Notes - शब्दांच्या जाती, संपूर्ण मराठी व्याकरण,

 संपूर्ण मराठी व्याकरण,

शब्दांच्या जाती


यापूर्वीच्या भागामध्ये आपण मराठी भाषा, लिपी व स्वरूप आणि मराठी व्याकरण, भाषेचे मूलभूत घटक, वर्णमाला/ मुळाक्षरे, वर्णांचे वर्गीकरण, 1) स्वर - स्वरांचे प्रकार, 2) स्वरादी 3) व्यंजने इत्यादी बद्दल सविस्तर माहिती पाहिलेली आहे.

हे सर्व घटक तुम्ही पाहिले नसतील तर खाली दिलेल्या युट्युब चॅनलवर पाहू शकता.

https://youtube.com/@govardhanshindesknowledgeb6173

दररोजच्या शिकविलेल्या भागावर आधारित सराव चाचणी सोडविली नसेल तर खाली दिलेल्या ब्लॉगवर जाऊन तुम्ही सोडवू शकता.



आजच्या भागात आपण

शब्दांच्या जाती 

थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

वाक्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे शब्द होय.

ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त होत असेल तरच त्या शब्द असे म्हणतात.

परंतु सर्वच अक्षर समूहाला अर्थ असतोच असे नाही. काही अक्षर समूह अर्थहीन असतात. जसे , ईय, ईक, यांना प्रत्यय असे म्हणतात.

मराठीत पुढील प्रमाणे शब्दांच्या आठ जाती मानल्या जातात.

1)   नाम  - मुलगा 

2)   सर्वनाम  - तो

3)  विशेषण - चांगला

4)  क्रियापद - दिसतो

5)  क्रियाविशेषण  - चांगला खेळतो 

6)  शब्दयोगी अव्यय - मागे, पुढे, इकडे, तिकडे

7)  उभयान्वयी अव्यय - आणि, पण, किंवा, कारण

8)  केवलप्रयोगी अव्यय अरेरे, वा, छान 




No comments:

Post a Comment

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल