Notes - नाम - नामाचे प्रकार, शब्दांच्या जाती,Noun, संपूर्ण मराठी व्याकरण

 शब्दांच्या जाती 

Parts of speech

नाम व नामाचे प्रकार


1) नाम - Noun 

        एखाद्या वस्तूला, व्यक्तीला किंवा स्थळाला जे विशिष्ट नाव ठेवले जाते, त्याला 'नाम' असे म्हणतात.

          डोळ्यांनी दिसणाऱ्या किंवा काल्पनिक वस्तूंच्या किंवा गुणांच्या नावांनासुद्धा 'नाम' असे म्हणतात.

           सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्यासाठी वापरण्यात येणारा विकारी शब्द म्हणजे 'नाम' होय.

         उदा. पेन, कागद, नांदेड, राग, सौंदर्य, स्वर्ग, आयुष ई.

मराठी मध्ये नामाचे मुख्य तीन प्रकार आहेत.

1) सामान्य नाम (common noun)

2) विशेष नाम.    (Proper noun)

3) भाववाचक नाम : (Abstract noun)


1) सामान्य नाम : (common noun)

                   एकाच गटातील प्रत्येक वस्तूला समान गुणधर्मामुळे जे एकच नाव दिले जाते, त्याला 'सामान्यनाम' असे म्हणतात.

                ज्या नामामुळे एकाच प्रकारच्या तसेच एकाच जातीच्या समान / सारख्या गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किंवा प्राण्याचा अथवा पदार्थाचा बोध होतो, त्यांना मला सामान्य नाम असे म्हणतात.

 'सामान्यनाम' त्या जातीतील प्रत्येक घटकासाठी वापरले जाते. सामान्यनामाचे अनेक वचन होते. सामान्य नाम परंपरेने, रुढीने किंवा व्यवहाराने मिळते.

    उदा. शाळा, नदी, शिक्षक, शेतकरी, घर, मुलगी, ग्रह, तारा, माणूस इत्यादी.

सामान्यनामाचे दोन प्रकार पडतात.

1) पदार्थवाचक नाम. (material Noun)

             जे घटक शक्यतो लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजले जातात. (संख्येत मोजले जात नाही) त्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नाम असे म्हणतात.

              उदा. कपडा, सोने, चांदी, दूध, पाणी, तांदूळ, तांबे इत्यादी.

2)  समूहवाचक नाम : (collective Noun)

              ज्या नावामुळे एखाद्या समूहाचा उल्लेख होतो त्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात.

               या शब्दामुळे एकाच जातीच्या समान व सारख्या व्यक्ती, वस्तू, पक्षी वा प्राण्यांच्या समूहाचा बोध होतो.

              उदा. सेना, वर्ग, समिती, थवा, कळप, मोळी, ढिगारा इत्यादी.


2)  विशेष नाम : ( Proper noun)

                   ज्या नावामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा अथवा प्राण्याचा बोध होत असेल, तर त्यास 'विशेषनाम' असे म्हणतात.

       विशेष नाम एक वचनी असते.

        विशेष नामे ही व्यक्तीवाचक असतात.

        उदा. गोदावरी, रमेश, छत्रपती संभाजी नगर, भारत, आयुष, यमुना, जपान इत्यादी.


3) भाववाचक नाम : ( Abstract noun)

             ज्या नावामुळे प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेले गुण, धर्म, क्रिया किंवा भावना तसेच दर्जा, स्थिती यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात.

            ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था, कृती यांच्या नावांना भाववाचक नाम असे म्हणतात.

     हे घटक वस्तू स्वरूपात दाखविता येत नाहीत.

       उदा.  प्रामाणिकपणा, धैर्य, चपळाई, हुशारी, चतुराई, जन्म, मृत्यू, सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इत्यादी.

भाववाचक नामांचे तीन गट पडतात.

1) स्थितीदर्शक  - गरिबी, स्वातंत्र्य इत्यादी.

2) गुणदर्शक.  -  सौंदर्य, प्रामाणिकपणा इत्यादी.

3) कृतीदर्शक   - चोरी, चळवळ इत्यादी.


खालील प्रत्यय वापरून भाववाचक नामे तयार होतात.

1)  य - सुंदर -  सौंदर्य,  गंभीर -  गांभीर्य,  मधुर - माधुर्य, 

     धीर - धैर्य,   क्रूर - क्रौर्य,  शूर - शौर्य,  उदार - औदार्य, नवीन - नाविन्य.

2) त्व - माणूस - मनुष्यत्व, शत्रु - शत्रुत्व, मित्र - मित्रत्व, प्रौढ - प्रौढत्व, जड  - जडत्व, प्रभाव - प्रभुत्व, नेता - नेतृत्व.

3) ई.  -   गरीब -,  श्रीमंत - श्रीमंती,  गोड - गोडी,  चोर - चोरी,  हुशार - हुशारी. 

4) ता -  नम्र - नम्रता, सम - समता, वीर - वीरता, बंधू - बंधुता.


2 comments:

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल