चाचणी क्रमांक 163 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 163 - मराठी भाषा उतारे, 

मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare  

विद्यार्थी मित्रांनो, जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी), तसेच भारत टॅलेंट सर्च, श्रेया, आय एम विनर, मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयांचे उतारे आणि त्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. या उताऱ्यांचा अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी मोफत सराव चाचण्या उपलब्ध करून देत आहोत.

 या सराव चाचण्या आपण सोडवा आणि आपल्या मित्रांनाही पाठवा.

चाचणी क्रमांक 162 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 162 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.




चाचणी क्रमांक 161- मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 161-  मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, 

BTS, MTS, BDS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare  

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 11, math Jumbo Test 11, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, BTS, MTS, BDS, Jnvst navodaya, scholarship

गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 11, 

Math Jumbo Test


math Jumbo Test 11, 

नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, 

BTS, MTS, BDS, Jnvst navodaya, scholarship

विद्यार्थी मित्रांनो, नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आज आम्ही गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक 11 आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. 

यापूर्वीच्या 10 जम्बो टेस्ट खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.

चाचणी क्रमांक 160 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 160 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय मराठी भाषा उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare 

350 पेक्षा जास्त उतारे आणि त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तरे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्लेलिस्ट वर क्लिक करा. 


चाचणी क्रमांक - 158 मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक - 158 मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा. 

  

गणित जंबो टेस्ट क्र. 10, Math Jumbo Test 10, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS

गणित जंबो टेस्ट क्र. 10

Math Jumbo Test

Math Jumbo Test 10, 

नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

Jawahar Navodaya vidyalaya entrance exam, BTS, MTS, BDS,saknik school 

विद्यार्थी मित्रांनो, विविध स्पर्धा परीक्षेमध्ये गणित विषयाच्य अधिकाधिक सराव व्हावा या उद्देशाने गणित जम्बो टेस्ट क्रमांक 10 चे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वीच्या गणित जम्बो टेस्ट च्या सर्व लिंक शेवटी दिलेले आहेत.

 

या पूर्वीच्या सर्व जम्बो टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

💥 *FREE - FREE - FREE*

👉 *10 जम्बो टेस्ट - 200 प्रश्न* 

📗 *गणित विषयाच्या जम्बो टेस्ट एकाच ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत*

👉 *नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल, NMMS, मंथन,BTS, MTS, BDS, श्रेया इ. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त*

🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.01*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.02*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.03*

🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र. 04*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.05*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.06*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.07*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.08*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.09*


🎯 *गणित जम्बो टेस्ट क्र.10*


🔰 Whats app ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक 

https://chat.whatsapp.com/EEEXPHCOrv08pLDHpoBB1X

*गोवर्धन शिंदे*
9421486014

चाचणी क्रमांक 157 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 157 - मराठी भाषा उतारे, 

Marathi Utare


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 

  

5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाइन नोंदणी सुरू,5th/8th Scholarship Exam 2025 Online Registration Starts,PUP, PSS

5वी/8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ऑनलाइन नोंदणी सुरू,



5th/8th Scholarship Exam 2025 Online Registration Starts,PUP, PSS  

परीक्षा दिनांक -  9 फेब्रुवारी 2025 

Online registration Date - 17/10/2024 ते 30/112024

ऑनलाइन नोंदणीसाठी Direct Link.



परीक्षेसंबंधी संपूर्ण माहिती खाली ठळक अक्षरात दिलेली आहे.

अधिसूचना परीक्षा प्राधान्य

जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/२०२४-२५/४५१२ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

भांबुर्डा, शिवाजीनगर, पुणे - ०४.

दिनांक :- १७/१०/२०२४

प्रति,

१. शिक्षणाधिकारी (प्राथ. / माध्य.) जिल्हा परिषद, सर्व

२. शिक्षणाधिकारी, बृहन्मुंबई महानगरपालिका

३. शिक्षण निरिक्षक, बृहन्मुंबई उत्तर / दक्षिण / पश्चिम विभाग

४. प्राचार्य, शासकीय विद्यानिकेतन पुसेगाव, सातारा / धुळे / अमरावती / औरंगाबाद / केळापूर, यवतमाळ

५. संचालक, विमुक्त जाती व भटक्या जमाती संचालनालय, पुणे

६. प्रशासन अधिकारी / शिक्षण प्रमुख / शिक्षणाधिकारी, म.न.पा. शिक्षण मंडळ

७. गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, सर्व

विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी आयोजित करणेबाबतची अधिसूचना...

शासनमान्य शाळांमधून सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता ५ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेमध्ये प्रविष्ठ होण्यासाठी तसेच इयत्ता ८ वी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ठ होण्यासाठी अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या व या परीक्षेस प्रविष्ठ होण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन आवेदनपत्र परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर दि. १७/१०/२०२४ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
उपरोक्त परीक्षा दि. ०९ फेब्रुवारी, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच वेळी घेण्यात येईल. परीक्षेचे वेळापत्रक व परीक्षेची सविस्तर माहिती सोबतच्या अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. प्रत्येक सूचना वाचूनच कार्यवाही करण्याची दक्षता सर्वांनी घ्यावी. सोबत :- अधिसूचना

शिष्यवृत्ती परीक्षेचे वेळापत्रक

परीक्षा दिनांक - 9 फेब्रुवारी 2024 (रविवार)

पेपर क्र. 1 - प्रथम भाषा व गणित - 75 प्रश्न 150 गुण 
      वेळ 11 :00 ते 12:30

पेपर क्र. 2 -  तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी - 75 प्रश्न 150 गुण 
             वेळ - दु . 2:00 ते 3:30

२) शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप :-

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाचे असतील.

प्रत्येक पेपरसाठी A, B, C, D संचाच्या प्रश्नपत्रिका देण्यात येतील.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) साठी उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) साठीच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल २०% प्रश्नांच्या बाबतीत उत्तरांच्या ४ पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील, ते दोन्ही पर्याय नोंदविणे बंधनकारक असेल.

३) शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता :-

१. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा म्हणजेच पालकांचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.

२. विद्यार्थी शासनमान्य शासकीय / अनुदानित / विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित / स्वयंअर्थसहाय्यित शाळेत इ. ५ वी किंवा इ. ८ वी मध्ये शिकत असावा.

४) विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता निकष :-

शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

१) पुसेगाव, जि. सातारा २) धुळे ३) औरंगाबाद ४) अमरावती ५) केळापूर, जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहेत. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. शाळा ग्रामीण भागातील असावी.

3. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

4. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "शासकीय विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

> आदिवासी शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. फक्त मुलगा असावा. (मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही.)

3. अनुसूचित जमातीतील (एस. टी.) असावा.

4. शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा.

5. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा. ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "आदिवासी विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

> विमुक्त जाती, भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा :-

वि.जा.भ.ज. विद्यानिकेतन हे कमळेवाडी, पो. शिरुर (दबडे), ता. जि. नांदेड या ठिकाणी आहे. सदर परीक्षेस प्रविष्ठ विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा.

1. इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा.

2. आश्रमशाळेतील विद्यार्थी असावा,

3. फक्त मराठी किंवा सेमी मराठी माध्यमातील असावा.

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना "वि.जा.भ.ज. विद्यानिकेतनमध्ये प्रवेश हवा आहे

काय ?" या पर्यायासमोरील 'YES' हा पर्याय नोंदविणे आवश्यक राहील.

५) परीक्षेचे माध्यम :-

५.१ परीक्षा एकूण सात माध्यमांमध्ये घेतली जाईल.

१. मराठी

२. उर्दू

३. हिंदी

४. गुजराती

५. इंग्रजी

६. तेलुगु

७. कन्नड

५.२ उपरोक्त सात माध्यमांशिवाय सेमी माध्यमांचे पुढील सहा पर्याय उपलब्ध आहेत.

१. मराठी + इंग्रजी

२. उर्दू + इंग्रजी

३. हिंदी + इंग्रजी

४. गुजराती + इंग्रजी

५. तेलुगु + इंग्रजी

६. कन्नड + इंग्रजी

५.३ पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) साठी ऑनलाईन आवेदनपत्रात सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदविणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर १ मधील गणित या विषयाची व पेपर २ मधील बुध्दिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यम अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येईल. त्यामुळे ऑनलाईन आवेदनपत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी.

वयोमर्यादा

शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे 

वय  1 जून 2024 रोजी इयत्ता पाचवीसाठी 11 वर्ष 

आणि इयत्ता 8वी साठी 14 वर्ष पेक्षा जास्त नसावे.

(दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी इयत्ता पाचवीसाठी 15 वर्ष
इयत्ता आठवीसाठी 18 वर्ष.)

७) परीक्षा शुल्क :-

७.१ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. ११/११/२०२१, दि. १५/११/२०१६ व कार्यकारी समिती सभा क्र. २९, दि. १२/०४/२०१८, ठराव क्र. ४७० नुसार दर पुढीलप्रमाणे आहेत.

1) प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 150 रुपये = 200 (बिगर मागास)

2) प्रवेश शुल्क 50 रुपये + परीक्षा शुल्क 75 रुपये = 175 (मागास विद्यार्थ्यांसाठी)

८) शुल्क भरण्याची पध्दत :-

८.१ शाळांसाठी सूचना: उपरोक्त शुल्कानुसार शाळांनी सर्व विद्यार्थ्यांचे होणारे एकूण शुल्क ऑनलाईन पेमेंट या पर्यायाची निवड करुन इयत्तानिहाय (इ. ५ वी व इ. ८ वी) स्वतंत्रपणे शक्यतो एकाचवेळी भरावे.

८.२ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शाळांसाठी सूचना: ज्या जिल्ह्यांमध्ये परीक्षार्थ्यांच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, अशा शाळांना सदर सुविधा केवळ नियमित मुदतीपर्यंत म्हणजे दि. ३०/११/२०२४ रोजीपर्यंतच उपलब्ध करुन देण्यात येईल. नियमित मुदतीनंतर आवेदनपत्र भरावयाचे असल्यास संबंधित शाळेला विलंब शुल्कासह शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल. त्यानुसार शाळांनी स्वतः विलंबासह शुल्क भरणे आवश्यक राहील.

८.३ जि. प. सेसफंड / मनपा निधीतून शुल्क भरणाऱ्या शिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांच्यासाठी सूचना :- ज्या जिल्ह्यांमध्ये सदर परीक्षेच्या शुल्काची रक्कम जिल्हा परिषदेच्या सेसफंड / मनपा निधीमधून भरली जाते, त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) / प्रशासन अधिकारी यांनी शासन निर्णय दि. ११/११/२०२१ नुसार सन २०२१ २२ च्या परीक्षेपासून शुल्क वाढ झाली असल्याची बाब जि. प. / मनपाच्या संबंधित समितीच्या निदर्शनास आणावी.

आपल्या जिल्ह्यातील नियमित शुल्काच्या मुदतीत आवेदनपत्र भरलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या शुल्काची एकूण रक्कम तात्काळ उपलब्ध करुन घ्यावी व परिषदेच्या खात्यावर इयत्तानिहाय ऑनलाईन पेमेंटव्दारे दि. ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अखेरपर्यंत भरावी. सदर शुल्क भरण्यास कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. उपरोक्तनुसार शुल्काचा भरणा विहित मुदतीत न केल्यास सदर शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध करुन दिली जाणार नाहीत. तसेच जिल्हा परिषद / मनपा शाळांना नियमित शुल्काच्या मुदतीनंतरचे (दि. ३०/११/२०२४ नंतरचे) कोणतेही विलंब शुल्क माफ केले जाणार नाही, त्यामुळे आपल्या अधिनस्त सर्व शाळांना नियमित मुदतीत आवेदनपत्र भरण्याच्या लेखी सूचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात.

९) परीक्षा परिषद शाळा सांकेतांक :-

शैक्षणिक वर्ष सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्ती परीक्षेचे सर्व कामकाज युडायस कोडनुसार करण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षा परिषद शाळा सांकेतांक नोंदविण्याची आवश्यकता नाही.

१०) ग्रामीण, शहरी क्षेत्र निकष :-

१०.१ शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ अन्वये पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील ग्रामपंचायतीच्या नियंत्रणाखालील सर्व गावे / वस्तीमधील (लोकसंख्या विचारात न घेता) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गणना "ग्रामीण" भागात करण्यात यावी. तसेच नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका व महानगरपालिका परिक्षेत्रातील (ग्रामपंचायत क्षेत्र अस्तित्वात नसल्यास) शाळांची गणना "शहरी" भागात करण्यात यावी. शाळा ज्या क्षेत्रात आहे तेच क्षेत्र ग्राह्य धरण्यात येईल. गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यांनी अधिनस्त शाळांच्या क्षेत्राबाबत खात्री करावी.

१०.२ दि. १७/१०/२०२४ पासून शिष्यवृत्ती परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यास सुरूवात होणार

असल्याने दि. १६/१०/२०२४ या दिनांकास / दिनांकापूर्वी जी स्थिती असेल ती ग्रामीण / शहरी बाबत ग्राहय धरण्यात यावी. उदा :- एखाद्या गावातील ग्रामपंचायतीचे रुपांतर दि. १६/१०/२०२४ या तारखेनंतर नगरपंचायत / नगरपरिषद / नगरपालिका इ. मध्ये झाले असल्यास संबंधित शाळा ग्रामीण क्षेत्रातच ग्राहय धरली जावी.

११) C.B.S.E. व I.C.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळांबाबत :-

शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.४/एसडी-५, दि. १५/११/२०१६ नुसार I.C.S.E. आणि C.B.S.E. अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाऱ्या शाळेतील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होऊ शकतात. सदर अभ्यासक्रमातील गुणानुक्रमे पहिल्या ५० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्वतंत्र गुणवत्ता यादी तयार करण्यात येते. गुणवत्ता यादीत स्थान मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. तथापि सदर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येत नाही.

१२) बार्टी शिष्यवृत्ती :-

मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या कार्यालयामार्फत 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्य प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती' अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याना सन २०१४ पासून देण्यात येते.

त्यानुसार इ. ५ वी व इ. ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील कट ऑफ लिस्टच्या खालील पात्र विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती न मिळालेल्या अनुसूचित जाती या संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी मा. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्याकडे मागणीनुसार पाठविण्यात येते.

१३) ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सर्वसाधारण सूचना :-

१. पूर्व उच्च प्राथमिक / पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेस बसण्यास इच्छुक विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे शाळेने ऑनलाईन पध्दतीनेच भरावयाची आहेत. ऑफलाईन पध्दतीने आवेदनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत.

२. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि शासकीय, आदिवासी, विजाभज विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेसाठी एकत्रित एकच आवेदनपत्र आहे. त्यात इच्छुक विद्यार्थ्यांना विद्यानिकेतन प्रवेशासाठी पात्रतेनुसार विकल्प उपलब्ध आहेत.

३. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रात भरलेल्या माहितीची पडताळणी / खात्री मुख्याध्यापकांनी स्वतः करावी. याबाबत भविष्यात काही प्रश्न उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.

४. विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट परीक्षा परिषदेकडे पाठविण्याची आवश्यकता नाही. परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी, ऑनलाईन आवेदनपत्रांची प्रिंट, आवश्यक प्रमाणपत्रे व शुल्क भरलेल्या ऑनलाईन पेमेंटची रिसिट इत्यादी कागदपत्रे संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या दप्तरी जतन करून ठेवावीत.

५. ऑनलाईन आवेदनपत्रासाठी विद्यार्थ्यांचा फोटो व स्वाक्षरी एकत्रित स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य राहील.

६. विदर्भातील ११ जिल्ह्यातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रू. २०,०००/- पेक्षा कमी असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.

७. विद्यार्थ्यांचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम प्राधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे असणे अनिवार्य आहे.

८. मुद्दा क्रमांक ६ व ७ मधील प्रमाणपत्रांची संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या स्तरावरुन तपासणी करणे बंधनकारक असून सदर प्रमाणपत्र आपल्या दप्तरी जतन करुन ठेवावे व परिषदेने मागणी केल्यास उपलब्ध करुन द्यावेत.

९. ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्याबाबतच्या मुद्देनिहाय सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे. त्यानंतरच ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.

१०. संगणकाची व इंटरनेटची पुरेशी माहिती असलेल्या कर्मचाऱ्यांची / व्यक्तींची ऑनलाईन आवेदनपत्रे

भरण्यासाठी मदत घ्यावी.

११. शाळेमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यास अन्य ठिकाणाहून (इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या शाळा, नेट कॅफे इ.) आवेदनपत्रे भरावीत.

१२. नेट कॅफेमधून ऑनलाईन आवेदनपत्र भरल्यास मुख्याध्यापकाने शाळेच्या लॉगीनमधून भरलेली सर्व माहिती अचूक असल्याची खात्री करुनच सबमीट करावे. तसेच सर्व विद्यार्थ्यांचे शुल्क भरले गेल्याची खात्री स्वतः मुख्याध्यापकांनी करावी. यासंबंधी भविष्यात काही प्रश्न उदभवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची राहील.

१३. परीक्षा परिषदेने आवेदनपत्रे भरण्यासाठी कोणत्याही केंद्रास परवानगी दिलेली नाही अथवा प्राधिकृतही केलेले नाही. शाळेने आपल्या सोयीनुसार इंटरनेट कनेक्शन उपलब्ध असलेल्या ठिकाणी ऑनलाईन आवेदनपत्रे भरावीत.

१४. ऑनलाईन आवेदनपत्रे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व https://puppssmsce.in या अधिकृत संकेतस्थळावरुनच भरावीत.

१५. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यापूर्वी आवेदनपत्र भरण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांबाबत सविस्तर माहिती देऊन अवगत करावे.

१६. आवेदनपत्र भरण्यासाठी वेगवान इंटरनेट (Broadband) कनेक्शनचा उपयोग करावा.

१७. आवेदनपत्र भरण्यासाठी शक्यतो गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ७५ व त्यावरील व्हर्जनच्या इंटरनेट ब्राऊजरचाच वापर करावा. जेणेकरून आवेदनपत्र भरताना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही.

१८. आवेदनपत्रे भरण्यासाठी शाळांना अकरा अंकी युडायस कोड असणे अनिवार्य आहे.

१९. आवेदनपत्रातील सर्व मुद्दयांची माहिती शाळेच्या रेकॉर्डप्रमाणे अचूक असणे आवश्यक आहे. ऑनलाईन आवेदनपत्रात अचूक माहिती भरणे ही जबाबदारी संबंधित मुख्याध्यापकांची आहे.

२०. आवेदनपत्रातील सर्व अनिवार्य मुद्दयांची (Mandatory Field) माहिती भरल्याशिवाय ऑनलाईन आवेदनपत्र SAVE होणार नाही.

२१. Login Id व Password जतन करून ठेवावेत. ते त्रयस्थ व्यक्तीला देऊ नयेत.

२२. विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरण्यासाठी आधार कार्ड क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक अनिवार्य आहे. तथापि बँक खाते क्रमांक असणे अनिवार्य नाही, मात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाल्यास त्याचे बँक खाते काढून त्याची माहिती ऑनलाईन शिष्यवृत्ती प्रणालीमध्ये भरण्याची जबाबदारी संबंधीत शाळा मुख्याध्यापकांची राहील.

१४) परीक्षा आयोजनाबाबत सर्वसाधारण माहिती :-

१. प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सीलबंद स्वरुपात देण्यात येतील.

२. उत्तरपत्रिकांची तपासणी OMR पध्दतीने केली जाते.

३. कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येत असल्याने सदर उत्तरपत्रिकांची डिजिटल स्कॅन कॉपी (छायाप्रत) देण्यात येणार नाही.

४. उत्तरपत्रिकेत गिरवलेली / खाडाखोड केलेली उत्तरे ग्राहय धरली जाणार नाहीत. एकदा नोंदविलेले उत्तर बदलता येणार नाही.

५. कोणत्याही परिस्थितीत उत्तरपत्रिकेतील वर्तुळ पेन्सिलने रंगवू नये. अशा उत्तरांना शून्य गुण दिले जातील.

६. शिष्यवृत्ती परीक्षेची परीक्षापूर्व कामे, उत्तरपत्रिकांची तपासणी, शिष्यवृत्तीधारकांची निश्चिती, विद्यानिकेतन प्रवेश निवड याद्या, विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका / प्रमाणपत्रे व परीक्षेची सर्व सांख्यिकीय माहिती संगणकावर तयार केली जाते.

१५) शिष्यवृत्ती परीक्षेचे ऑनलाईन आवेदनपत्र भरताना अनिवार्य बाबी / कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

१. विद्यार्थ्याची फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी (jpg/jpeg/png/bmp format मध्ये 100 kb पेक्षा जास्त नसावी.)

उदा. :-

विद्यार्थ्याचा फोटो

विद्यार्थ्याची स्वाक्षरी

२. विदर्भातील ११ जिल्हयातील पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.२०,०००/- पेक्षा कमी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) प्रमाणपत्र. (इ. ५ वी व इ. ८ वी साठी)

३. विद्यार्थ्याचे पालक रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणारे भूमिहीन शेतमजूर असल्यास भूमिहीन शेतमजूर व रू.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असल्याबाबत सक्षम अधिकारी (तलाठी / तहसीलदार / प्रांत अधिकारी) यांनी दिलेली प्रमाणपत्रे. (इ. ८ वी साठी)

४. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या फोटोसह स्वाक्षरीची एकत्रित स्कॅन कॉपी.

१६) विद्यार्थ्याचे आधार कार्ड क्रमांक व बँक खाते क्रमांकाबाबत :-

ऑनलाईन आवेदनपत्र भरताना विद्यार्थ्याच्या आधारकार्डशी संलग्न असलेले विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे आई, वडील किंवा पालक यांच्या सोबतच्या संयुक्त बँक खात्याची माहिती (विद्यार्थ्याशी नाते, बँकेचे नाव, IFS Code व बँक खाते क्रमांक), उपलब्ध असल्यास नमूद करावा. सदर बाब अनिवार्य नसल्याने बँक खात्याच्या तपशीलाबाबत विद्यार्थी / पालकांवर सक्ती करण्यात येऊ नये. केवळ सदर माहिती उपलब्ध नाही म्हणून विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

विद्यार्थ्याचा आधार क्रमांक किंवा आधार एनरॉलमेंट क्रमांक भरणे अनिवार्य असल्याने यापैकी कोणतीही एक माहिती अचूकपणे नमूद करावी.

१७) शिष्यवृत्ती रकमेतील वाढ :-

शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार शिष्यवृत्ती रकमेत इ. ५ वीच्या सर्व संचांकरीता रु.५००/- प्रतिमाह प्रमाणे (रु.५०००/- प्रतिवर्ष) व इ. ८ वीच्या सर्व संचांकरीता रु.७५०/- प्रतिमाह प्रमाणे (रु.७५००/- प्रतिवर्ष) इतकी भरीव वाढ करण्यात आलेली आहे.

१८) पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा :-

शासन निर्णय क्रमांक पूमाशि-२०२०/प्र.क्र.३१/एसडी-५, दि. ०३/०७/२०२३ नुसार इ. ५ वी व इ. ८ वीच्या मागासवर्गीय मुले/मुली (H) व मागासवर्गीय मुली (1) या शिष्यवृत्ती संचांकरीता लागू असलेली रु.२०,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न याबाबतची उत्पन्न मर्यादा काढण्यात आलेली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार दिनांक ०९ फेब्रुवारी, २०२५ च्या कामकाजाबाबतची माहिती वरीलप्रमाणे असून त्यात होणारे बदल वेळोवेळी कळविले जातील. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत.

सदर अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.inhttps://puppssmsce.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

चाचणी क्रमांक 155 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, navodaya, scholarship, marathi, utare

चाचणी क्रमांक 155 - मराठी भाषा उतारे,

मराठी उतारे


 नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, navodaya, scholarship, marathi, utare

 यापूर्वीच्या वयानंतरच्या सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा

https://govardhanshinde.blogspot.com/p/blog-page_27.html


गणित जंबो टेस्ट क्र. 09 - Math Jumbo Test, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship,

गणित जंबो टेस्ट क्र. 09 

गणित जंबो टेस्ट 9


Math Jumbo Test, 

नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship,

विद्यार्थी मित्रांनो,
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती, आठवी शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन भारत टॅलेंट सर्च तसेच विविध स्पर्धा परीक्षा जसे की पोलीस भरती इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी गणित विषयाच्या सर्व घटकांवर आधारित ही मोफत सराव चाचणी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत.


 यापूर्वीच्या सर्व गणित जम्बो टेस्ट सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

 

चाचणी क्रमांक 153 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 153 - मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare 

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.


चाचणी क्रमांक 152 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, BTS, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 152 - मराठी भाषा उतारे, 

नवोदय मराठी उतारे


जवाहर नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च, मंथन, श्रेया, 

BTS, navodaya, scholarship, marathi utare,

350 पेक्षा जास्त उतारे एकाच ठिकाणी पाहण्यासाठी खाली दिलेल्या प्लेलस्ट वर क्लिक करा.

चाचणी क्रमांक - 151 मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च ,श्रेया, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक - 151 मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, भारत टॅलेंट सर्च ,श्रेया, 

navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.

  

चाचणी क्रमांक 150 - मराठी भाषा उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, BDS, myvision, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 150 - मराठी भाषा उतारे, 



नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, BDS, myvision, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,

यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक च वापर करा



  

चाचणी क्रमांक 147 - मराठी उतारे, नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare

चाचणी क्रमांक 147 - मराठी उतारे, 

नवोदय मराठी उतारे


नवोदय, शिष्यवृत्ती, मंथन, भारत टॅलेंट सर्च, 

BTS, MTS, Jnvst, navodaya, scholarship, marathi utare,


यापूर्वीच्या सर्व सराव चाचण्या खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा. 


  

NMMS 2024-25 Online registration/application, class 8th, राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

NMMS 2024-25 Online registration/application, class 8th, 

NMMS


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

प्रसिध्दी निवेदन राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ. ८ वी साठी

सन २००७-०८ पासून इयत्ता ८ वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुध्दिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी. आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होईल.

१. अर्ज करण्याची पध्दत दिनांक ०५/१०/२०२४ पासून ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या

 https://www.mscepune.in 

व 

https://mscenmms.in 

या संकेतस्थळावर शाळांना उपलब्ध होतील.

२. पात्रता :-

a) महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी/ विद्यार्थीनीस या परीक्षेस बसता येते.

b) पालकांचे (आई व वडील दोघांचे मिळून) वार्षिक उत्पन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी असावे. नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा / तलाठयांचा सन २०२३-२४ च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकांकडे जमा करावा. सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेत जतन करुन ठेवावा.

c) विद्यार्थी/विद्यार्थीनी इ.७ वी मध्ये किमान ५५% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा. (अनुसूचीत जाती (SC) / अनुसूचित जमाती (ST) चा विद्यार्थी किमान ५०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा.)

d) खालील विद्यार्थी सदर परीक्षेसाठी बसू शकतात तथापि शिष्यवृत्तीसाठी अपात्र आहेत.

• विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी.

• केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी.

• शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजनव्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी.

• सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी.

३. विद्यार्थ्यांची निवड : विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल. संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल.

४.परीक्षेचे वेळापत्रक :- महाराष्ट्रातील विविध केंद्रावर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांचे मार्फत दिनांक २२ डिसेंबर, २०२४ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे. सदर परीक्षेचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

पेपर क्र. 1) बौद्धिक क्षमता चाचणी -  mental ability test (MAT)

90 प्रश्न - 90 गुण - 90 मिनिटे वेळ (दिव्यांगांसाठी 30 मिनिटे ज्यादा) 

वेळ - 10:30 ते 12:00

पेपर क्र. 02) शालेय क्षमता चाचणी - socialist aptitude test (SAT)

90 प्रश्न - 90 गुण - 90 मिनिटे वेळ (दिव्यांगांसाठी 30 मिनिटे ज्यादा) 

वेळ - 1:30 ते 3:00

* सदर परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ४०% मिळणे आवश्यक आहेत. (SC, ST, व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण ३२% मिळणे आवश्यक आहेत.)

५. परीक्षेसाठी विषय: सदर परीक्षेसाठी २ विषय असतील.

a) बौध्दिक क्षमता चाचणी (MAT): ही मानशास्त्रीय चाचणी असून, त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनांवर आधारित ९० बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

b) शालेय क्षमता चाचणी (SAT): ही सामान्यतः इयत्ता ७ वी व इयत्ता ८ वीच्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये १. सामान्य विज्ञान एकूण (गुण-३५) २. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५) ३. गणित (एकूण गुण - २०) असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.

उपविषयावर गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल.

a. सामान्य विज्ञान ३५ गुण:- भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३ गुण.

b. समाजशास्त्र ३५ गुण: इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण

c. गणित २० गुण.

६. माध्यम :- परीक्षा मराठी, उर्दू, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलुगू व कन्नड या सात माध्यमातून घेतली जाते. (सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येते.) विद्यार्थ्यांना यापैकी कोणतेही एकच माध्यम घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्नक्रमांकापुढे पर्यायांसाठी ४ वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळ निळे/काळे बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तर नोंदवायचे आहे. पेन्सिलचा वापर केलेली/अपुरी/अशंतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदविलेली/उत्तरे/चुकीच्या पध्दतीने नोंदवलेली उत्तरे/व्हाईटनर/खाडाखोड करुन नोंदविलेली किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत.

७. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या: अखिल भारतील पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या एक लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी ११६८२ इतका कोटा निश्चित करुन दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार, गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जातसंवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येईल.

८. शुल्क :- परीक्षेसाठी खालीलप्रमाणे शुल्क अकारण्यात येते.

1) नियमित शुल्कासह - 

ऑनलाइन नोंदणी  - 5 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2024 

शुल्क - 120 ₹

2)  विलंब शुल्क - 240 ₹

ऑनलाइन नोंदणी कालावधी  - 05/11/2024 ते  09/11/2024

3) अति विलंब शुल्क -  360 रुपये 

ऑनलाइन नोंदणी कालावधी - 10/11/2024 ते 14/11/2024

शाळा संलग्नता फी - 200 रुपये


९. निकाल घोषित करणे :- सदर परीक्षेचा निकाल साधारण फेब्रुवारी २०२५ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या

आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवडयादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्हयांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरुनच काढून घेणे आवश्यक आहे.

१०. शिष्यवृत्ती दर :- शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इ. ९ वी ते इ. १२ वी पर्यंत दरमहा रु. १,०००/- (वार्षिक रु. १२,०००/-) शिष्यवृत्ती दिली जाईल.

> शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यासाठी इ. ९ वी व इ. ११ वी प्रथम संधीमध्ये पास होणे आवश्यक आहे.

इ. १० वी मध्ये किमान ६०% गुण मिळणे आवश्यक आहेत. (SC/ST विद्यार्थ्यांना किमान ५५% गुणांची आवश्यकता आहे.)

सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी (माध्य.) व मा. शिक्षण संचालक (योजना) यांचे मार्फत केले जाते.

११. अनधिकृततेबाबत इशारा -

शिक्षण मंत्रालय (MoE), भारत सरकार, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे शिवाय अन्य कोणत्याही संस्थेस या प्रकारची परीक्षा किंवा पूर्व परीक्षा घेणे, प्रमाणपत्र देणे, शिष्यवृत्ती देणे या करिता महाराष्ट्रात प्राधिकृत करण्यात आलेली नाही. अशा संस्थाबाबतची कोणतीही जबाबदारी शिक्षण मंत्रालय, नवी दिल्ली / महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेवर राहणार नाही.


माहितीस्तव सेवेत सादर.

दीपावली अभ्यास - 2024,Diwali Study - 2024, पहिली ते आठवी मराठी माध्यम, workbook

दीपावली अभ्यास - 2024,

दीपावली अभ्यास


Diwali Study - 2024, 

पहिली ते आठवी मराठी/सेमी माध्यम 

(कृतिपुस्तिका) (workbook)

*📚🪔 दीपावली अभ्यास🪔📚*

नमस्कार, 
FLN , NEP 2020, अध्ययन निष्पत्ती आणि आनंददायी शिक्षण* यांवर आधारित विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खास तयार केलेली ही *दिवाळी अभ्यास* पुस्तिका.

  
*निर्मिती: सौ. ज्योती दीपक बेलवले*  
सदस्य ,अभ्यासक्रम निर्मिती मंडळ , NCERT नवी दिल्ली तथा बालभारती पुणे
*प्रकाशन - ATM*
मूळ किंमत - ३० रु. 
*सवलत किंमत -  २० रु. (घरपोच)*

(पोस्टाने पुस्तक मागवण्यासाठी वर्गनिहाय किमान 10 पुस्तकांची मागणी हवी)          

  *वैशिष्ट्ये*
🔹 इयत्ता पहिली ते आठवी
🔹मराठी व सेमी इंग्लिश
🔹A 4 पेपर साईज
🔹32 पानी
🔹बालभारती व NCERT अभ्यासमंडळ सदस्य लिखित
🔹सर्व विषयांचा समावेश

               संपर्क ,   
       वेदांत गोवर्धन शिंदे       
         8668833172

आपली मागणी वरील नंबर वर व्हाट्सअप वर पाठवावी.

8668833172 या phone pay नंबर वर पैसे पाठवल्यानंतर स्क्रीन शॉट व्हाट्सअप ला शेअर करावा.

नमुना अभ्यासिका pdf डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या वर्गनिहाय लिंक वर क्लिक करा.


इयत्ता पहिली 


इयत्ता दुसरी 


इयत्ता तिसरी 


इयत्ता चौथी 


इयत्ता पाचवी 


इयत्ता सहावी 


इयत्ता सातवी 


इयत्ता आठवी


व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी लिंक.