बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03, तर्कसंगती व अनुमान (भाषिक),Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

बुद्धिमत्ता जम्बो टेस्ट क्र.03,

बुद्धिमत्ता

तर्कसंगती व अनुमान (भाषिक),

Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),

हे जाणून घ्या

या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.

या घटकाचे भाषिक आणि अभाषिक अशा दोन मुख्य उपघटकांत वर्गीकरण केले जाते. भाषिक विभागामध्ये प्रश्नांचे स्वरुप शाब्दिक असते तर अभाषिक विभागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात.

हे जाणून घ्या


(1) वय: या प्रश्नप्रकारात दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच एखादद्या व्यक्तीचे वय जन्मांचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. त्यावरुन एका व्यक्तीचे वय विचारण्यात येते. 

(2) तुलना : या प्रश्नप्रकारात वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती यांच्या गुणांच्या उंचीच्या, किंवा आकाराच्या बाबतीत तुलना केली जाते. ही तुलना समजावून घेऊन तकनि अचूक उत्तर दद्यावे लागते. तुलना करताना जास्त किंवा कमी प्रमाण असते. जास्तीसाठी व कमीसाठी < या गणितातील चिन्हांचा वापर करा.

(3) नावात बदल: या प्रश्नप्रकारातील उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे पाहावे म्हणजे उत्तर मिळेल.

(4) नाती : या प्रश्नप्रकारात दोन व्यक्तिचा एकमेकांशी असणारा नातेसंबंधाचा विचार होतो. जसे : आई, वडील, मामा, भाचा, बहिणी, नणंद, सासू, सासरा इत्यादी.


1 comment:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल