चाचणी क्र 40 - नवोदय, स्कॉलरशिप मराठी उतारे,Navodaya marathi uttare,jnvst

चाचणी क्र 40 - नवोदय, स्कॉलरशिप मराठी उतारे,

Navodaya Marathi Utare


Navodaya marathi uttare,jnvst, BTS, MTS, BDS,



विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची शंभर टक्के तयारी करण्याच्या उद्देशाने मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी आपण या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडविण्यासाठी खाली दिलेल्या  page ला भेट द्या.

  सराव चाचणी Submit केल्यानंतर या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

चाचणी क्रमांक 39, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, MTS, Marathi Utare

चाचणी क्रमांक 39 - मराठी उतारे,

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर,
navodaya, scholarship, BTS, MTS, Marathi Utare,

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उताऱ्यांवर आधारित प्रश्न विचारले जातात. मराठी विषयाच्या उत्तरांमध्ये शंभर टक्के गुण मिळवण्यासाठी खाली दिलेली सराव चाचणी सोडवा आणि


 शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे तो पहा.

 
सराव चाचणी क्रमांक 39 से स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

गोवर्धन शिंदे यांना MSP चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्कार प्रदान

गोवर्धन शिंदे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने सन्मानित



नांदेड जिल्हा परिषदेचे उपक्रमशील, तंत्रस्नेही शिक्षक गोवर्धन शिंदे यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल (एम. एस.पी.) च्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवासन्मान पुरस्काराने नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित विशेष कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.

 मराठी चित्रपट अभिनेत्री किशोरी शहाणे, कवी अनंत राऊत, शिक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चामे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. 

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन गुणवत्तेच्या सार्वत्रिकीकरणासाठी कार्य करणाऱ्या शिक्षक, शिक्षकांचा नाशिक येथे  २४ मे रोजी आयोजित सोहळ्यात  सन्मान करण्यात आला. 

यावेळी महाराष्ट्र शिक्षक पॅनल नांदेड जिल्हा समन्वयक  प्रमिला सेनकुडे, महेश मुत्तेपवार सर, पंडित तोटेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गोवर्धन शिंदे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंधीतांडा तालुका उमरी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मागच्या 21 वर्षापासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे तंत्रस्नेही शिक्षक म्हणून राज्यभर परिचित आहेत.

   त्यांच्या माय व्हिजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शन उपक्रमांतर्गत आतापर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश पात्र झालेले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये राज्यभरातील विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत.

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173?si=NFkN3umQW6NeahrC

या यूट्यूब चैनल वरून 1000 पेक्षा जास्त व्हिडिओच्या माध्यमातून नवोदय, शिष्यवृत्ती, एन एम एम एस, सैनिक स्कूल इत्यादी स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे.

तसेच     https://www.gsguruji.in/?m=1    या ब्लॉग वरून घटक निहाय सराव चाचण्या सराव पेपर मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.

रक्तदान शिबिर, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप इ. सामाजिक कार्याबद्दल त्यांचा यापूर्वीही प्रशासनाच्या तसेच विविध संस्था, संघटनांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.

  MSP च्यावतीने सन्मान झाल्याबद्दल राज्यभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कौतुक होत आहे. 




चाचणी क्र 38, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

चाचणी क्र 38 - मराठी उतारे, 

Marathi Utare Test


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर,

 navodaya, scholarship, BTS, Marathi Utare

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा 

चाचणी सबमिट केल्यानंतर शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे.

  सराव चाचणी क्रमांक 38 चे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

विरुद्धार्थी शब्द ( Antonyms) - पाचवी शिष्यवृत्ती मराठी, Opposite words

विरुद्धार्थी शब्द (Antonyms) 

पाचवी आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ,

घटक - शब्दसंपत्ती,

उपघटक - विरुद्धार्थी शब्द, Opposite words,

विरुद्धार्थी शब्द


विद्यार्थी मित्रांनो,
 पूर्व उच्च प्राथमिक तसेच पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विरुद्धार्थी हा शब्द या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात. हा घटक सोपा व्हावा या उद्देशाने यावर आधारित सराव चाचणी उपलब्ध करून देत आहोत.

चाचणी सोडविण्यापूर्वी खाली दिलेल्या व्हिडिओ काळजीपूर्वक पहा.



यापूर्वीच्या घटक निहाय सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


 

चाचणी क्र. 37, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare

चाचणी क्र. 37 - मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, MTS, marathi utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, आय एम विनर, श्रेया, बीटीएस इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यावर आधारित सराव चाचणी सोडवा.

चाचणी SUBMIT केल्यानंतर शेवटी दिलेला स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा.

   

सराव चाचणी क्रमांक 37 ते स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा




नवोदय - भाषा उतारे - चाचणी क्र 36,JNVST, scholarship, BTS, MTS

नवोदय - भाषा उतारे - चाचणी क्र 36,

मराठी उतारे

Marathi Utare,

मराठी उतारे


JNVST, scholarship, BTS, MTS,

Jawahar Navodaya vidyalaya entrance exam, myvision, govardhan shinde, gsguruji


विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयांमध्ये 100% गुण मिळवण्यासाठी मराठी उतारावर आधारित सराव चाचणी नियमित सोडवा.


   सराव चाचणी क्रमांक 36 चे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

चाचणी क्र 35, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS, myvision Jnvst

चाचणी क्र 35, मराठी उतारे, 

Marathi Utare Test


Marathi Utare Test 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, MTS, BDS, myvision Jnvst, govardhan shinde, myvision 

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा आणि 

शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा.

   सराव चाचणी क्रमांक 35 चे स्पष्टीकरणासह उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

BTS Result 2024, बी. टी. एस. निकाल 2024, भारत टॅलेंट सर्च परीक्षा

BTS Result 2024, 

बी. टी. एस. निकाल 2024

BTS result



BTS EXAM Result 2024

Bharat Talent search exam 2024,

दिनांक 29 मार्च 2024 रोजी झालेल्या BTS परीक्षेच्या निकाला संदर्भात अनेक पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून विचारणा होत आहे.

BTS परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर होणार ?

विद्यार्थी मित्रांनो, Edumeet academy ला संपर्क केला असता दि 04 जून 2024 रोजी सकाळी 11:00 वाजता निकाल जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे.

काही तांत्रिक कारणामुळे निकाल जाहीर करण्यास उशीर होत असल्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2024 चा निकाल पाहण्याची लिंक आपणास खाली देत आहोत.

आपला Roll number टाकून निकाल पहावा.

आपला seat number टाकताना सुरुवातीची इंग्रजी अक्षरे 
Code CAPITAL टाकावा




https://www.btsedumeet.com

वरील लिंक वर Click करून आपला निकाल पहा.


BTS EXAM 2025 बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढे दिलेल्या निळ्या अक्षरावर क्लिक करा.

भारत टॅलेंट सर्च परीक्षा 2025




चाचणी क्र. 34, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS, myvision,

चाचणी क्र. 34, मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

navodaya, scholarship, BTS, MTS, BDS, myvision,

Marathi Utare

सर्व स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

चाचणी सोडवल्यानंतर शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिलेला आहे.

  सराव चाचणी क्रमांक 34 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.

चाचणी क्र 33 - नवोदय प्रवेश परीक्षा - भाषा - Navodaya practice test, scholarship utare

चाचणी क्र 33 - नवोदय प्रवेश परीक्षा - भाषा 

मराठी उतारे

नवोदय सराव चाचणी


Marathi Utare 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती सैनिक स्कूल, मंथन,

Navodaya practice test, scholarship utare,


 

चाचणी क्रमांक 32 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS,

चाचणी क्रमांक 32 - मराठी उतारे, 

मराठी उतारे चाचणी


जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, 

Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS,

भाषा विषयांमध्ये 100 % गुण मिळविण्यासाठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी नियमित सोडवा.

Marathi Utare Test

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या.

   
सराव चाचणी क्रमांक 32 सोडवल्यानंतर या चाचणीचे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



चाचणी क्र 31 । my vision navodaya, नवोदय , शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS Jnvst

चाचणी क्र 31,

मराठी उतारे - सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त,

Marathi Utare


my vision navodaya, 

नवोदय , शिष्यवृत्ती, मंथन, BTS, MTS Jnvst,

चाचणी सोडवल्यानंतर शेवटी या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे.

  चाचणी क्रमांक 31 चे स्पष्टीकरण आणि उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा

चाचणी क्र. 30, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, navodaya, scholarship, Marathi Utare

चाचणी क्र. 30, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, आय एम विनर, 

मराठी उतारे


navodaya, scholarship, Marathi Utare, Jnvst, BTS, MTS, BDS 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त भाषा विषयांच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.


चाचणी सोडवल्यानंतर शेवटी खाली या चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ दिलेला आहे.

   

सराव चाचणी क्रमांक 30 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



चाचणी क्र.29, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, श्रेया,

चाचणी क्र.29 -  मराठी उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया

navodaya, scholarship, BTS, MTS, Jnvst, Marathi Utare 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती पाचवी आठवी साठी उपयुक्त मराठी उतारांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या सराव चाचण्या सोडवण्यासाठी येथे क्लिक करा.

  

चाचणी क्रमांक 29 चे स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



चाचणी क्रमांक 28, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS

सराव चाचणी क्रमांक 28,

मराठी उतारे,

मराठी उतारे


Marathi Utare,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, मंथन, सैनिक स्कूल, श्रेया, BTS, MTS, BDS, इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी मराठी विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून सोडवा.




चाचणी सोडवल्यानंतर खाली दिलेला चाचणीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ पहा

चाचणी क्रमांक 27, मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS EXAM

चाचणी क्रमांक 27, 

Marathi Utare


मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, 

Jnvst, navodaya, scholarship, BTS, MTS, BDS EXAM,

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा,

Jawahar Navodaya vidyalaya entrance exam.

भाषा विषयांमध्ये शंभर टक्के गुण मिळविण्यासाठी सराव चाचणी सोडवा आणि 

चाचणी सबमिट केल्यानंतर शेवटी या चाचणीचे स्पष्टीकरणाचा व्हिडिओ खाली दिला आहे तो पहा.


   
चाचणी क्रमांक 27 चे स्पष्टीकरण व उत्तरे पाहण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा.



जागतिक रेड क्रॉस दिन विशेष प्रश्नमंजुषा, world Red cross Day Quiz

जागतिक रेड क्रॉस दिन विशेष प्रश्नमंजुषा,

World Red cross Day special Quiz

World Red cross Day


इंग्रजी व मराठी भाषेत असलेली एकमेव प्रश्नमंजुषा.


शिष्यवृत्ती, नवोदय, मंथन, I am winner, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, शिक्षक भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती, MPSC व इतर स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त जनरल नॉलेज टेस्ट सोडवा.

3000 पेक्षा जास्त जनरल नॉलेज प्रश्न सोडविण्यासाठी खाली दिलेल्या पेजला भेट द्या

 

चाचणी क्र 26 । माय व्हिजन नवोदय। Navodaya practice paper, marathi utare

नवोदय सराव चाचणी क्रमांक 26,

Navodaya practice test 26,

Marathi Utare, jnvst,

 मराठी उतारे सोडवा, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, सैनिक स्कूल, MTS, Jnvst, navodaya, BTS, इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी उतारांवर आधारित सराव चाचणी सोडवा.


नवोदय सराव चाचणी


  

उन्हाळी सुट्टीतील घरचा अभ्यास pdf

उन्हाळी सुट्टीतील घरचा अभ्यास pdf 



विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मित्रांनो,

 उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये उन्हात इकडे तिकडे न फिरता दुपारच्या वेळी खाली दिलेली पीडीएफ डाउनलोड करा प्रिंट करा आणि आपल्या वेळेनुसार सोडवा.

खाली दिलेल्या निळ्या लिंकवर CLICK करा आणि वर्गनिहाय PDF download करून print काढा आणि सराव करा.


उन्हाळी सुट्टीतील अभ्यास PDF
इयत्ता अभ्यास PDF
पहिलीCLICK HERE
दुसरीCLICK HERE
तिसरीCLICK HERE
चौथीCLICK HERE
पाचवीCLICK HERE
सहावीCLICK HERE
सातवीCLICK HERE
आठवीCLICK HERE
अप्रगत मुलांसाठी CLICK HERE




सौजन्य - अभिजीत कांबळे सर, नितीन पवार सर

5वी/8वी शिष्यवृत्ती अटी व शर्ती अपडेट शुद्धीपत्रक

5वी/8वी शिष्यवृत्ती अटी व शर्ती अपडेट शुद्धीपत्रक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धीपत्रक.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक:- एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

दिनांक :- ०७ मे, २०२४

संदर्भ :-

१) शासन निर्णय क्र. एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि.१५.११.२०१६

२) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे दि.२९.०५.२०२३ व दि.०६.०२.२०२४ रोजीचे पत्र.

शासन शुद्धीपत्रक :-

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी."

याऐवजी

"मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे

शिष्यवृत्ती


सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०५०७१४२७२२७४२१ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करून वाचा

https://drive.google.com/file/d/1tCdjD06deHgPjMzXfX7SoYWNl4NO5LyE/view?usp=drivesdk

 माहितीस्तव

सौजन्य -  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

नाम व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 02,शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, Grammar of Marathi Language,parts of speech noun

संपूर्ण मराठी व्याकरण - कार्यात्मक व्याकरण 

माय व्हिजन पाचवी आठवी शिष्यवृत्ती/नवोदय/सैनिक स्कूल/मंथन/BTS, MTS, Jnvst इ. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त व्याकरण 

खाली दिलेली चाचणी सोडविण्यापूर्वी हा व्हिडिओ पहा आणि नंतर चाचणी सोडवा.




नाम व त्यांचे प्रकार-सराव चाचणी 02

नाम व त्यांचे प्रकार


  शब्दांच्या जाती,

यापूर्वीच्या मराठी व्याकरणावर आधारित चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.


चाचणी क्र 25 । नवोदय । भाषा । Navodaya practice test । scholarship, JNVSt,

नवोदय सराव चाचणी 25,

Navodaya practice test 25,



मराठी उतारे सोडवा,

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,
यापूर्वीची चाचणी खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा,


  
नवोदय सराव चाचणी

NEET 2024 Answer key All code

NEET 2024 Answer key All code

दिनांक 5 मे 2024 रोजी झालेल्या नीट परीक्षेची संभाव्य उत्तरसूची खाली दिलेली आहे.

NEET EXAM 2024


Code T5

Neet 2024


NEET 2024 - Answer key - ALL CODE PDF 



LIVE स्पष्टीकरण पाहण्यासाठी खाली दिलेल्या YOUTUBE LINK वर CLICK करा.


PW - Live paper Discussion पाहण्यासाठी

https://www.youtube.com/live/STUAIWx_m7Q?si=VoCWPFLjEta52YOA


AAKASH Class Live discussion पाहण्यासाठी

https://www.youtube.com/live/ey74e6o1hYM?si=-WoxCyOYcl3uIz1n

ALLEN LIVE Discussion पाहण्यासाठी

https://allen.in/neet-answer-key-solutions

RCC live discussion पाहण्यासाठी


IIB LIVE Discussion पाहण्यासाठी 


नाम व त्यांचे प्रकार - चाचणी क्रमांक 01,शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण, भाग - 1 Grammar of Marathi Language,parts of speech,noun

संपूर्ण मराठी व्याकरण,

नाम व त्यांचे प्रकार,

शब्दांच्या जाती,

संपूर्ण मराठी व्याकरण

नाम घटक समजून घेण्यासाठी चाचणीच्या शेवटी दिलेला व्हिडिओ पहा आणि मग नंतर खाली दिलेली सराव चाचणी सोडवा.



सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त मराठी व्याकरण चाचण्या सोडवा.

विविध स्पर्धा परीक्षांमध्ये शब्दांच्या जाती - नाम यावर आधारित अनेक प्रश्न विचारले जातात परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेली खाली दिलेली सराव चाचणी सोडवा.


Parts of speech - Noun 
  



चाचणी क्र 24 । नवोदय, स्कॉलरशिप । भाषा । Navodaya test, marathi uttare,

नवोदय सराव चाचणी 24,

Navodaya practice test 24,

मराठी उतारे सोडवा, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,

शिष्यवृत्ती, मंथन, श्रेया, एम विनर, एम टी एस, बी टी एस इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त मराठी उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

  
नवोदय सराव चाचणी

वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्या वर आधारित प्रश्न - चाचणी क्रमांक 03, माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 5th scholarship Practice Test,news,advertise questions

चाचणी क्रमांक 03 - वृत्तपत्रातील जाहिरात व बातम्या वर आधारित प्रश्न, 

पाचवी शिष्यवृत्ती मराठी


माय व्हिजन शिष्यवृत्ती - भाषा , 

5th scholarship Practice Test,
news,advertise questions 

यापूर्वीच्या चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

  

चाचणी क्र 23 । नवोदय,स्कॉलरशिप भाषा । Practice Test 23 । मराठी उतारे सोडवा, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन,marathi utare, Jnvst

नवोदय सराव चाचणी क्रमांक 23,

Navodaya practice test 23,

मराठी उतारे, Marathi Utare, jnvst,




विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा स्कॉलरशिप मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाच्या उताऱ्यांवर आधारित सराव चाचणी सोडवा.

 यापूर्वीची चाचणी सोडवली नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.





  




संख्याज्ञान - गणित शिष्यवृत्ती,नवोदय,सैनिक स्कूल, मंथन,5th scholarship, navodaya, Sainik school, BTS, MTS

पाचवी - शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल, मंथन, BTS , MTS इत्यादी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त.

विषय - गणित 

घटक - संख्याज्ञान - संख्यांचे वाचन व लेखन,

 
Scholarship Math

 

Number work & Numbers - 8th scholarship, sainik school

8th Scholarship Eng Medium

Online Test Series

Unit 1 - Number work

Sub Unit 
Number work & Numbers - Test 01 

Scholarship


  

1ली ते 8वी मोफत पाठयपुस्तके 2024-25 वितरण बाबत शासन परिपत्रक

 अतितात्काळ/प्राधान्याने/महत्वाचे

जा.क्र. मप्राशिप/सशि/मोपापु/काअ/२०२४-२५/१३९७

दिनांक: 2 MAY 2024

वाचा :

- १) बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम - २००९

२) महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार नियम - २०११

३) भारत सरकारच्या प्रकल्प मान्यता मंडळ (PAB) च्या बैठकीचे इतिवृत्त दि.०५/०४/२०२४ व दि.१०/०४/२०२४.

प्रति,

१) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व

२) शिक्षणाधिकारी/प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, सर्व.

३) समग्र शिक्षा विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई.

विषय : समग्र शिक्षा अभियानांतर्गत सन २०२४-२५ मध्ये इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याबाबत.

प्रस्तावनाः- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ ची अमलबजावणी सन २०१८-१९ पासून समग्र शिक्षा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.



प्राथमिक शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व शालेय शिक्षणातील विदयार्थ्यांचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व शासन अनुदानित शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याकरीता केंद्रशासनाकडून मंजूरी मिळालेली आहे.

पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती, पुणे ही संस्था करते. सदर पाठ्यपुस्तक मंडळाकडून इ. १ ली ते ८ वी करीता मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड, तेलगु, सिंधी अरेबी, तामिळ व बंगाली माध्यमातील पाठ्यपुस्तकांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या मे. शिरिष कार्यों सर्व्हिसेस प्रा.लि. मुंबई या वाहतूकदारांकडून बालभारती गोडाऊन ते तालुका स्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

२. पाठ्यपुस्तक योजनेचे आर्थिक निकष :

२.१) सन २०२४-२५ मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता प्राथमिक स्तर (इ. १ ली ते ५ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु. २५०/- व उच्च प्राथमिक स्तर (इ. ६ वी ते इ. ८ वी) प्रति विद्यार्थी सरासरी रु. ४००/- या दराने एकूण १,०१,५१,२६५ विद्यार्थ्यांसाठी रु. ३१५३३.४४५५०/- लाख तरतूद व पी एम श्री अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता १,३९,१५५ विद्यार्थ्यांसाठी एकूण रु. ४२१.८५२५०/- लाख तरतूद अशी एकूण १,०२,९०,४२० विद्यार्थ्यांसाठी रु. ३१९५५.२९८०२/- लाख तरतूद केंद्रशासनाकडून मंजूरी देण्यात आलेली आली आहे.

२.२) या कार्यालयाकडून निश्चित केलेल्या व शासनाने मान्यता दिलेल्या " शिरीष कागों सर्व्हिसेस प्रा. लि.. मुंबई या वाहतूकदाराकडून, विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार ते तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांची वाहतूक करण्यात येणार आहे.

२.३) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तदअनुषंगीक खर्च (पुस्तकांची चढाई, उतराई हमाली खर्च इ.) देय तरतूद राज्य स्तरावरून अदायगी करण्यात येईल.

२.४) तालुका ते शाळास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांच्या वाहतूकीचा खर्च व तद्नुषंगिक खर्च (पुस्तके चढाई व उतराई, हमाली खर्च इ.) संबंधित जिल्हा / तालुकास्तरावरून सर्व वित्तीय नियमांचे पालन करून निविदा प्रक्रियेद्वारे करावी व त्या वाहतूकीचा दर हा शालेय पोषण आहार योजनेच्या तांदूळ वाहतूकीच्या दराप्रमाणे म्हणजेच प्रती किग्रॅ रु.१.५०/- चे मर्यादेतच करण्याची दक्षता घेण्यात यावी. प्रती किग्रॅ रु.१.५० /- पेक्षा जास्त वाहतूक दर मान्य केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.

२.५) सन २०२४-२५ ची तालुका ते शाळास्तरापर्यंतची पाठ्यपुस्तकांची वाहतूक व तद्नुषंगिक खर्चाची देयके सन २०२४-२५ याच आर्थिक वर्षात समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके या लेखाशिर्षाखाली निकाली काढण्यात यावी. सदर देयकांच्या अदायगी, पुढील आर्थिक वर्षात अनुज्ञेय राहणार नाही. याबाबतच्या खर्चाची माहिती या कार्यालयाकडून यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये या कार्यालयास गाहे जुलै २०२४ अखेरपर्यंत पाठविण्यात यावीत. सदर प्रमाणपत्रे सादर करण्यास कोणताही विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

३. पाठ्यपुस्तकांची मागणी व वाहतूक :

३.१) सन २०२४-२५ साठी पाठ्यपुस्तकांची मागणी पाठ्यपुस्तक मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने यापूर्वीच करण्यात आलेली आहे. विद्यार्थी संख्येपेक्षा जादा पाठ्यपुस्तकांच्या देयकांची अदायगी केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

३.२) सन २०२४-२५ मध्ये विभागीय बालभारती पाठ्यपुस्तके भांडार (गोदाम) ते तालुकास्तरापर्यंतची वाहतूक राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांचे कार्यालयामार्फत निश्चित केलेल्या वाहतूकदाराकडून करण्यात येणार आहे.

३.३) पाठ्यपुस्तके शाळांना पोहोच केल्यानंतर याबाबतच्या सर्व पोहोच पावत्या व खर्चाची देयके संबंधित गट शिक्षणाधिकारी यांनी शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद यांचेकडे एका महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

३.४) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, सर्व तसेच शिक्षणाधिकारी प्रशासन अधिकारी, महानगरपालिका सर्व यांनी पोहोच पावत्या व झालेल्या खर्चाचे देयके प्रति स्वाक्षरीत करून वाहतूकदारांची देयके त्याच आर्थिक वर्षात म्हणजेच सन २०२४-२५  मध्ये तात्काळ अदा करण्याची कार्यवाही करावी. कोणत्याही परिस्थितीत सदर देयकांची प्रदाने दि.३१/०३/२०२५ नंतर अनुज्ञेय रहाणार नाहीत. सदर वाहतूकीसाठी, वाहतूकीपूर्वी कोणत्याही स्वरूपाचे अग्रीम अनुज्ञेय नाही, याची नोंद घ्यावी.

(४) पाठ्यपुस्तके वितरणाची कार्यवाही :

४.१) शाळा सुरु होण्यापूर्वी, विद्यार्थ्याचे पालक, विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तके खरेदी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सर्व पालक व विद्यार्थ्यांना माहिती व्हावी या अनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके वितरीत करण्यात येणार आहेत, याबाबतची पूर्वसूचना ठळक अक्षरात शाळेच्या दर्शनी भागावर व सर्वाना दिसेल अशा ठिकाणी फलकावर (Board) वर लिहिण्यात यावी. मराठी शिवाय इतर माध्यमांच्या शाळांमध्ये माध्यमानुसार अन्य भाषेत देखील सदर सूचना लिहिण्यात यावी. आपल्या शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या सभासद, माता पालक संघ यांची एकत्रितपणे सभा घेऊन मोफत पाठ्यपुस्तक योजना व वितरणाबाबतची माहिती देण्यात यावी. पालकांना आपल्या वास्तव्याच्या परिसरात व त्यांचे कार्यक्षेत्रात सदर माहितीचा प्रसार करणेबाबत सूचना देण्यात याव्यात.

४.२) याकरीता शक्य झाल्यास मोफत पाठ्यपुस्तके योजनेबाबत, आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व प्रसार माध्यमांचे सहकार्य घेऊन सदर उपक्रमाच्या अनुषंगाने विनामूल्य प्रसिद्धी द्यावी.

४.३) कोणत्याही विनाअनुदानित शाळेस सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय असणार नाही, याची नोंद घ्यावी.

(५) पाठ्यपुस्तकांचा पुरवठा :

५.१) तालुका स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर ते तात्काळ माध्यमनिहाय, इयत्तानिहाय व विषयनिहाय संच वर्गीकरण करून घ्यावेत व संबंधित शाळांकडे विनाविलंब वित्तरण करण्यात यावेत. पुस्तके तालुकास्तरावर आल्यानंतर त्याचे उपरोक्तनुसार वर्गीकरण झाल्याशिवाय गटसमन्वयकांचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी यांनी कार्यालय सोडू नये.

५.२) शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला पाठ्यपुस्तक वितरणापूर्वी शाळानिहाय, वर्गनिहाय, माध्यमनिहाय, पंचायत समिती निहाय पात्र विद्यार्थ्याची यादी तयार ठेवावी आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात यावे. सदरचा पाठ्यपुस्तके वितरणाचा दिवस पुस्तक दिन (Book Day) म्हणून साजरा करणेबाबत संबंधितांना सूचित करण्यात यावे. संपूर्ण जिल्हयात एकाच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होईल, याबाबत नियोजन करण्यात यावे. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व निकष पात्र शाळांना अशा प्रकारच्या सूचना तात्काळ निर्गमित करण्यात याव्यात.

५.३) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा होईल यांचे नियोजन करून वेळापत्रकाची एक प्रत या कार्यालयास पाठविण्यात यावी.

५.४) विभागीय शिक्षण उपसंचालकांनी आपल्या स्तरावर, त्यांच्या विभागातील जिल्हयांची व महानगरपालिकांची पाठ्यपुस्तकांची मागणी, पुरवठा आणि वित्तरण याबाबतचे पंचायत समिती तसेच, शाळा निहाय नियोजन करण्यासाठी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद (प्राथमिक), महानगरपालिकांचे, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांची बैठक आयोजित करावी. नियोजन करताना सभेच्या वेळी पाठ्यपुस्तकांच्या संबंधित भांडार प्रमुखांनाही आमंत्रित करावे जेणेकरून पाठ्यपुस्तकांच्या पुरवठ्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत.

५.५) पाठ्यपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी, शाळा / पंचायत समिती स्तरावर ठेवण्यात याव्यात.

५.६) पाठ्यपुस्तके वितरणासंदर्भातील नोंदी लिहीतांना त्यामध्ये कोणत्याही प्रकारे खाडाखोड होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

(६) पाठ्यपुस्तकाची साठवणूक :

६.१) ज्या जागेवर पुस्तके उत्तरावयाची आहेत, ती जागा निश्चित करताना सदरची जागा प्रशस्त असणे आवश्यक आहे याची नोंद घ्यावी. पुस्तकांचे वाटप पंचायत समिती / वार्डातून करावयाचे असल्याने पुस्तकांच्या वर्गीकरण करुन त्यांच्या थप्प्या रचता येतील याची खातरजमा करण्यात यावी. सदरची जागा सुस्थितीत/सुरक्षित असावी. पुस्तके पुरवठा करण्यापूर्वीचा काळ पावसाळयाची सुरुवात होण्याचा काळ असल्याने पाऊस आल्यास पुस्तके भिजणार नाहीत याची दक्षता घेऊन पुस्तके उत्तरविण्यात यावीत. त्याबाबतची आवश्यक व्यवस्था आधीच करावी.

६.२) पंचायत समिती स्तरावरून शाळांना पुस्तकांचे वाटप करावयाचे आहे. याकरीता, पुस्तके ट्रकमध्ये चढवणे आणि उतरवून देणे यासाठी ट्रक येऊ शकेल एवढा मोठा रस्ता निश्चित केलेल्या जागेपर्यंत उपलब्ध असावा. गरज पडल्यास सदरचे काम रात्रीच्या वेळी करावे लागेल म्हणून विजेची व्यवस्था असणे आवश्यक राहील.

(७) पाठ्यपुस्तके वाटपाचे वेळापत्रक

७.१) सर्व पुस्तके माध्यमनिहाय, इयत्ता निहाय आणि पंचायत समितीनिहाय वेगळी करण्यात यावीत आणि ती ठराविक दिवशी संबंधित पंचायत समितीला / वार्डाला वेळेत पोहचविण्यात यावीत.

७.२) पुस्तकाचे वाटप करण्यासाठी पुढील स्वरूपात वेळापत्रक निश्चित करण्यात यावे. जेणेकरून त्या स्तरावर पुस्तके उत्तरवण्यास अधिकारी / कर्मचारी उपस्थित राहतील व वेळेचा अपव्यय होणार नाही. पाठ्यपुस्तके जून महिन्यात शाळा सुरु होण्यापूर्वी सात दिवस अगोदर शाळास्तरावर उपलब्ध होणे आवश्यक आहे.

क्र. वाटपाचे ठिकाण

१ पाठ्यपुस्तक स्तरावरून समिती वार्डाना

पाठ्यपुस्तके वाटपाचा दिनांक

भांडार दि.३१/०५/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर

पंचायत विभागातील जिल्हयांसाठी) दि. १५/०६/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी)

२ पंचायत समिती / वार्ड स्तरावरून शाळांना

३. दि. ०७/०६/२०२४ पर्यंत (अमरावती व नागपूर विभाग वगळता इत्तर विभागातील जिल्हयांसाठी) दि. २२/०६/२०२४ (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी)

शाळा विद्यार्थ्यांना स्तरावरून

दि. १५/०६/२०२४ (अमरावती व नागपूर विभाग वगळता इतर विभागातील जिल्हयांसाठी) दि.०१/०७/२०२४ (अमरावती व नागपूर विभागातील जिल्हयांसाठी)


(८) पंचायत समिती / वार्ड स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वाटप :

८.१) पुस्तके प्राप्त होण्यापूर्वीच कोणत्या जागी पुस्तके उत्तरावयाची आहेत. हे त्या स्तरावर प्रत्यक्षपणे जागेस भेट देऊन निश्चित करावे. ही जागा निवडताना सुद्धा वर नमूद केलेल्या सूचनाचे पालन करावे त्याचप्रमाणे प्रत्येक पंचायत समिती / वार्ड स्तरावर कोणत्या शाळेत कोणत्या माध्यमाची आणि कोणत्या इयत्तेची कित्ती पुस्तकांची आवश्यकता आहे याबाबतचा तपशिल तयार करावा जेणेकरुन वाटप सोयीचे होईल.

८.२) पंचायत समिती स्तरावर त्यांना प्राप्त झालेल्या पुस्तकांची मोजणी करून आवश्यक तेवढी पुस्तके प्राप्त झाली किंवा नाही याची खातरजमा करावी.

८.३) पुस्तके कमी-अधिक असल्यास तात्काळ संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यास कळवावे.

८.४) प्राप्त पुस्तकांचे इयत्तानिहाय, माध्यमनिहाय आणि शाळानिहाय वर्गीकरण करण्यात यावे.

८.५) ज्या शाळांसाठी जी जागा निश्चित केली असेल त्याच ठिकाणी ती पुस्तके ठेवण्यात यावी.

८.६) पुस्तकांचे वाटपाचे नोंद रजिस्टर, पंचायत समिती / वार्ड स्तरावर ठेवावे व पुस्तके प्राप्त झाल्यावर त्यावर मुख्याध्यापकांची व त्यांनी प्राधिकृत केलेल्या प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी. सदर नोंद रजिस्टरची पडताळणी नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकाऱ्यांनी करावी.

८.७) पाठ्यपुस्तके वाटपाचे नोंद रजिस्टरमध्ये कोणत्याही स्वरुपात खाडाखोड होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा रजिस्टर प्रपत्राचा नमूना


(९) पुस्तकांचे विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक वितरण :

९.१) प्रथम सत्राच्या ज्या दिवशी शाळा सुरु होईल त्या दिवशी, उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वितरण मुख्याध्यापक करतील.

९.२) पुस्तके वितरणाच्या वेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, संस्थेचे पदाधिकारी आणि इत्तर शिक्षण प्रेमी नागरीक यांना उपस्थित राहण्याबाबत मुख्याध्यापकानी निमंत्रित करावे आणि त्यांचे उपस्थित सभारंभपूर्वक पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे.

९.३) पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थी शाळेत न आल्यास ज्या दिवशी विद्यार्थी प्रथमतः शाळेत येईल त्या दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात यावीत. तसेच नंतर जस जसे विद्यार्थी शाळेत प्रवेश घेतील तस तसे प्रवेशाच्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात यावीत.

९.४) समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांकरीता असलेल्या निकषपात्र शाळांमध्ये शाळाबाहय विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असल्यास, सदर विद्यार्थ्यास शिल्लक असलेल्या पाठ्यपुस्तकांमधून, पाठ्यपुस्तके देण्यात यावीत. पुस्तके उपलब्ध नसल्यास वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून, शाळाबाहय विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे.

(१०) पाठ्यपुस्तके वितरणाचा अहवाल सादर करणे :

१०.१) पुस्तकांचे वितरण झाल्यानंतर पुस्तके वितरणाचा अहवाल शाळांनी पंचायत समिती, पंचायत समित्यांनी जिल्हा परिषदांना व जिल्हा परिषदांनी / महानगरपालिकांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई कार्यालयास शाळा सुरु झाल्यानंतर सात दिवसात पाठवावा. सदर माहिती शासनास सादर करावयाची असल्याने उपरोक्त अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी.

१०.२) शाळेत पहिल्या दिवसापासून पुढील आठ दिवसातील पाठ्यपुस्तकांच्या वाटपाचा आढावा घेण्यात यावा. विद्यार्थी संख्या आणि वाटप यात तफावत दिसून आल्यास, त्याचप्रमाणे काही शाळांत काही इयत्तांची पाठ्यपुस्तके अधिक तर काही ठिकाणी कमी पडण्याची शक्यता दिसून आल्यास, जिल्हा परिषद, क्षेत्रात केंद्रप्रमुख / शिक्षण विस्तार अधिकारी यांनी, तर नगरपालिका / महानगरपालिका क्षेत्रात त्यांचे वरिष्ठ पर्यवेक्षीय अधिकारी यांनी आढावा घेतल्यानंतर जास्त पुस्तके असलेल्या शाळांतून कमी पुस्तके असलेल्या शाळांमध्ये समायोजन करावे आणि याबाबत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पंचायत समिती / महानगरपालिकेला कळविण्यात यावा.

१०.३) पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक गुणवत्ता यांचा घनिष्ठ संबंध आहे, सदर बाब लक्षात घेऊन प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाही अत्यंत दक्षतेने पार पाडणे आवश्यक आहे. आपल्या जिल्हा परिषद / महानगरपालिका क्षेत्रात पात्र लाभार्थ्यांपैकी कोणत्ताही लाभार्थी विद्यार्थी पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

१०.४) पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी व कोणत्याही परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व लाभार्थी विद्यार्थ्यांना पुस्तके वितरीत करण्यात यावीत. याबाबत आपल्या अधीनस्त सर्व अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात यावे. ज्या अधिकाऱ्यांकडून उपरोक्तनुसार कार्यवाही न झाल्यास त्यांचेवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

१०.५) सदर योजना योग्यरितीने राबविता यावी, यासाठी ठळक मुद्दयाची पद्धत्ताळणी परिशिष्ठ १ मध्ये मार्गदर्शनासाठी देण्यात आलेली आहे. त्याचा उपयोग करण्यात यावा.

(११) पत्रकार परिषद :

११.१) शिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, शिक्षण प्रमुख, शिक्षण निरीक्षक यांनी आपल्या स्तरावर समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविली जाणार आहेत. ही माहिती देण्यासाठी शाळा सुरु होण्याच्या सर्वसाधारणपणे ०५ दिवस अगोदर त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करावी.

११.२) सर्वापर्यंत सूचना पोहोचण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे त्या त्या विभागात प्रकाशित होणारी दैनिक वृत्तपत्रे. या माध्यमातून जर सदर माहिती सर्वापर्यंत पोहोचवली तर निश्चितच त्याचा फायदा होईल आणि शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी प्रत्येक पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळेल.

११.३) पत्रकार परिषदेच्या वेळी पाठ्यपुस्तके वितरणाचे नियोजन, विद्यार्थ्यांची संख्या, विद्यार्थ्यांपर्यंत पाठ्यपुस्तके पुरविण्यासाठी करण्यात येणारी कार्यवाही इ. ची सविस्तर माहिती देण्यात यावी. सोबत प्रेस नोटचा नमूना परिशिष्ट २ मध्ये मार्गदर्शनासाठी दिला आहे. त्यात जिल्हा परिषद अथवा महानगरपालिका संदर्भात योग्य ती माहिती भरून त्याची स्वच्छ प्रत तयार करावी व त्याच्या आवश्यक तेवढ्या प्रती पत्रकार परिषदेच्या वेळी वाटण्यात याव्यात.

११.४) प्रेसनोटमध्ये आपल्या जिल्हयातील परिस्थितीनुसार काही बदल आवश्यक वाटल्यास आवश्यक तो बदल करण्यास हरकत नाही.

(१२) पाठ्यपुस्तके वाटपाबाबतचा अहवालः

१२.१) पाठ्यपुस्तक मंडळाकडून जसजशी पाठ्यपुस्तके प्राप्त होतील त्या त्या चेळी या कार्यालयास त्वरित कळविणे आवश्यक आहे.

१२.२) पत्रकार परिषदेत वितरण केलेल्या, प्रेस नोटची प्रत, पत्रकार परिषद घेतल्याबाबतचा अहवाल विभिन्न वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीची मूळ कात्रणे, पाठ्यपुस्तके वितरणाची छायाचित्रे इ. व्यवस्थित बाईडिंग करून घ्यावी. त्यास योग्य ते शिर्षक द्यावे व त्याची पुस्तिका तयार करावी. सदर पुस्तिका या कार्यालयास सादर करण्यात यावी.

१२.३) पाठ्यपुस्तकांचे वितरण झाल्यानंतर आपल्या जिल्हयात समग्र शिक्षा अभियानाची पाठ्यपुस्तके वाटण्याच्या कार्यक्रम कशा पद्धतीने करण्यात आला याबद्दलचे काही अनुभव आणि पाठ्यपुस्तक वितरणाची निश्चित आकडेवारी या बाबतीतला वृत्तांत माहितीसाठी वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावा. या प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची मूळ कात्रणेसुद्धा या कार्यालयास बाईडिंग करून पाठविण्यात यावीत. शक्यतो पाठ्यपुस्तक वितरणाचे चांगल्या प्रतीचे चित्रफीत (Video Recording) तयार करण्यात यावे व ते या कार्यालयास उपलब्ध करून दिल्यास सर्वोत्कृष्ट व्हिडीओ शगुन पोर्टलवर अद्ययावत करण्यात येतील.

(१३) मोफत पाठ्यपुस्तके पुरवठा योजनेतील जबाबदार अधिकारी :

१३.१) समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्याच्या, वरीलप्रमाणे तपशीलवार सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी बाराकाईने अभ्यासाव्यात.

१३.२) शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी इयत्ता १ ली ते ८ वी मध्ये शिकणाऱ्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप होईल, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी.

स्तर

जबाबदार अधिकारी

शाळा

मुख्याध्यापक

केंद्र नगरपालिका

/ केंद्र प्रमुख / प्रशासन अधिकारी 

तालुकागट समन्वयक पदाचा प्रभार असलेले शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी (बृहन्मुंबईसाठी शिक्षण निरिक्षकांच्या कार्यक्षेत्रातील संबंधित उपनिरीक्षक / शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी हे त्यांच्या वार्डासाठी जबाबदार राहतील.)

जिल्हा

शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

महानगरपालिका शैक्षणिक विभाग

महानगरपालिका, शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व

उपरोक्त उद्दिष्ट साध्य करणे ही संबंधित अधिकाऱ्यांची वैयक्तिक जबाबदारी असेल. यात कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांचे कर्तव्य पालनात गंभीर कसूर केल्याचे मानण्यात येईल आणि त्या अधिकाऱ्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

क्षेत्रीय भेटी दरम्यान मोफत पाठ्यपुस्तके योजनेची अंमलबजावणी, समग्र शिक्षा अभियान अंमलबजावणी आराखड्यातील मार्गदर्शक सूचनानुसार तसेच राज्य कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे शाळा स्तरावरून होत आहे याची खात्री करण्यात येईल. मार्गदर्शक सूचनांनुसार शाळा स्तरावरून सर्व निकष पात्र लाभार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा लाभ देणे आवश्यक आहे. पाठ्यपुस्तक योजनेपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. सदर योजनेच्या बाबत्तीत कुठल्याही प्रकारच्या तक्रारी, लोकसभा / राज्यसभा / विधानसभा / विधान परिषद तारांकित / अतारांकित प्रश्न तसेच लेखा आक्षेप उपस्थित होणार नाहीत. याबाबतची दक्षता घेऊन अंमलबजावणी करावी.

संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

जुनी पेन्शन अंमलबजावणी कार्यवाही बाबतचे शासनाचे परिपत्रक,Government Circular regarding Old Pension Implementation Proceedings,

जुनी पेन्शन अंमलबजावणी कार्यवाही बाबतचे शासनाचे परिपत्रक,

दिनांक 02 मे 2024

Government Circular regarding Old Pension Implementation Proceedings, 


दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ लागू करताना अवलंबावयाची कार्यपध्दती.

Old pension


महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन परिपत्रक क्रमांक: संकीर्ण-२०२४/प्र.क्र.१८/सेवा-४ हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई ४०००३२.

दिनांक: ०२.०५.२०२४.

वाचा :-

१) शासन परिपत्रक, वित्त विभाग, क्रमांक- अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/ सेवा ४, दिनांक २८.०७.२०१७.

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- संकीर्ण-२०२३/प्र.क्र.४६/ सेवा ४, दिनांक ०२.०२.२०२४.

प्रस्तावना :-

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ०२.०२.२०२४ अन्वये दि.०१.११.२००५ पूर्वी पदभरती जाहिरात / अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१.११.२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी च्या तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत.

त्यानुसार जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडतील, त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती निश्चित करावयाची बाब शासनाचे विचाराधीन होती.

शासन परिपत्रक :

ज्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जुनी निवृत्तिवेतन योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या प्रकरणी सदर अधिकारी / कर्मचारी यांची राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणून करावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२, महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतनाचे अंशराशीकरण) नियम, १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी लागू करण्याबाबत विकल्प संबंधित राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्याकडे सादर करावा. विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांनी संबंधित विकल्प अर्जाची तपासणी करुन प्रस्तुत कर्मचारी यांची नियुक्ती संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक २ अनुसार दि.०१.११.२००५ पूर्वीच्या जाहिरातीवर आधारित आहे हे निश्चित करुन असे प्रस्ताव नियुक्ती प्राधिकारी यांचेकडे सादर करावेत.

नियुक्ती प्राधिकारी यांनी संबंधित कर्मचारी हा अन्य सेवेतून आपल्या विभागातील सेवेत रुजू झाला आहे किंवा कसे याची खात्री करुन त्याची पूर्वीची सेवा राज्य शासनाच्या सेवेस जोडून देण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत किंवा कसे याची निश्चितता करावी.

ज्या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्यात आलेली नाही, अशी तपासणी अंती खात्री झाल्यास नियुक्ती प्राधिकाऱ्याने प्रथम संबंधित कर्मचाऱ्याची सेवा जोडून देण्याचे प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन संबंधित प्रशासकीय विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास सादर करावेत. एकूणात सेवा जोडून दिल्यानंतरच उक्त दि.०२.०२.२०२४ च्या आदेशामधील तरतूदीनुसार नियुक्ती प्राधिकाऱ्याने कार्यवाही करावी.

यासंदर्भात असेही स्पष्ट करण्यात येते की, शासन परिपत्रक, क्रमांक संकीर्ण-२०१९/प्र.क्र.३२०/सेवा- ४, दि.१३.११.२०२० अन्वये शासकीय कर्मचाऱ्याच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेच्या खात्यात जमा असलेल्या रकमेपुरता प्रान खाते जोडून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. प्रस्तुत सूचना संबंधित कर्मचाऱ्याला दि.०२.०२.२०२४ च्या शासन निर्णयान्वये अनुज्ञेय ठरणाऱ्या लाभासाठी विचारात घेऊ नयेत.

२. उपरोक्तप्रमाणे विकल्प निवडलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली मधील खाते तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करावी.

३. अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या प्रान (PRAN) खात्यातील संचित रक्कमेपैकी केवळ अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम त्याचे भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करणे व नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम शासनाचे खाती जमा

करण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात येत आहे-

१) दि.०१.११.२००५ रोजी व त्यानंतर राज्य शासनामध्ये रुजू झालेल्या अधिकारी / कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दि.०२.०२.२०२४ अन्वये वरील योजना लागू करण्यात आले आहेत, अशा प्रकरणी राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील संचित निधी परतावा मंजूर करण्यात यावा.

२) याबाबत संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याने त्यांचे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यातील जमा अंशदान रक्कमेचा परतावा मिळण्याबाबत मागणी करावी.

३) आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास वरील योजना लागू झाल्याबाबत स्वयंस्पष्ट आदेशाची प्रत, त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीच्या खात्यावरील

कर्मचाऱ्याचे अंशदान, नियोक्त्याचे अंशदान आणि त्यावरील लाभ यांच्या संपूर्ण तपशीलासह अधिकारी / कर्मचाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करुन त्यातील रक्कमांची मागणी करावी.

४) संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रक्कमांबाबत कोषागारातील अभिलेख आणि Protean/NSDL च्या संकेतस्थळावरील रक्कम याची पडताळणी करावी.

५) अशा प्रकरणी नियोक्त्याचे अंशदान व त्यावरील लाभ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यास देय ठरत नाहीत. केवळ संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान आणि त्यावरील लाभ अनुज्ञेय ठरतात. त्यानुसार संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या "प्रान" (PRAN) क्रमांकावरील संचित (जमा झालेला) निधी संबंधित कोषागार अधिकारी यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण यांच्याकडे

ERM सुविधेद्वारे परत मिळण्याची मागणी करावी.

६) राज्य अभिलेख देखभाल अभिकरणाने संचित निधी मागविण्याच्या ERM प्रस्तावास मंजूरी द्यावी.

७) कोषागार अधिकारी यांनी प्राप्त रक्कमांचे दोन भाग करावेत. यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ.

८) यातील प्रथम भाग म्हणजे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ, कोषागार अधिकारी यांनी मुख्य लेखाशिर्ष ८००९, राज्य भविष्य निर्वाह निधी, उपशीर्ष-०१,

लघुशिर्ष-१०१, सामान्य भविष्य निर्वाह निधी मध्ये चलनाने जमा करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा.

९) त्यानंतर संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधी खात्यात सदरची रक्कम जमा करण्यासाठी महालेखापाल कार्यालयास प्रस्ताव सादर करावा. महालेखापाल कार्यालय सदर रक्कम जमा चलनाच्या आधारे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्याच्या खात्यावर जमा करेल.

१०) कोषागार अधिकारी यांनी दुसरा भाग म्हणजे शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील शासनाचे अंशदान "००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१) (१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)" तसेच शासनाचे अंशदानावरील व्याज "००४९-व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१) (५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१)" खाली शासन लेख्यामध्ये जमा करावे.

४. जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी हे सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल, त्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत PRAN खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आलेल्या प्रकरणी अनुसरावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे -

१) कर्मचाऱ्यास Pension Fund Regulatory and Development Authority (Exits and Withdrawals Under the National Pension System) Regulations २०१५ आणि त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांन्वये कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान Exit Withdrawal Process द्वारे करण्यात आले असल्यास, याबाबत कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी त्यांचे स्तरावर प्रथम खात्री करावी.

२) ज्या प्रकरणी PRAN खात्यामधील संचित रकमेमधून वार्षिकी योजना (Annuity Plan) खरेदी करण्याची कार्यवाही निवृत्त कर्मचाऱ्यांकडून यापूर्वीच पूर्ण करण्यात आलेली असेल आणि संबंधितांना वार्षिकीचे (Annuity) नियमित प्रदान देखील सुरू झालेले असेल, अशा प्रकरणी निवृत्तिवेतन निधी विनियामक व विकास प्राधिकरण (PFRDA) यांचे परिपत्रक क्रमांक PFRDA/२०२१/३०/SUP/ASP/६, दि.२२.०७.२०२१ अन्वये वार्षिकी समर्पित (surrender) करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांस अनुसरून यथोचित निर्णय घेण्याची मुभा संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यांना असेल. वार्षिकी समर्पण (surrender) करणे किंवा न करणेबाबत निवृत्त कर्मचाऱ्याने काहीही निर्णय घेतला तरी, संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांनी वार्षिकी योजना (Annuity Plan) खरेदी करण्यापूर्वी कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जी एकूण रक्कम संचित होती त्या एकूण संचित रकमेतील केवळ शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम शासन लेख्यामध्ये जमा करणे अनिवार्य राहील.

३) सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम आणि शासनाचे अंशदान व त्यावरील जमा लाभाची रक्कम याची स्वतंत्र परिगणना आहरण व संवितरण अधिकारी यांनी अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकारी यांचेमार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांचेकडून प्राप्त करुन घेण्यात यावी.

४) उक्त परि.२) मध्ये दर्शविलेल्या रक्कम खालील लेखाशीर्षाखाली जमा करणे आवश्यक राहील. तसेच अन्य शासकीय येणे रकमांचे समायोजन समुचित लेखाशीर्षाखाली करणे आवश्यक राहील.

अ.क्र.


प्रवर्ग

शासनाचे अंशदान

लेखाशीर्ष

००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१) (१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)

शासनाचे अंशदानावरील व्याज

००४९-व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१) (५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१)


५) कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील समुचित तरतुदीस अनुसरुन सादर करावयाच्या निवृत्तिवेतन प्रस्तावामध्ये शासनाला येणे असलेल्या अन्य रकमा लेखाशिर्षांसह अंतर्भूत करुनच निवृत्तिवेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर करावा.

५. जे राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून त्यांनी वरील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडला असेल त्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत PRAN खात्यामध्ये जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसेल अशा प्रकरणी अनुसरावयाची कार्यपध्दती खालीलप्रमाणे आहे -

१) निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यास अद्यापपर्यंत राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीअंतर्गत Exit Withdrawal Process द्वारे जमा संचित रकमेचे प्रदान करण्यात आले नसल्यास संबंधित निवृत्त कर्मचाऱ्यास PRAN खात्यामध्ये जमा असलेल्या एकूण संचित रकमेपैकी कर्मचाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम देय ठरेल. यासाठी कार्यालय प्रमुख आहरण व संवितरण अधिकारी यांनी संबंधित कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जमा असलेल्या संचित रकमेचे वित्त विभाग, शासन परिपत्रक क्रमांकः अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दिनांक २८.०७.२०१७ व वित्त विभाग, शासन शुध्दीपत्रक क्रमांकः अंनियो-२०१७/प्र.क्र.२६/सेवा-४, दिनांक १८.११.२०२१ मधील तरतुदीनुसार Error Rectification Module द्वारे रक्कम परत मागविण्यासाठी अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयाकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.

२) आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावाच्या आधारे अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालय यांनी केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) प्रणालीवर Error Rectification Module द्वारे निवृत्त कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यामध्ये जमा असलेली एकूण संचित रक्कम परत मागवावी. निवृत्त कर्मचाऱ्याच्या PRAN खात्यातील संचित रकमेतील कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभ आणि शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ याची स्वतंत्र परिगणना केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांचेकडून करुन घेण्यात यावी.

३) अधिदान व लेखा कार्यालय / जिल्हा कोषागार कार्यालयानी शासनाचे अंशदान व त्यावरील लाभ पुढील

लेखाशिर्षाखाली शासन खाती तात्काळ जमा करावे. कर्मचाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम

संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांचे खात्यावर वर्ग करण्यात यावी. आहरण व संवितरण

अधिकारी यांनी सदर रक्कम निवृत्तिवेतनधारकास प्रदान करावी.

अ.क्र.


प्रवर्ग

लेखाशीर्ष

शासनाचे अंशदान

००७१-निवृत्तिवेतन व इतर सेवानिवृत्ती लाभांच्या संबंधातील अंशदानाच्या व वसुलीच्या जमा, (०१) नागरी, (१०१) अभिदाने व अंशदाने, (०१) अभिदाने व अंशदाने, (०१) (१४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानाची समायोजनामुळे होणारी जमा रक्कम (००७१०२५३०१)


शासनाचे अंशदानावरील व्याज

००४९-व्याजाच्या जमा रकमा, (०४) राज्य / संघराज्य क्षेत्र विधानमंडळ असलेल्या शासनाच्या व्याजाच्या जमा रकमा, (८००) इतर जमा रकमा, (०१) इतर जमा रकमा, (०१) (५४) परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत शासनाच्या अंशदानावरील व्याज (००४९५१३४०१)

४) कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील समुचित तरतुदीस अनुसरुन सादर करावयाच्या निवृत्तिवेतन प्रस्तावामध्ये शासनाला येणे असलेल्या अन्य रकमा लेखाशिर्षांसह अंतर्भूत करुनच निवृत्तिवेतनाचा प्रस्ताव महालेखापाल कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर करावा.

हे शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक २०२४०५०२१४२६१२२४०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

शासनाचे संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करून वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.