वर्णमाला / मुळाक्षरे - संपूर्ण मराठी व्याकरण,
Alphabet
सर्व इयत्ता आणि सर्व शालेय स्पर्धा तसेच विविध स्पर्धां परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे संपूर्ण मराठी व्याकरण बेसिक ते ऍडव्हान्स अशा पद्धतीने आपण घेत आहोत.
आजच्या भागात आपण वर्णमाला मुळाक्षरे भाषेचे मूलभूत घटक या भागावर माहिती पाहणार आहोत.
भाषेचे मूलभूत घटक
1) वर्ण - तोंडावाटे बाहेर पडणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात.
2) अक्षर - आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असे म्हणतात.
3) स्वर - स्वरांचा उच्चार पूर्ण करण्यासाठी इतर वर्णांची गरज नसते.
4) व्यंजन - व्यंजने पाय मोडून लिहिल्यास ते वर्ण असतात तर पाय न मोडता लिहिल्यास अक्षरे असतात.
5) शब्द - ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्या शब्द असे म्हणतात.
6) वाक्य - पूर्ण अर्थाचे बोलणे किंवा अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात.
7) व्याकरण - भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला किंवा भाषा शुद्ध करणाऱ्या शास्त्राला व्याकरण असे म्हणतात.
वर्णमाला / मुळाक्षरे -
शासन निर्णय 06 नोव्हेंबर 2009 नुसार ॲ, ऑ या इंग्रजी स्वरांचा तसेच क्ष व ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा वर्णमालेत समावेश होतो असे नमूद केले आहे.
आधुनिक वर्णमालेत 14 स्वर, 02 स्वरादी तसेच 36 व्यंजने आहेत. शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत.
2009 मध्ये शासन स्तरावर स्वीकारलेली वर्णमाला
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, लृ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ, अं, अ:
क, ख, ग, घ, ड;
च, छ, ज, झ, त्र,
ट, ठ, ड, ढ, ण,
त, थ,द, ध, न,
प, फ, ब, भ, म,
य, र, ल, व श,
ष, स, ह, ळ,
क्ष, ज्ञ.
वर्णमाला व वर्णांचे प्रकार
1) स्वर - (14)
हस्व स्वर - अ, इ, उ, ऋ, लृ. (5)
दीर्घ स्वर - आ, ई, ऊ,. (3)
संयुक्त स्वर - ए, ऐ, ओ, औ. (4)
इंग्रजी स्वर - ॲ, ऑ (2)
2) स्वरादी - अं, अ: (2)
3) व्यंजने -
स्पर्श व्यंजने (25)
गट. कठोर. मृदू. अनुनासिक
'क' वर्ग -. क, ख. ग, घ, ड;
'च' वर्ग. च, छ, ज, झ, त्र,
'ट' वर्ग - ट, ठ, ड, ढ, ण,
'त' वर्ग - त, थ, द, ध, न,
'प' वर्ग - प, फ, ब, भ, म,
अर्धस्वर (अंतस्थ) - य, र, ल, व
उष्मे ( घर्षक) - श, ष, स
महाप्राण -. ह
द्रविडीयन (स्वतंत्र) - ळ
संयुक्त व्यंजने - क्ष, ज्ञ
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल