स्वातंत्र्यदिन मराठी भाषण,15 ऑगस्ट छोटे भाषण,marathi bhashan

स्वातंत्र्यदिन मराठी भाषण,
15 ऑगस्ट छोटे भाषण,

15 ऑगस्ट भाषण


marathi bhashan 

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन मराठी भाषणे लिहून घ्या, सराव करा आणि आत्मविश्वासपूर्वक सादर करा.

15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात विद्यार्थी आपले भाषण सादरीकरण करत असतात.

       या ठिकाणी मराठी इंग्रजी आणि हिंदी भाषेत लहान मुलांसाठी तसेच मोठ्या व्यक्तींसाठी भाषणाचे विविध नमुने आम्ही या ठिकाणी मोफत उपलब्ध करून देत आहोत.

हिंदी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-hindi-speech-pdf.html

इंग्रजी भाषण

https://www.gsguruji.in/2024/08/15-independence-day-english-speech-pdf.html

वेगवेगळ्या प्रकारचे चार भाषणे खाली दिली आहेत.

पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी 5 ओळीचे सोपे भाषण.


                        मराठी भाषण क्रमांक 01


सर्वांना माझा नमस्कार,

1) माझे नाव  ............. आहे आणि मी इयत्ता पहिलीत शिकतो/शिकते.

2) आज 15 ऑगस्ट रोजी आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत.

3)  सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.

4) आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला

5) आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन.


                       जय हिंद ! जय भारत !


                         मराठी भाषण क्रमांक 02

10 ओळीचे सोपे भाषण 

(दुसरी ते पाचवीचे विद्यार्थी हे भाषण लिहून घेऊ शकतात)


1) सर्वांना माझा नमस्कार

2) माझे नाव  ..........  आहे.

3) आज 15 ऑगस्ट आहे.

4) आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत.

5) सर्वप्रथम, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

6)  आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला.

7) देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राण्यांचे बलिदान दिले.

8) आज आपण त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन करूया.

9) 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन आपला एक राष्ट्रीय सण आहे.

10) आपण सर्वजण हा सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतो.


          एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवितो.

                                  जय हिंद ! जय भारत !


                     मराठी भाषण क्रमांक 03

(पाचवी ते आठवीचे विद्यार्थी हे भाषण सादर करू शकता)


                     उत्सव तीन रंगांचा,

                   आभाळी आज सजला,

             नतमस्तक मी त्या सर्वांचा,

             ज्यांनी भारत देश घडवला.

  सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बाल मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपण सर्वजण येथे आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

       मित्रांनो, 15 ऑगस्ट हा भारताच्या सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिली. महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू लाला लजपत राय अशा अनेक महान स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण पणास लावले. त्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना माझा मानाचा मुजरा.

      स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य, खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे. आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

       चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनविण्यासाठी प्रयत्न करूया.

         एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो.

        जय हिंद ! जय भारत ! वंदे मातरम. !


                 मराठी भाषण क्रमांक 04

 (पालक नागरीक शिक्षक हे भाषण लिहून घेऊ शकतात.)


पूजनीय तिरंगा झेंडा हया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय माननीय श्री ................ निमंत्रीत पालक वर्ग व इतर पाहुणे आमच्या शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या विद्यार्थी 

मित्रांनो, मी आज तुमच्या समोर १५ ऑगस्ट  स्वतंत्र दिनानिमित्त दोन शब्द थोडक्यात सांगत आहे. आपला भारत देश हा अज्ञान अशिक्षित होता त्याकाळी इंग्रज भारतात आले. हळू हळू व्यापार करु लागले व या देशावर आपला हक्क करुन घेतला होता, इंग्रजांना माणूसकी अजीबात नव्हती. भारतीय नागरीकांना अतोनात् मारहान करायचे. त्यांच्या शेतीवर संपूर्ण अधिकार करायचे. शेतकरी आपली शेती करायचे व संपूर्ण धान्य त्यांना दयावे लागे. अनेक प्रकारचे कच्चे माल खनीजे व संपत्ती विदेशात पाठवायचे व पक्का माल तयार करुन आम्हाला ते विकायचे. या अन्यायाचा सुड घेण्याकरिता आपल्या भारत देशात अनेक थोर महापुरुषांनी त्याकाळी जन्म घेतले. जसे भगतसिंग, राजगुरु, सुभाषचंद्र भोष, महात्मा गांधी, इंदिरा गांधी या अनेक थोर महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आपल्या भारतीय लोकांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलाम-गिरीतुन मुक्त व्हावा म्हणून हातात काड्या व मशाल घेवून मोर्चे काढत होते. त्या मोर्चात इंग्रजांचे चमचे बंदुकीने भारतीयाना ठार मारले. असे लाखो भारतीय या देशाच्या स्वातंत्र्या करिता शहिद झाले. मित्रांनो एकदा अमृतसरच्या जालीयन वाला बाग मध्ये सभा सुरु असतांना इंग्रजांचा एक बदमास जनरल डायर याने अनेक नागरीकांना गोळीबार मध्ये ठार केले. असे अनेक प्रसंग आहेत की आपण ज्यांची कल्पना करु शकत नाही.

दिवसा वर दिवस लोटत गेले व इंग्रजांना हाकलून लावण्याचा  आपल्या भारतीयाना लक्षात आले. इंग्रजांना शेवटी लक्षात आले की आता भारतीय लोकं जागा झाले आहेत त्यांना स्वतंत्र करणे गरजेचे आहे. म्हणून इंग्रजांनी आपली सर्व व्यवस्था इंग्लंडला घेवून गेले व पंडीत जवाहरलाल नेहरु सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वाधीन आपल्या देशाला १५ आगस्ट १९४७ ला स्वतंत्र म्हणून घोषित केले. मित्रांनो तो दिवस भारतीयांना मोठा आंनदाचा होता, दुःखाचे दिवस सुखात आले, प्रत्येक भारतीयाना वाटले होते. आज हया प्रसंगी प्रत्येक कोर्ट कचेरी, शाळा व सरकारी कार्यालय मध्ये आपल्या भारत देशात स्वतंत्र दिवस म्हणून तिरंगा झेंडा फडकवूण थोर पुरुषाना श्रद्धांजली वाहीतो. त्यांचे कार्य व गुण गातो स्वातंत्र्या दिनाचे महत्व काय प्रत्येक भारतीयांना भाषनाच्या मार्फत कळते.

मित्रांनो, आज आपला भारत देश एक फार शक्तीशाली राष्ट्र बनला आहे कि कोणत्याही देशाने जर डोळा वाकळा केला तर त्याचा डोळा बाहेर काढायला एकही मिनीट लागनार नाही हे खरे.

तर आज मी तिरंगी झेंड्याला व त्या महान हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहीतो व माझे भाषण संपले असे जाहीर करतो.

                बोलो भारत माता की जय ! 

                  जय हिंद ! जय भारत !


No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल