यापूर्वीच्या भागात आपण शब्दांच्या जाती - 1) नाम - नामाचे प्रकार, वचन - वचनाचे प्रकार - त्यांचे नियम पाहिलेले आहेत.
आजच्या भागात......
नामाचे लिंग व त्यांचे प्रकार
नामाच्या रूपावरून एखादा घटक वास्तविक अगर काल्पनिक नर जातीचा आहे की मादी जातीचा आहे की दोन्हीपैकी कोणत्याच जातीचा नाही हे यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात.
लिंग याचा अर्थ 'खूण' किंवा 'चिन्ह' असा आहे.
लिंग, वचन व विभक्ती मुळे नामाच्या रूपात जो बदल होतो त्याला नामाचे 'विकरण' असे म्हणतात.
लिंगाचे तीन प्रकार पडतात.
1) पुल्लिंग -
पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला 'पुल्लिंग' असे म्हणतात.
'तो' हे सर्वनाम ज्या घटकासाठी वापरले जाते ते पुल्लिंगी मानावे. उदाहरणार्थ, कोंबडा, बैल, घोडा, मुलगा, चिमणा, मृत्यू इ.
2) स्त्रीलिंग -
स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना 'स्त्रीलिंग' असे म्हणतात.
काही वस्तू व भाववाचक नामे सुद्धा स्त्रीलिंगी मानली जातात.
सर्वसामान्यपणे 'ती' या सर्वनामाचा वापर ज्या नामासाठी केला जातो त्यांना 'स्त्रीलिंगी' नामे म्हणतात.
उदा. मुलगी, घोडी, कोंबडी, चिमणी.
3) नपुंसकलिंगी -
एखाद्या नामावरून नर व मादी असा कोणताच बोध होत नसेल तर ते 'नपुसकलिंगी' मानतात.
'ते' सर्वनाम ज्याच्यासाठी वापरले जाते त्याला नपुसकलिंगी मांनतात.
उदा. पुस्तक, फुल, मुल, वासरू, गवत इत्यादी.
लिंग बदला विषयी काही महत्त्वाचे नियम : -
नियम क्रं 01) 'आ' कारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत व नपुसकलिंगी रूप 'ए' कारांत होते.
पुल्लिंगी. स्त्रीलिंगी. नपुसकलिंगी
मुलगा मुलगी मुलगे
कुत्रा कुत्री कुत्रे
घोडा घोडी घोडे
नियम क्रं 02) काही प्राणीवाचक 'अ' कारांत पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रूपे 'ई' कारांत होतात.
उदा. दास - दासी तरुण - तरूणी
गोप - गोपी, बेडूक - बेडकी,
वानर - वानरी हंस - हंसी
नियम क्रं 03) काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास ' ई' / ईण प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रूपे होतात.
उदा.
वाघ - वाघीण, सुतार - सुतारीण, कुंभार - कुंभारीन,
माळी - माळीन, पाटील - पाटलीन, तेली - तेलीन,
धोबी - धोबीन, कोळी - कोळीन,. मालक - मालकिन,
देव - देवी,. दास - दासी, हरीण - हरिणी,
नट - नटी, साजन - साजणी,. मित्र - मैत्रिण,
अभिनेता - अभिनेत्री,. शिंपी - शिंपीन,
नर्तक - नर्तिका
नियम क्रं 04) नाते दर्शक 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत होते.
उदा. काका - काकी, मामा - मामी,
आजा - आजी, चुलता - चुलती
नियम क्रं 05) संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रूपे 'ई' प्रत्यय लागून होतात.
उदा. राजा - राज्ञी, श्रीमान - श्रीमती,
भगवान - भगवती,. युवा - युवती,
विद्वान - विदुषी
नियम क्रं 06). काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे खालील प्रमाणे स्वतंत्र रीतीने होतात.
पुरुष - स्त्री, भाऊ - बहीण, मोर - लांडोर,
कवी - कवयित्री, बंधू - भगिनी, उंट - सांडणी,
राजा - राणी, बाप - आई, नातू - नात,
पती - पत्नी, वर - वधू, जनक - जननी,
नर - नारी / मादी, गृहस्थ - गृहिणी,
पोपट - मैना, वाघ्या - मुरळी,
बोका - भाटी / मांजर, रेडा / हेला - म्हैस,
पुत्र - कन्या, दीर - जाऊ, खोंड - कालवड,
बैल - गाय, व्याही - विहीन, साधू - साध्वी,
मुलगा / मुलगी,सून विधूर - विधवा,
सासरा - सासू, सुत - सुता, एडका - मेंढी.
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल