शिक्षक दिन मराठी भाषण, छोटे आणि सोपे मराठी भाषण, Teacher's day speech in marathi, shikshak din marathi sope bhashan

 शिक्षक दिन मराठी भाषण, 

5 सप्टेंबर 

छोटे आणि सोपे मराठी भाषण, 

Teacher's day speech in marathi, 

shikshak din marathi sope bhashan 

शिक्षक दिन मराठी भाषण


विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण भारतामध्ये 5 सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

     भारताचे दुसरे राष्ट्रपती तथा पहिले उपराष्ट्रपती आदरणीय श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात आहे.

     शिक्षक दिनानिमित्त शाळेत तसेच विविध ठिकाणी भाषण स्पर्धा घेतली जाते. विविध कार्यक्रम आनंदाने साजरे केले जातात. या कार्यक्रमात आपले भाषण सादर करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटे छोटे भाषणे खाली देण्यात आलेली आहेत.

ही भाषणे आपण लिहून घ्या आणि व्यासपीठावर सादर करा.


भाषण क्रमांक 01  (मराठी)

        सर्वांना नमस्कार ! 

माझे नाव ........  आहे. मी इयत्ता.  .......   मध्ये शिकतो.

माझ्या शाळेचे नाव  ............ आहे.

आज 5 सप्टेंबर,  हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करीत आहोत.

सर्वप्रथम, आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

     या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन असतो. ते एक आदर्श शिक्षक तसेच भारताचे दुसरे राष्ट्रपती होते.

 शिक्षक हे आपले मित्र, मार्गदर्शक व प्रेरक असतात. आपण नेहमी आपल्या शिक्षकांचा आदर व सन्मान केला पाहिजे.

       माझ्या सर्व शिक्षकांना  वंदन करतो आणि माझे भाषण थांबवतो.

                धन्यवाद !

           

भाषण क्रमांक 02

            सर्वांना नमस्कार, 

माझे नाव ............... 

सर्वप्रथम आपणास शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो.

     आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, माझे गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या माझ्या बाल मित्रांनो,

     आज 5 सप्टेंबर अर्थात शिक्षक दिन. आपण सर्वजण आपल्या शिक्षकांच्या सन्मानार्थ हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करतो. भारताचे दुसरे राष्ट्रपती तथा पहिले उपराष्ट्रपती आदरणीय श्री सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. 

       आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा आहे कारण ज्यांच्यामुळे आपली पुढील जीवन सुखाचे होणार आहे ज्यांच्यामुळे अनेक आदर्श नागरिक घडले आणि इथून पुढे असंख्य आदर्श नागरिक घडणार आहेत अशा शिक्षकांचा सन्मान करण्याचा त्यांच्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा शुभ दिवस आहे.

            म्हणून आजच्या दिवशी माझ्या सर्व शिक्षकांना नमन करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो.

                जय हिंद | जय भारत |

    

भाषण क्रमांक 03

        

       गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर: गुरु: साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः 

    या श्लोकाप्रमाणेच प्राचीन काळापासून गुरूंचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून माझ्या सर्व गुरुजनांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो.


      विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊन समाजाला योग्य दिशा देणाऱ्या माझ्या तमाम गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम.

       आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, आज 5 सप्टेंबर म्हणजेच 'शिक्षक दिन'. शिक्षकांचा त्यांच्या कार्याबद्दल गुणगौरव करण्याचा दिवस.  गुरु बद्दल सांगायचे झाल्यास,

                      जो द्रव्य वाढवितो,

                      तो काळजी वाढवतो.

                      परंतु जो विद्या वाढवितो,

                         तो मान वाढवितो.

                     हे कार्य फक्त शिक्षकच करतो.

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षक दिन हा दिवस सर्व देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

        आपणा सर्वांना शिक्षक दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा !!


भाषण क्रमांक 04

          ज्योत पेटवण्यासाठी समईत हवी वात.

       चांदणं पाहण्यासाठी आकाशात हवी रात

                      आणि ध्येय गाठण्यासाठी 

               पाहिजे असते शिक्षकांची साथ.

           आपल्या आयुष्यात शिक्षकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. देवता पेक्षाही श्रेष्ठ असे कोणी असेल तर ते म्हणजे आपले गुरु. मला घडवणाऱ्या वंदनीय गुरुजींना सर्वप्रथम कोटी कोटी प्रणाम.

         शिक्षक हे भावी पिढीला घडवणारे शिल्पकारच आहेत.  शिक्षक हे ज्ञानाच्या प्रकाशाने जीवनातला अंधार नाहीसा करतात.  आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे बळ आपल्याला देतात. जीवन कसे जगावे हे शिकवतात. आपल्यातील अपूर्णाला पूर्ण करतात.

         आपण चुकल्यावर शिक्षक रागावत जरी असले तरी पाठीवर कौतुकाची थाप देणारेही तेच असतात. आपल्यापेक्षाही जास्त आपल्याला ओळखणारे शिक्षकच असतात. आपल्यातील उणिवा जाणून घेऊन त्या दूर करतात.

     आपल्यातील गुणांची पारख करून आपल्याला सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात. आपल्या जीवनाला ज्ञानाच्या प्रकाशाने तेजोमय करतात.

              अशा माझ्या शिल्पकाररुपी गुरूंना त्रिवार वंदन.

    

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल