शिवराज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा,
Online GK Test 79,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची माहिती व्हावी या उद्देशाने ही जनरल नॉलेज टेस्ट तयार करण्यात आलेली आहे.
चाचणी सोडविल्यानंतर शेवटी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अधिक माहिती दिलेली आहे नक्की वाचा.
*#शिवविचार_प्रतिष्ठान*
*#शिवचरित्र_एक_प्रेरणा*
*#शिवराज्याभिषेक एक नवीन युगपर्व*
मातृभूमीची परकीय अमलापासून मुक्तता म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना हे शिवछत्रपतींचे जीवनकार्य होते या कार्यासाठी त्यांनी हयातभर अविरत कष्ट घेतले आणि १६७४ साली स्वतःस राज्याभिषेक करवून या कार्यास राजनैतिक व कायदेशीर अधिष्ठान प्राप्त केले. आपले ध्येय साध्य करीत असता त्यांनी आपल्या अंगच्या असामान्य राजकीय व लष्करी गुणांचे प्रकटीकरण केले त्यांची कर्तबगारी ही फक्त राजकीय व लष्करी क्षेत्रांपुरती मर्यादित नव्हती स्वराज्याच्या उभारणीबरोबर त्यांनी त्याचे अत्यंत कार्यक्षम व लोकाभिमुख असे प्रशासन निर्माण केले. शिवछत्रपतींची ही कामगिरी त्यांच्या लष्करी पराक्रमांइतकीच महत्त्वाची आहे. सामान्यातील सामान्य माणसाचे विशेषतः गोरगरीब रयतेचे कल्याण व संरक्षण हे या प्रशासनाचे मुख्य सूत्र असल्याने हिंदुस्थानच्या इतिहासात 'रयतेचा राजा' म्हणून त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.शिवपूर्वकालीन हिंदुस्थानात परिस्थिती अत्यंत बिकट होती इस्लामी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राची भूमी आक्रमित करून एतद्देशीय लोकांवर केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक व सांस्कृतिक गुलामगिरी लादली होती. सलग तीनशे वर्षे महाराष्ट्र इस्लामी राज्यकर्त्यांच्या सर्वंकष गुलामगिरीत खितपत पडला होता. मराठ्यांचे तत्कालीन पुढारी सुलतानांची चाकरी करण्यातच धन्यता मानीत होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांची गुलामगिरीची मानसिकता तोडली आणि हिंदवी स्वराज्याची स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना केली महाराजांचे हे कार्य हे एक युगकार्य मानले गेले महाराष्ट्र सारख्या छोट्याशा राज्यातून पेटलेली एक ठिणगी पूर्ण हिंदुस्थानात पसरली या हिंदुस्थातील गुलामगिरी सहन करत खितपत पडलेल्या लोकांना स्वाभिमान या शब्दाचा खरा अर्थ कळला सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
No comments:
Post a Comment
नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.
Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल