त्रिकोणी संख्या - गणित,
घटक - संख्याज्ञान
उपघटक - त्रिकोणी संख्या (Triangular numbers)
त्रिकोणी संख्या म्हणजे काय ?
दोन लगतच्या नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराच्या निमपटीस त्रिकोणी संख्या म्हणतात.
त्रिकोणी संख्या = nx(n+1)÷2 → (n = नैसर्गिक संख्या हा तिचा पाया) उदा. 1×2÷2 = 1, 2x3÷2 = 3, 3x4 ÷2= 6, 4x5÷2 = 10, याप्रमाणे
त्रिकोणी संख्या: 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78, 91, इत्यादी
नियम - (1) दोन लगतच्या त्रिकोणी संख्यांची बेरीज वर्गसंख्या असते. उदा. 1+3 = 4, 3 + 6 = 9, याप्रमाणे
(II) 1 पासून क्रमशः नैसर्गिक संख्याची बेरीज त्रिकोणी संख्या असते. 1 ते 5 अंकाची बेरीज = 5×6 ÷2=15
(III) त्रिकोणी संख्येच्या दुपटीतून जाणाऱ्या मोठ्यात मोठ्या वर्ग संख्येचे वर्गमूळ त्या त्रिकोणी संख्येचा पाया असतो.
उदा. 45 या त्रिकोणी संख्येचा पाया= 9
कारण 45 x 2 = 90 मधून 81 ही मोठ्यात मोठी वर्गसंख्या जाते. यानुसार √81 = 9
45 ही त्रिकोणी संख्या = 9×10÷2 या सुत्राने तयार झाली आहे.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल