नवोदय प्रवेश परीक्षेला सामोरे जाताना काय करावे ? काय करू नये ? वाचा संपूर्ण माहिती, What to do while facing Navodaya entrance exam? What not to do? Read complete information

 What to do while facing Navodaya entrance exam?  What not to do?  Read complete information

नवोदय प्रवेश परीक्षेला सामोरे जाताना काय करावे ? काय करू नये ? - वाचा संपूर्ण माहिती 

नवोदय प्रवेश परीक्षा तयारी 2023


जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2023.

   परीक्षा दिनांक -  20 जानेवारी 2024

           वार -  शनिवार

वेळ – सकाळी 11:30 ते 1:30 

( दोन तास – म्हणजेच 120 मिनिटे )


विद्यार्थी मित्रांनो,

माय व्हिजन नवोदय ॲडमिशन - राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन मध्ये आपले स्वागत आहे.

    जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली जाते. या परीक्षेला UPSC परीक्षेचे पहिली पायरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ही परीक्षा संयमाची आहे. शांत डोके ठेवून पेपर सोडवणे महत्त्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची एक महत्त्वाकांक्षा असते की आपली निवड जवाहर नवोदय विद्यालयामध्ये व्हावी. 

        जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतून प्रत्येक जिल्ह्यासाठी 80 विद्यार्थ्यांची निवड केली जाते हे, आपणास अवगत असेलच. 

      ज्या विद्यार्थ्यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाईन आवेदन (online Registration) केले असेल त्यांनाच ही परीक्षा देता येते.

परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांकडे Admit Card (Hall ticket) असणे आवश्यक असते.

Admit card Download केले नसेल तर खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करून घ्या आणि प्रिंट काढा.

https://govardhanshinde.blogspot.com/2023/12/jawahar-navodaya-entrance-exam.html


नवोदय प्रवेश परीक्षेच्या सरावासाठी चाचण्या आणि सराव पेपर सोडविण्यासाठी खाली दिलेल्या ब्लॉगला भेट द्या.

https://govardhanshinde.blogspot.com


परीक्षेला जाण्यापूर्वी कोणती तयारी करावी ?  सोबत काय काय घ्यावे ?

1) Admit card (हॉल टिकीट)

2) Black / Blue ball pen. (दोन पेन असाव्यात. घरीच एकदा चालवून पहाव्यात)

3) Adhar card सोबत असावे.

4) Pad

5) साधी घड्याळ (digital नसावी)

6) पेन्सिल

7) खोडरबर (eraiser)

8) गिरमिट (sharpner)

9) चष्मा लागलेला असेल तर तो सोबत घ्यावा.

10) पाणी बॉटल. (टेबलवर ठेवू नये, झाकण घट्ट लावावे जेणेकरून पेपरवर पाणी सांडणार नाही.)

11) हातरुमाल (Handkarchief)


परीक्षा हॉलमध्ये किती वाजता पोहोचावे ?

विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेची वेळ 11:30 ते 1:30 आहे. परंतु आपणास एक तास अगोदर म्हणजेच 10:30 वाजता परीक्षा हॉलमध्ये पोहोचायचे आहे.

परीक्षा हॉलमध्ये पोहोचल्यानंतर आपण आपल्या सीट नंबर प्रमाणे बसून घ्यावे.


How to Fill OMR SHEET (उत्तरपत्रिका कशी भरावी यासाठी खाली दिलेला video काळजीपूर्वक पहा. )

https://youtu.be/xtq23-VOfiI


Admit card वरील सूचनांचे मराठीत भाषांतर खाली दिले आहे ते काळजीपूर्वक वाचा.


उमेदवारासाठी सूचना

कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्राशिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

1. प्रवेशपत्रातील तपशील काळजीपूर्वक तपासा.  त्रुटी असल्यास, संबंधित JNV च्या मुख्याध्यापकांना jnvnanded2010@gmailcom वर ईमेलद्वारे त्वरित कळवावे.  

2. परीक्षा हॉलमध्ये सामान्य घड्याळ वगळता इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणे/गॅझेट्सला परवानगी नाही.

3.   परीक्षा हॉलमध्ये प्रवेशपत्र आणि काळे/निळे बॉल पेन वगळता कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका.

4.   उमेदवाराने सकाळी 10:30. पर्यंत परीक्षा केंद्रावर अहवाल देणे आवश्यक आहे.  

5. उशीरा अहवाल आल्यास उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.  

6. परीक्षेचा एकूण कालावधी 2 तासांचा आहे (सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 पर्यंत).  तथापि, विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) उमेदवारांसाठी 40 मिनिटांचा अतिरिक्त वेळ दिला जाईल.  

7. सकाळी 11.15 ते 11.30 पर्यंत सूचना वाचण्यासाठी 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला आहे.  

8. उत्तर देण्यापूर्वी, उमेदवाराने हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रश्नपुस्तिकेमध्ये 1 ते 80 या क्रमाने 80 प्रश्न आहेत. विसंगती आढळल्यास, उमेदवाराने प्रश्नपत्रिका बदलण्यासाठी तत्काळ पर्यवेक्षकाकडे तक्रार करावी.  

9. OMR शीटवर लिहिण्यासाठी निळा/काळा बॉल पॉइंट पेन वापरा.  पेन्सिल वापरण्यास सक्त मनाई आहे.


    नमुना  OMR SHEET डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


10.   प्रत्येक प्रश्नामागे A, B, C आणि D चिन्हांकित चार पर्यायी उत्तरे असतात. उमेदवाराने योग्य उत्तर निवडणे आणि OMR उत्तरपत्रिकेवर निवडलेल्या उत्तराचे संबंधित वर्तुळ गडद करणे आवश्यक आहे.  निगेटिव्ह मार्किंग केले जाणार नाही. 

11. प्रवेशपत्रात नमूद केल्याप्रमाणे परीक्षेच्या त्याच माध्यमाची प्रश्नपत्रिका दिली जाईल.  प्रश्नपत्रिकेचे माध्यम बदलण्याची परवानगी नाही.

12.   उमेदवाराने प्रत्येक विभागातील सर्व प्रश्नांचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.  प्रत्येक विभागात स्वतंत्रपणे पात्र असणे आवश्यक आहे.

13.   उमेदवारांनी ओएमआर शीटवर तसेच प्रश्नपत्रिकेवर रोल नंबर भरणे आवश्यक आहे.

14.   एकदा चिन्हांकित केल्यानंतर उत्तरामध्ये कोणताही बदल करण्याची परवानगी नाही. उत्तरपत्रिकेवर ओव्हररायटिंग, कटिंग आणि मिटवण्याची परवानगी नाही.

15.   ओएमआर शीटवर व्हाईटनर/करेक्शन फ्लुइड/इरेजर वापरण्यास परवानगी नाही.ओएमआर शीटवर कोणतेही विचित्र चिन्ह बनवू नका.

16.   उमेदवाराने आधार कार्ड/शासकीय सोबत बाळगणे आवश्यक आहे.  ओळख/निवासाची पडताळणी करण्यासाठी रहिवासी प्रमाणपत्र आणि प्रदान केलेल्या माहितीचे समर्थन करण्यासाठी जन्मतारखेचा कोणताही पुरावा.

17.   उमेदवाराने दुपारी 01.30 वाजेपूर्वी आणि OMR उत्तरपत्रिका पर्यवेक्षकाकडे सोपविल्याशिवाय हॉल सोडू नये.

18.   परीक्षेदरम्यान सहाय्य देताना किंवा प्राप्त करताना किंवा अनुचित मार्ग वापरताना आढळणारा कोणताही उमेदवार अपात्र ठरविला जाईल.

19.   तोतयागिरीचा कोणताही प्रयत्न उमेदवारी अपात्र ठरेल.

20.   निवडीनंतर JNVs मध्ये इयत्ता VI मध्ये प्रवेश घेताना पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून उमेदवाराला तात्पुरत्या परीक्षेसाठी उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

21.   संबंधित JNV मध्ये प्रवेशासाठी उमेदवाराची निवड विहित NVS निकषांनुसार आहे.

22.   जाहिरातीचे उल्लंघन करताना पुनरावृत्ती करणारा उमेदवार आढळल्यास उमेदवाराची निवड रद्द केली जाईल.


पेपर सोडवताना घ्यावयाची काळजी : 

1) पेपर सोडवताना शक्यतो दिलेल्या क्रमानेच सोडवावा. जसे सर्वात अगोदर मानसिक क्षमता चाचणी - 40 प्रश्न, गणित -  20 प्रश्न आणि भाषा -  20 प्रश्न.

2) मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न सोडवताना 100% खात्री असलेले प्रश्न, त्याचे उत्तर प्रश्नपत्रिकेतील पर्यायांमध्ये अगोदर tick करून ठेवावे आणि नंतर लगेच OMR SHEET (उत्तरपत्रिकेत) मध्ये त्याच प्रश्ना पुढे वर्तुळ रंगवावे.

3) एखादा प्रश्न अवघड जात असेल तर त्यात विचार करण्यामध्ये जास्त वेळ घालवू नये. तो प्रश्न शेवटी सोडवावा.

          पेपर सोडवताना वेळेचे नियोजन कसे करावे ?

4) मानसिक क्षमता चाचणीचे 40 प्रश्न सोडविण्यासाठी 40 मिनिटे द्यावीत.

5) गणित विषयाचे 20 प्रश्न सोडवताना एका प्रश्नाला दोन मिनिटे म्हणजेच वीस प्रश्नांसाठी 40 मिनिटे वेळ द्यावा आणि लगेच 100% खात्री वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे OMR SHEET मध्ये रंगवावीत.

6) गणिताचे एक - दोन प्रश्न अवघड वाटत असतील तर शेवटच्या दहा मिनिटांमध्ये सोडवावेत.

7) भाषा विषयाचे 20 प्रश्न सोडवताना प्रत्येक उताऱ्याखालील प्रश्न आणि त्याचे पर्याय काळजीपूर्वक वाचून घ्यावेत आणि त्यानंतर उतारा वाचावा जेणेकरून आपण वाचलेल्या प्रश्नांची उत्तरे चटकन, अचूक आणि कमी वेळेत आपल्याला मिळतील.

8) भाषा विषयाचे 20 प्रश्न सोडविण्यासाठी आपल्याला 20 मिनिटे वेळ पुरेसा आहे असे मला वाटते.

9) या पद्धतीने पेपर सोडवत गेल्यास मानसिक क्षमता चाचणी साठी 40 मिनिटे वेळ, गणित साठी 40 मिनिटे, भाषा विषयासाठी 20 मिनिटे वेळ लागेल. (40+40+20=100 मिनिटे)

10) आपल्याकडे आणखी 20 मिनिटे शिल्लक असतील.

11) शिल्लक असलेल्या 20 मिनिटापैकी पहिल्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला अवघड वाटत असलेले किंवा शिल्लक राहिलेले प्रश्न सोडवून घ्यावे आणि लगेच OMR SHEET मध्ये त्याची उत्तरे नोंदवावीत. आणि शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपली संपूर्ण उत्तर पत्रिका तपासून घ्यावी. कोणताही प्रश्न, त्याचे उत्तर रंगवायचे शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी.

12) शेवटी, परीक्षकाची स्वाक्षरी आणि आपली स्वाक्षरी तपासून OMR SHEET अर्थात उत्तर पत्रिका परीक्षकाकडे देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे वर्गाच्या बाहेर यावे.


वरील सर्व माहिती माझ्या स्वतःच्या अनुभवातून लिहिलेली आहे. हे माझे स्वतःचे मत आहे. तुम्ही माझ्या मताशी 100% सहमत असालच असे नाही.

गोवर्धन शिंदे, नांदेड

9421486014


1 comment:

  1. Hello Sir,
    I am very impressed from your blog, your article JNV Admit Card Download is so informative.

    ReplyDelete

नवोदय, स्कॉलरशिप तसेच सामान्यज्ञान प्रश्नांचा सराव करण्यासाठी याठिकाणी सराव चाचण्या, सराव पेपर दिले जात आहेत. तसेच नवोदय स्कॉलरशिप चे मोफत Live class घेतले जातात.

Navodaya, scholarship किंवा इतर शैक्षणिक माहिती अचूक देण्याचा प्रयत्न केला जाईल