STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यमापन चाचणी
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे*
*शासन निर्णय दिनांक 8 ऑगस्ट 2023*
*मार्फत*
*घेतली जाणार पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 01, संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 02*
*ही चाचणी कोणत्या वर्गासाठी असेल ?*
उत्तर - ही चाचणी तिसरी ते आठवीच्या वर्गासाठी असेल.
*चाचणीचे वेळापत्रक*
उत्तर - पायाभूत चाचणी - ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात.
संकलित मूल्यमापन चाचणी सत्र 1 - ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा आठवडा किंवा नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवडा.
संकलित मूल्यमापन चाचणी क्रमांक 02 - माहे एप्रिल 2024 चा पहिला किंवा दुसरा आठवडा.
*चाचणीचे स्वरूप*
लेखी
*प्रश्नपत्रिका कोण देणार ?*
शासन स्तरावरून प्रश्नपत्रिका विद्यार्थी निहाय पुरविल्या जाणार आहेत.
*कोणती खबरदारी घ्यावयाची आहे ?*
प्रश्नपत्रिका आणि उत्तरसूची समाज माध्यमावर शेअर करायची नाही.
*वाचा सविस्तर माहिती*👇👇👇
संपूर्ण शासन निर्णय वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा.
https://drive.google.com/file/d/1js-M_bEde2b85wt4Ex4iUcmkjVe0cB_l/view?usp=drivesdk
सौजन्य - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल