5वी/8वी शिष्यवृत्ती अटी व शर्ती अपडेट शुद्धीपत्रक

5वी/8वी शिष्यवृत्ती अटी व शर्ती अपडेट शुद्धीपत्रक

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी स्तर) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी स्तर) करीता अटी व शर्ती निश्चित करणेबाबत- शुद्धीपत्रक.

महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन शुद्धीपत्रक क्रमांक:- एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/ एसडी-५ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०००३२

दिनांक :- ०७ मे, २०२४

संदर्भ :-

१) शासन निर्णय क्र. एफईडी ४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि.१५.११.२०१६

२) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे दि.२९.०५.२०२३ व दि.०६.०२.२०२४ रोजीचे पत्र.

शासन शुद्धीपत्रक :-

उपरोक्त संदर्भ क्र.१ येथील शासन निर्णयामधील "मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अर्जासोबत त्यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी."

याऐवजी

"मुद्दा क्र. १४ (शिष्यवृत्तीचे वितरण):- शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक यांच्या संयुक्त बँक खात्यात (विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करुनच देय रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात) जमा करण्यात येत असल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिष्यवृत्ती परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्याच्या अर्जासोबत विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांचे आई / वडील / पालक यांच्या बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, खाते क्रमांक व IFSC कोड इ.) व आधार क्रमांकाची माहिती घ्यावी." असे वाचण्यात यावे

शिष्यवृत्ती


सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२४०५०७१४२७२२७४२१ असा आहे. हे शुद्धीपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

संपूर्ण परिपत्रक डाऊनलोड करून वाचा

https://drive.google.com/file/d/1tCdjD06deHgPjMzXfX7SoYWNl4NO5LyE/view?usp=drivesdk

 माहितीस्तव

सौजन्य -  महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल