Intelligence Jumbo Test No.03, Reasoning and Inference (Linguistic),
हे जाणून घ्या
या प्रकारातील प्रश्न आपल्या विचारशक्तीला चालना देणारे असतात. यात एखादे विधान दिलेले असते त्यावर आधारलेल्या इतर गोष्टींचा विचार करावा लागतो. हे प्रश्न सोडवताना कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणावी लागते आणि त्यावरुन अनुमान करुन अचूक उत्तर ठरवावे लागते. अनुमान म्हणजे तर्कशास्त्राच्या नियमानुसार काढलेले निष्कर्षच असतात. कोडी सोडविण्यासाठी तुम्ही कल्पनाशक्ती व विचारशक्ती उपयोगात आणून अनुमान करता व त्याची उत्तरे काढता. त्याच धर्तीवर हे प्रश्न असतात. या प्रकारातील प्रश्न सोडवतांना प्रत्येक प्रश्न लक्षपूर्वक वाचून त्यावर विचार करुन उत्तर ठरवणे आवश्यक आहे.
या घटकाचे भाषिक आणि अभाषिक अशा दोन मुख्य उपघटकांत वर्गीकरण केले जाते. भाषिक विभागामध्ये प्रश्नांचे स्वरुप शाब्दिक असते तर अभाषिक विभागामध्ये आकृत्या दिलेल्या असतात व त्यावर आधारित प्रश्न सोडवायचे असतात.
हे जाणून घ्या
(1) वय: या प्रश्नप्रकारात दोन किंवा तीन व्यक्तींच्या वयांची तुलना पटीमध्ये केलेली असते. तसेच एखादद्या व्यक्तीचे वय जन्मांचे वर्ष किंवा जन्मतारीख दिलेली असते. त्यावरुन एका व्यक्तीचे वय विचारण्यात येते.
(2) तुलना : या प्रश्नप्रकारात वस्तू, पदार्थ किंवा व्यक्ती यांच्या गुणांच्या उंचीच्या, किंवा आकाराच्या बाबतीत तुलना केली जाते. ही तुलना समजावून घेऊन तकनि अचूक उत्तर दद्यावे लागते. तुलना करताना जास्त किंवा कमी प्रमाण असते. जास्तीसाठी व कमीसाठी < या गणितातील चिन्हांचा वापर करा.
(3) नावात बदल: या प्रश्नप्रकारातील उत्तरे शोधण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवावे जे उत्तर येईल त्याला काय म्हटले आहे हे पाहावे म्हणजे उत्तर मिळेल.
(4) नाती : या प्रश्नप्रकारात दोन व्यक्तिचा एकमेकांशी असणारा नातेसंबंधाचा विचार होतो. जसे : आई, वडील, मामा, भाचा, बहिणी, नणंद, सासू, सासरा इत्यादी.
1.
जर खुर्चीला टेबल म्हटले, टेबलाला वही म्हटली, वहीला पेन म्हटले व पेनला खोडरबर म्हटले, तर आपण लेखन कशात करू ?
Explanation: लेखन कशात करतात ? वही
महिला काय म्हटले आहे ? पेन
म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 1
2.
गणित विषयात सुषमाला प्रियंका पेक्षा कमी गुण मिळाले प्रियंकाला सविता पेक्षा जास्त गुण मिळाले सविताला सुषमापेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात कमी गुण कोणाला मिळाले ?
Explanation: सर्वात कमी गुण सविताला मिळाले
3.
समोर दिसणाऱ्या मुलीकडे बघून वैभव म्हणतो की, तिचे वडील माझ्या आईला आई म्हणतात. तर वैभवचे त्या मुलीशी नाते काय ?
Explanation: वैभव ज्यांना आई म्हणतो तिलाच मुलीचे वडीलही आई म्हणतात त्यामुळे मुलीचे वडील व वैभव हे भाऊ आहेत म्हणून वैभव चे मुलीची नाते - काका.
4.
अनिताचे बाबा सीमाचे मामा आहेत तर सीमा ची आई अनिताची कोण ?
Explanation: सीमा ची आई ही अनिताच्या बाबांची बहीण आहे. म्हणून सीमाची आई अनिताची आत्या होय.
5.
चार वर्षांपूर्वी श्रेयाचे वय 12 वर्षे होते तर आणखी 3 वर्षांनी तिचे वय किती होईल ?
आंबा केळी पेक्षा स्वस्त आहे. केळी सफरचंदापेक्षा महाग आहे. तर सर्वात महाग फळ कोणते ?
Explanation: सर्वात महाग केळी आहे
7.
अजित सलीम पेक्षा उंच आहे. अजित जॉन पेक्षा ठेंगणा आहे. रहीम जॉन पेक्षा उंच आहे तर सर्वात ठेंगणा कोण आहे ?
Explanation: सर्वात ठेंगणा सलीम आहे
8.
अजित सुरज ला म्हणाला, "तुझे बाबा माझ्या बाबांच्या एकुलत्या बहिणीची पती आहेत". तर अजित हा सुरजचा कोण ?
Explanation: वडिलांची बहीण आत्या. सुरज ची आई अजित ची आत्या तर अजितचे बाबा सुरजचे मामा. म्हणून अजित हा सुरजचा मामे भाऊ.
9.
बसला रिक्षा म्हटले , रिक्षाला सायकल म्हटले, सायकलला रेल्वे म्हटले, रेल्वेला विमान म्हटले, तर तीन चाकी वाहन कोणते ?
Explanation:
10.
दोन भावांचे आजच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. आणखी आठ वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षांचे अंतर असेल ?
Explanation:
11.
गीताचे आजचे वय 15 वर्षे आहे. तर सुस्मिताचे आजचे वय 19 वर्षे आहे. तर आणखी 5 वर्षांनी त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल ?
Explanation: व्यक्तींच्या वयातील फरक बदलत नाही.
गीताचे वय 15 वर्षे
सुष्मिताचे वय 19 वर्षे
दोघींच्या वयातील फरक 19-15=4 वर्ष
म्हणून 5 वर्षानंतरही त्यांच्या वयातील फरक 4 वर्षे असेल.
12.
गणिताला विज्ञान म्हटले, विज्ञानाला इतिहास म्हटले, इतिहासाला भाषा म्हटले, भाषेला भूगोल म्हटले तर बेरीज ही क्रिया कोणत्या विषयात येईल ?
Explanation:
13.
पाच जणांच्या धावण्याच्या शर्यतीत मागे वाघ पळत होता. हत्ती व ससा यांच्यामध्ये उंट पळत होता तर सर्वात शेवटी कोण पळत होते ?
Explanation:
14.
एका मुलाकडे बोट दाखवून शशी म्हणाला, तो माझ्या आजीच्या एकुलत्या एका मुलाचा मुलगा आहे तर शशीचे त्या मुलाशी असलेले नाते कोणते ?
Explanation:
15.
मनोहर हा राहुलच्या मुलाचा काका आहे तर मनोहरचे राहुलशी असलेले नाते कोणते ?
Explanation:
16.
अरुणा व वैष्णवी यांच्या वयाची बेरीज 35 वर्षे आहे. अरुणा ही वैष्णवी पेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे तर अरुणाचे वय ?
Explanation: व यांची बेरीज व वयातील फरक दिल्यास वयांच्या बेरजेतून वयाचा फरक वजा करून त्याला 2 ने भागल्यास लहान व्यक्तीचे वय येते (मोठी असा उल्लेख असल्यास)
17.
नेहाचे वय सायलीच्या वयाच्या दुप्पट आहे. तर सायलीचे वय निरंजनच्या निम्मे आहे तर दोघांपैकी जुळे कोण ?
Explanation:
18.
उंटाला हत्ती म्हटले, हत्तीला वाघ म्हटले, वाघाला सिंह म्हटले, सिंहाला जिराफ म्हटले तर राष्ट्रीय प्राणी कोणता ?
Explanation: राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ
वाघाला काय म्हटले आहे ? सिंह
म्हणून राष्ट्रीय प्राणी सिंह.
19.
रमेश हा गणेश पेक्षा उंच आहे. सुरेश हा रमेश पेक्षा उंच आहे. रवी हा सुरेशपेक्षा उंच आहे तर सर्वात उंच कोण आहे ?
Explanation:
20.
माझ्यापेक्षा माझी बहीण 9 वर्षांनी मोठी असून तिचे वय 21 वर्षे आहे तर माझे वय किती वर्ष असेल ?
विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयाच्या उताऱ्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक तीनच्या आयोजन केले आहे.
आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.