मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी भाषण, marathvada MuktiSangram din Marathi bhashan

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मराठी भाषण, 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण


marathvada MuktiSangram din Marathi bhashan,

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन छोटे भाषण

1 ली ते 10 वीचे विद्यार्थी हे भाषण लिहून घेऊन आत्मविश्वासाने सादर करू शकतात.

भाषण क्रमांक 01

1 ली व 2 री चे विद्यार्थ्यांसाठी 5 ओळींचे मराठी भाषण

1) नमस्कार सर्वांना,
          माझे नाव आयुष आहे. 
2) आज 17 सप्टेंबर, हा दिवस आपण 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून साजरा करत आहोत.
3) सर्वप्रथम सर्व मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !
4) आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला, परंतु मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीत असल्यामुळे मराठवाड्याला खरे स्वातंत्र्य मिळाले नाही.
5) आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्थान राज्य करीत होते त्यांचा अन्याय आपली जनता सहन करत होती.
6) या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्तिसंग्राम सुरू झाला.
5) अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवितो

                 जय हिंद ! जय महाराष्ट्र !


भाषण क्रमांक 02

(हे भाषण 3 री ते 5 वी चे विद्यार्थी लिहून घेऊ शकतात)

      आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,
       आज मी आपल्यासमोर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती.
        मित्रांनो, आज 17 सप्टेंबर हा दिवस आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून अतिशय आनंदाने साजरा करत आहोत.
      आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला परंतु आपल्या मराठवाड्यावर निजाम संस्थांचे राज्य होते. त्यांचा अन्याय आपली जनता सहन करत होती.
           या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ती संग्राम सुरू करण्यात आला. परंतु निजाम शरण आला नाही म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस कार्यवाही सुरू केली.
          17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला आणि आपला मराठवाडा स्वतंत्र झाला.
          तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस 'मराठवाडा मुक्ती संग्राम दिन' म्हणून साजरा केला जातो.
            सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो.

                    जय हिंद !  जय महाराष्ट्र  !


भाषण क्रमांक 03

(हे भाषण सहावी ते आठवीचे विद्यार्थी लिहून घेऊ शकतात)

                   "उगवली सोनेरी पहाट
             अन्  मिटला अंधार युगायुगांचा 
                फडकला तिरंगा दिमाखाने अन् 
      मराठवाड्यानेही सोहळा पाहिला स्वातंत्र्याचा"

     सन्माननीय व्यासपीठ, इथे जमलेले गावातील प्रतिष्ठित नागरिक, गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,
      अखेर 17 सप्टेंबर 1948 या दिवशी स्वातंत्र्याचा सूर्य मराठवाड्यात दिमाखाने उगवला. मराठवाडा निजामांच्या जुलमी अत्याचारातून मुक्त झाला आणि  स्वातंत्र्याची सोनेरी पहाट मराठवाड्यातील जनतेने पाहिली.
           15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला पण तरीही आपल्या मराठवाडा मात्र निजामाच्या गुलामगिरीत अडकलेला होता.
            भारतातील अनेक संस्थाने स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली परंतु जुनागड जम्मू-काश्मीर व हैदराबादच्या संस्थानिकांनी विलीनीकरणास नकार दिला. 
       कालांतराने जुनागड व जम्मू-काश्मीर ही संस्थाने भारतात विलीन झाली. परंतु भारताच्या मधोमध असलेल्या हैदराबादच्या निजामाने विधिनीकरणास नकार दिला. 
         निजामाला त्यांचे स्वतंत्र राष्ट्र निर्माण करायचे होते. याच हैदराबाद संस्थानात मराठवाडा होता. येथील जनतेने निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे या जनतेचा बंदोबस्त करण्यासाठी निजामाने कासिम रजनीच्या नेतृत्वाखाली एक संघटना निर्माण केली. 
        यातील लोकांनी नाव धारण केले 'रझाकार' हे रझाकार गावोगावी जाऊन जनतेवर अत्याचार करत. कत्तली करत होते. जबरदस्तीने धर्मांतरण करून घेत होते. 
           जनतेने या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा देण्याचे ठरवले. मराठवाड्याच्या मुक्तीसाठी जीवाची पर्वा न करता सारे प्राण पणाने लढले. पण निजाम काही केल्या दाद देत नव्हता. 
             तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईचे आदेश दिले होते. 13 सप्टेंबर 1948 रोजी सरकारी फौजा हैदराबाद संस्थानात घुसवल्या आणि निजामावर दबाव आणला.

      अखेरीस 17 सप्टेंबर 1948 रोजी निजाम शरण आला. मराठवाड्याची निजामाच्या गुलामीतून मुक्तता झाली आणि मराठवाड्यानेही मोकळा श्वास घेतला.

 म्हणूनच 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा केला जातो.
         सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

                  जय हिंद  !   जय महाराष्ट्र  !


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हिंदी भाषण लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन English भाषण लिहून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करा.


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा सोडविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल