मराठी भाषेतील व्याकरणाचे महत्त्व आणि प्रकार, भाषा, लिपी व स्वरूप
प्रत्येक भाषेसाठी व्याकरण अतिशय महत्त्वाचे असते. कारण व्याकरणामुळेच भाषा प्रमाणबद्ध रीतीने मांडली जाते.
भाषेची निर्मिती होताना एका विशिष्ट रचनेनुसार होत असते. प्रथम बोलीभाषा व नंतर लेखीभाषा असे स्वरूप भाषेचे असते.
व्याकरणाचे प्रकार – सामान्यपणे व्याकरण लेखनाचे आदेशात्मक, वर्णनात्मक, ऐतिहासिक, तोलनी असे प्रकार मानले जातात. भाषेचे बोलीभाषा व लेखीभाषा असे दोन प्रकार मानले जातात. बोलीभाषेपेक्षा लेखीभाषा अधिक स्थिर असते.
भारतातील भाषा प्रामुख्याने दोन मुख्य भाषिक गटात विभागल्या गेले आहेत.
1) आर्यन गटातील भाषा (देवनागरी लिपी) – मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती, बंगाली.
2) द्रविडियन गटातील भाषा – तमिळ, तेलगू, मल्याळम, कानडी.
संस्कृत आणि तमिळ या भाषा भारतातील सर्वात जुन्या भाषा मानल्या जातात.
भारतीय राज्यघटनेच्या कलम 343 नुसार हिंदी व इंग्रजी या संघराज्याच्या व्यवहारांच्या भाषा आहेत.
सध्या भारतीय घटनेनुसार देशात बोलल्या जाणाऱ्या 22 प्रादेशिक भाषांना राजकीय/राजभाषेचा दर्जा देण्यात आला आहे. यामध्ये आसामी, बंगाली, बोडो, डोगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मिरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, कोरिया, पंजाबी, संस्कृत, सिंधी, संथाली, तमिळ, तेलुगु, उर्दू इत्यादी भाषेचा समावेश आहे.
महत्त्वाचे – भारतीय संविधानाने कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा दिलेला नाही.
संस्कृत - प्राकृत या भाषांपासून मराठी भाषेचा विकास झाला आहे.
मराठी व्याकरणांवर इंग्रजी व संस्कृत भाषांचा प्रभाव आहे.
भाषा लिपी व स्वरूप -
1) भाषा – विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा होय.
ध्वनी हे भाषेचे मूलभूत घटक असतात.
बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय.
ऐकणे बोलणे वाचणे लिहिणे आपलं या पाच कौशल्यांवर भाषा शिक्षण अवलंबून असते.
भाषेमध्ये भाषण व लेखन या दोन्हींचा समावेश होतो.
2) भाषेचे स्वरूप –
1) मातृभाषा – आपल्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेला मातृभाषा असे म्हणतात.
2) बोलीभाषा – दैनंदिन जीवनात संपर्कासाठी, संवादासाठी आपण जी भाषा वापरतो ती बोलीभाषा असते.
3) प्रमाणभाषा – ज्या भाषेचा उपयोग साहित्यिक, प्रादेशिक, राजकीय, शास्त्रीय दृष्टीने केला जातो ती भाषा प्रमाण भाषा म्हणून ओळखली जाते.
लिपी
लिपी हा शब्द लिंपने या शब्दावरून रूढ झाला असून आपण ज्या गुणांनी लेखन करतो त्याला लिपी असे म्हणतात.
मराठी भाषेची लिपी देवनागरी असून ती डावीकडून उजवीकडे लिहितात.
मराठी भाषेला प्राकृत, महारठी, देशी, मराठी ही वेगवेगळ्या काळातील नावे आहेत.
देवनागरी लिपीतील अक्षरांवर जी आडवी रेषा मारतात तिला शिरोरेषा म्हणतात.
काही महत्त्वाच्या प्राचीन लिपी –
1) ब्राह्मी लिपी – भारतातील एक अत्यंत प्राचीन व महत्त्वाची लिपी मानली जाते तसेच सर्व लिपींचीही जननी मानली जाते.
2) खरोष्टी लिपी – ही लिपी गांधारी लिपी या नावाने सुद्धा ओळखले जाते.
3) देवनागरी लिपी – ही लिपी प्रामुख्याने आर्याची लिपी मानली जाते. देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असे सुद्धा म्हणतात.
4) मोडी लिपी – मोडी लिपीला धाव लिपी असे सुद्धा म्हणतात.
अत्यंत महत्त्वाचे –
मराठी भाषेचे पाणिनी – दादोबा पांडुरंग तर्खडकर
मराठी भाषेचे शिवाजी – विष्णुशास्त्री चिपळूणकर
मराठी भाषेचे जॉन्सन – कृष्णशास्त्री चिपळूणकर.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल