सुट्टीच्या कालावधीतील धान्य कोरडा शिधा वाटप करणे बाबत शासन परिपत्रक, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा शिधा वाटप करणेबाबत.

संदर्भ:- १. शासन पत्र क्र. संकिर्ण-२०२३/प्र.क्र.१०५/एस.डी.४, दि.१९/०४/२०२४.

२. शिक्षण संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा-२४ (ओ-०१)/ उन्हाळी सुट्टी/ एस.-१/२२०६, दिनांक १८/०४/२०२४.

३. शिक्षण संचालनालयाचे पत्र क्र. प्राशिसं / ड-३०१/२०२४/३१८४, दिनांक १९/०४/२०२४.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असल्याने त्याबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत देणे संदर्भात शासनाने संदर्भिय पत्र क्र. १ मधील मुद्दा क्र. १ नुसार राज्यातील राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २२/०४/२०२४ पासून शाळेत उपस्थित राहणेपासून सवलत दिली आहे. संदर्भिय पत्र क्र. २ नुसार संचालनालयाने शाळांमधील विद्यार्थ्यांना गुरुवार दिनांक ०२/०५/२०२४ पासून सुट्टी जाहीर केलेली आहे.


प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील पात्र विद्यार्थ्यांना शासनाने शाळेत उपस्थित राहण्यापासून सवलत दिलेल्या कालावधीतील कार्यदिनाकरीता नियमानुसार देय असणारा तांदुळ व धान्यादी माल कोरडा शिधा स्वरुपात वाटप करण्याचे निर्देश आपल्या स्तरावरुन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात यावेत. योजनेंतर्गत पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी.

    सौजन्य - मा. शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र शासन यांचे पत्र



संपूर्ण पत्र डाउनलोड करून वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर कर.

https://drive.google.com/file/d/1Y3gCPGvcgNtrdYAcLMahvAETG99EVv3S/view?usp=drivesdk

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल