Notes - वर्णांचे वर्गीकरण - 2) स्वरादी, 3) व्यंजने आणि त्यांचे प्रकार , संपूर्ण मराठी व्याकरण भाग 4

 वर्णांचे वर्गीकरण - 2) स्वरादी, 3)  व्यंजने आणि त्यांचे प्रकार, 

संपूर्ण मराठी व्याकरण भाग 4

संपूर्ण मराठी व्याकरण


स्कॉलरशिप, नवोदय, सातारा सैनिक स्कूल, मंथन तसेच पोलीस भरती, शिक्षक भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, M.P.S.C. इत्यादी विविध स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त संपूर्ण मराठी व्याकरण अगदी बेसिक ते ऍडव्हान्स पर्यंत आपण घेत आहोत.

यापूर्वीच्या तासिकेमध्ये आपण भाषा, लिपी, स्वरूप, मराठी व्याकरण महत्त्व तसेच भाषेचे मूलभूत घटक वर्णमाला मुळाक्षरे वर्णांचे वर्गीकरण स्वर हा भाग आपण पाहिलेला आहे.

आजच्या भागात आपण स्वरादी, व्यंजने आणि त्यांचे प्रकार पाहणार आहोत.  

2) स्वरादी - 
             अं, अ:  -  अनुस्वार व विसर्ग या दोन वर्णांचा उच्चार करण्यापूर्वी एखाद्या स्वराचा उच्चार करावाच लागतो म्हणून ज्याच्या आधी स्वर आहे त्याला स्वराधी असे म्हणतात.

1) अनुस्वार - 
                 एखाद्या अक्षरावर अनुस्वार दिल्यास अगोदर त्या अक्षराचा उच्चार करावा लागतो व त्यानंतर अनुस्वाराचा उच्चार होतो म्हणून अनुस्वाराला लगेच मागून आलेला उच्चार किंवा दुसऱ्यावर स्वार होणारा असे सुद्धा म्हणतात. 'अं' चे अनुस्वार व अनुनासिक असे दोन उच्चार होतात.
 स्पष्ट व खणखणीत उच्चाराला अनुस्वार म्हणतात जसे गंगा, घंटा, शंकर इत्यादी 
तर ओझरत्या व अस्पष्ट उच्चाराला अनुनासिक म्हणतात.

2) विसर्ग -  ( : )
                  विसर्ग म्हणजे मुक्त होणे होय.
   अ:  चा उच्चार करताना हवेचा विसर्ग होतो, म्हणून या वर्णाला विसर्ग म्हणतात. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा झटका दिल्याप्रमाणे होतो.
      विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वीसुद्धा एखाद्या स्वराचा आधार घ्यावाच लागतो.
 'दुःख' या शब्दात विसर्गाचा उच्चार करण्यापूर्वी 'उ' या स्वराचा आधार घ्यावा  लागला आहे.


3) व्यंजने - 
             उच्चार करताना जिभेचा तोंडातील इतर अवयवांना स्पर्श तसेच हवेचा मार्ग अडवून शेवटी स्वराचे सहाय्य घ्यावे लागणाऱ्या प्रत्येक वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

            व्यंजनांचा उच्चार पूर्ण स्पष्ट करण्यासाठी शेवटी स्वराचे सहाय्यक घ्यावे लागते म्हणून त्यांना स्वरांत असे सुद्धा म्हणतात.

           व्यंजनेही अपूर्ण उच्चारांची असल्याने त्यांचा पाय मोडून लिहितात त्यात स्वर मिसळल्यास मात्र ती पाय मोडून दिली जात नाहीत.

वर्णमालेत एकूण 36 व्यंजने आहेत.

व्यंजनांचा उच्चार पूर्ण होण्यासाठी व्यंजने स्वरांवर अवलंबून असतात म्हणून त्यांना 'परवर्ण' असे सुद्धा म्हणतात.

चौदाखडी - 

प्रत्येक व्यंजनात   अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ॲ, ऐ, ओ, ऑ, औ, हे बारा स्वर आणि 'अं, अ:'  हे दोन स्वरादी    अशी 14 चिन्ह मिळवून 14 अक्षरे तयार होतात याला चौदाखडी असे म्हणतात.

उदाहरणार्थ  - क, का, कि, की, कु, कू, के, कॅ, कै, को, कॉ, कौ, कं, क: 


व्यंजनांचे प्रकार -  

 1) स्पर्श व्यंजने  (25)
           अ) कठोर व्यंजने -  (13)
                        ' क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ तसेच श, ष, स्,  या वर्णांचा उच्चार करावयास कठीण असल्यामुळे त्यांना कठोर व्यंजने म्हणतात.

            आ) मृदू व्यंजने - 
                         ज्या वर्णांचा उच्चार करण्यास सोपा असतो त्यांना मृदू व्यंजने म्हणतात.
       उदा. ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ, तसेच य, र, ल, व, ह, ळ.

    तसेच सर्व स्वर, स्वरादी, अनुनासिके या वर्णांचा सुद्धा मृदु वर्णनात समावेश होतो.

              इ) अनुनासिके - 
                          ड; , त्र, ण,न, म्  या वर्णांचा उच्चार जिभेचा तोंडातील इतर भागांना स्पर्श होण्या व्यतिरिक्त नाकातूनही उच्चार होतो म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात.


2) अर्धस्वर - (4)
                   'य, र, ल, व '  यांची उच्चार स्थाने अनुक्रमे 'इ, ऋ, ल, उ' या स्वरांच्या उच्चार स्थानांवरच असल्याने या व्यंजनांचा वरील स्वरांशी निकटचा संबंध आहे म्हणून त्यांना अर्धस्वर म्हणतात.

3) उष्मे - 
             ज्या वर्णांचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यांना उष्मे असे म्हणतात.
     उदा. श, ष, स.

4) महाप्राण - 
                   ज्या वर्णांचा उच्चार करताना फुफुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते त्या वर्णाला महाप्राण असे म्हणतात.
  मराठीतील जो वर्ण इंग्रजीत लिहिताना H अक्षर वापरावे लागते, त्या सर्व वर्णांना महाप्राण म्हणतात इतर बाकीचे सर्व वर्ण अल्पप्राण आहेत.

ह,
ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, ष, स,

महाप्राण एकूण 14 आहेत.

5) द्रविडीयन वर्ण - 
             ळ,   हा मराठीतील स्वतंत्र वर्ण मानला जातो तसेच याला द्रविडीयन वर्ण असे सुद्धा म्हटले जाते.

6). संयुक्त व्यंजने - 
               क्ष, ज्ञ या संयुक्त व्यंजनांचा समावेश वर्णमालेत होतो.
        
(टीप - वर दिलेली सर्व व्यंजने पाय मोडून लिहावा.)

No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल