गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 11, math Jumbo Test 11, नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन, BTS, MTS, BDS, Jnvst navodaya, scholarship
गणित - जम्बो टेस्ट क्रमांक 11,
math Jumbo Test 11,
नवोदय, शिष्यवृत्ती, सैनिक स्कूल, मंथन,
BTS, MTS, BDS, Jnvst navodaya, scholarship
विद्यार्थी मित्रांनो, नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूल मंथन इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आज आम्ही गणिताची जम्बो टेस्ट क्रमांक 11 आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.
यापूर्वीच्या 10 जम्बो टेस्ट खाली दिलेल्या लिंक वरून सोडवा.
1.
एका 40 मीटर लांब व 30 मीटर रुंद अशा आयताकृती बागेच्या आत कुंपणालगत बागेभोवती 2 मीटर रुंदीचा रस्ता करायचा आहे. त्या रस्त्यावर 25 सेंमी × 20 सेंटीमीटर आकाराच्या फरशा बसवायचे आहेत, तर अशा किती फरश्या आणाव्या लागतील ?
Explanation:
2.
तनवीने दसादशे 7 दराने बँकेत 15000 रुपये एक वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले तर तिला वर्ष अखेरीस किती व्याज मिळेल ?
Explanation:
3.
एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेंटीमीटर व 4.2 cm आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती ?
Explanation:
4.
गणेशराव यांनी एक मशीन 23500 रुपयांना विकत घेतली ती आणताना वाहतूक खर्च 1200 रुपये झाला शिवाय त्यांना 300 रुपये कर भरावा लागला त्यांनी ती मशीन गिऱ्हाईकास 24250 रुपयांना विकली तर गणेशरावांना नफा झाला की तोटा झाला ? किती टक्के ?
Explanation:
5.
सिंधीतांडा गावातील शाळेत 500 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 350 विद्यार्थ्यांना पोहता येते तर किती टक्के विद्यार्थ्यांना पोहता येत नाही ?
Explanation:
6.
आयुषचे आजचे वय 12 वर्षे आहे. आयुषच्या वडिलांचे आजचे वय 42 वर्षे आहे आयुषची आई त्याच्या वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे तर जेव्हा आयुष्य वय 10 वर्षे होते. तेव्हा आयुष्यच्या वयाचे त्याच्या आईच्या त्या वेळच्या वयाशी गुणोत्तर काय असेल ?
Explanation:
7.
कुणालने एक वस्तू 400 रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा झाला तर त्याला त्या व्यवहारात शेकडा नफा किती झाला ?
Explanation:
8.
दसादशे 6 दराने दोन शेतकऱ्यांनी समान कर्ज घेतली. एकाने एका वर्षात फेडण्यासाठी 47700 रुपये भरले तर दुसऱ्याला दोन वर्षानंतर कर्जमुक्त होण्यासाठी किती रुपये भरावे लागतील ?
Explanation:
9.
करणच्या आईने प्रत्येकी 500 मिलिलीटर अशा 3 दुधाच्या पिशव्यामधील दूध गरम करून 20 कपमध्ये सारखे भरले, तर प्रत्येक कपात किती दूध असेल ?
Explanation:
10.
1.09 × 5.908 चे नजीकचे पूर्णांकातील उत्तर असेल ?
Explanation:
11.
11 मुलांच्या गुणांची सरासरी 18 आहे. त्यातील पहिल्या पाच मुलांच्या गुणांची सरासरी 17 आहे व अंतिम 5 मुलांच्या गुणांची सरासरी 20 आहे. तर सहाव्या क्रमांकाच्या मुलाला किती गुण मिळाले असतील ?
Explanation:
12.
शिंदे सरांनी आपल्या विद्यार्थ्यांना 60 पेन व 72 पेन्सिल समप्रमाणात वाटले, तर त्या वर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या किती ?
Explanation:
13.
40 पेक्षा लहान असणाऱ्या 5 च्या एकूण विभाज्य संख्या किती आहेत ?
Explanation:
14.
-20 -10+5+4-2-3 = ?
Explanation:
15.
कोणत्या संख्येला 15 ने भागले असता भागाकार 15 येतो व बाकी 5 येते ?
Explanation:
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल