मराठा सर्वेक्षण अधिकारी/कर्मचारी मानधन बाबत, Maratha Survey

 MSBCC SURVEY - मानधन अपडेट 

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग नवीन प्रशासकीय इमारत खोली क्र. ३०७, तिसरा मजला, विधान भवना समोर, पुणे- ४११००१ दूरध्वनी क्र. ०२०- २६०५३०५६

ई. मेल msbeepune1@gmail.com

जा.क्र.प्र.क्र.३५१/२०२३/प्रगणक/३९१

दिनांक : २२ फ़ेब्रुवारी २०२४

प्रति,

१. मा. विभागीय आयुक्त (सर्व)


२. मा. जिल्हाधिकारी (सर्व)


३. मा. महानगरपालिका आयुक्त (सर्व)


विषय : सर्वेक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांचे मानधन व इतर खर्चाबाबत



संदर्भ : या कार्यालयाकडील पत्र क्र.प्र.क्र.३५१/२०२४/प्रशिक्षण/पुणे/१६ दि.१७.०१.२०२४


महोदय,

संदर्भाधीन दि.१७.०१.२०२४ रोजीच्या पत्रान्वये कळविल्यानुसार मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुंटुंबाचे सर्वेक्षणाच्या कामकाजामध्ये विभाग, जिल्हा, महानगरपालिका तसेच तालुका व वॉर्डस्तरावर नोडल ऑफ़िसर, असिस्टंट नोडल ऑफ़िसर व नोडल ऑफ़िसर च्या मदतीसाठी नियुक्त लिपीक यांना त्यांच्या मुळ वेतनाच्या ५०% इतके मानधन अदा करण्यात येणार आहे. सर्वेक्षण कामकाजाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या प्रगणकांनी केलेल्या कामाची माहिती सॉफ़्टवेअरच्या माध्यमातुन तपासण्याचे काम सुरू आहे. सदर प्रगणकांना त्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार अदा करावयाची रक्कम आयोगामार्फ़त निश्चित करून वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात येईल.


आपल्यामार्फ़त नियुक्त करण्यात आलेल्या उर्वरित विभागीय, जिल्हा, महानगरपालिका, तालुका, वॉर्डस्तरीय अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक व पर्यवेक्षक यांना मानधन देण्याकरिता त्यांची अचुक माहिती खालील नमुन्यात जिल्हा स्तरावरून/ महानगरपालिका स्तरावरून आयोगास उपलब्ध करून देण्यात यावी.


Table: A विभागीय आयुक्त कार्यालय, (फ़क्त विभागीय आयुक्त कार्यालयाने भरावे)


अ.क्र.   विभागाचे नाव :  अधिका-याचे नाव - पदनाम सर्वेक्षणातील पदनाम - मुळ वेतन - ५०% मुळ वेतन


सविस्तर माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरून शासन आदेश डाऊनलोड करा


https://drive.google.com/file/d/1AU8C2F5izrZfGHYLNf29vfnSvKeQTdLl/view?usp=drivesdk









No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल