांनी शिवबांना जन्म दिला.
8) त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य निर्माण करण्याचा प्रचंड आत्मविश्वास निर्माण केला.
9) दुर्दैवाने राजमाता जिजाऊंनी 17 जून 1674 रोजी अखेरचा श्वास घेतला.
वीर जिचा मुलगा धन्य ती माई,
नाव तिचे जिजाऊ ती शिवरायांची आई.
भाषण क्रमांक 02
स्वराज्य ज्यांनी,
घडवला विधाता,
धन्य त्या स्वराज जननी,
जिजाऊ राजमाता.....
सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो,
सर्वांना माझा नमस्कार,
आज 12 जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांची जयंती आपण अतिशय उत्साहाने साजरी करत आहोत. प्रथमतः राजमाता जिजाऊ यांना माझा मानाचा मुजरा.
राजमाता जिजाऊ ह्या फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नाहीत तर त्या खऱ्या अर्थाने स्वराज्याच्या जननी होत्या.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांचे वडील लखोजी जाधव हे एक शूर सरदार होते. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई होते. राजमाता जिजाऊंना लहान असल्यापासून पराक्रम, धर्मनिष्ठा, स्वराज आणि स्त्री - शिक्षण यांची ओढ होती.
त्यांचा विवाह शहाजीराजे यांच्याशी झाला आणि त्या पुण्याला आल्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही त्यांनी पुण्याची जहागीर कुशलतेने सांभाळली. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वराज्य स्थापनेचे बीज पेरले. शिवरायांच्यावर उत्तम संस्कार केले. त्या स्वतः युद्ध कौशल्यात पारंगत होत्या. त्यांनी शिवरायांना शस्त्र विद्येत कुशल बनवले.
राजमाता जिजाऊंच्या संस्कारामुळे महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श राजे लाभले. त्यांनी केवळ मुलगा घडविला नाही तर संपूर्ण समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. आज आपण त्यांच्या विचारांवर चालले पाहिजे.
जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते,
शिवराय नसते तर स्वराज्य नसते.
धन्य त्या राजमाता जिजाऊ,
धन्य त्यांची थोरवी,
जय जिजाऊ,
जय शिवराय....
जय महाराष्ट्र .....
धन्यवाद.
भाषण क्रमांक 03
थोर तुमचे कर्म जिजाऊ,
उपकार कधी न फिटणार !
चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार.
सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज मी राजमाता जिजाऊ यांच्या विषयी काही शब्द बोलणार आहे.
राजमाता जिजाऊ यांचे स्मरण केल्याशिवाय स्वातंत्र्य सूर्य छत्रपती शिवरायांचे चरित्र सांगणे कठीणच नव्हे तर अप्रस्तुतही ठरेल. शिवचरित्र घडविण्यात जिजाऊ मातेचे योगदान फार महत्त्वाचे आहे. अशा या महान जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये विदर्भातील सिंदखेडराजा येथे लखोजी राजे जाधवांच्या घरी झाला इसवी सन १६०५ मध्ये जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंनी शिवबांना जन्म दिला. आई ही जगातील सर्वात मोठा गुरु आणि योद्धा असते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ होय. शिवबांना अगदी लहानपणापासून रामायण आणि महाभारतातील शौर्य कथा त्यांनी सांगितल्या. महाराष्ट्रात अनेक वर्षापासून मुघल सत्ता चालून होती आणि दिनदुबळ्या जनतेला लुटत होती. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी खेळण्याच्या वयात शिवबांच्या हाती तलवार, ढाल देत युद्ध कौशल्य शिकण्यास प्रवृत्त केले. फक्त मुघलांपासून रक्षण करणे एवढेच नव्हे तर न्यायनिवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि एक मुत्सद्दी राजकारणी असे गुण शिवबांना दिले.
स्वराज्य स्थापनेचे बाळकडू छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ साहेबांकडून मिळाले होते आणि ते त्यांनी देखील सत्यात उतरविले.
अनंत काळापासून जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा नारीशक्तीने आपला अवतार घेतला आहे आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आहेत.
अशा या महान मातेस माझा कोटी कोटी प्रणाम.
जय हिंद !
जय जिजाऊ !
जय महाराष्ट्र.

























